मृत्यू येण्याआधी दिसतात ही लक्षणे !

प्रादेशिक शिक्षण

मृत्यू हे अटळ सत्य आहे, हे सत्य कोणीही जागारू शकत नाही, आणि टाळू शकत नाही. प्रत्येक माणसाला सृष्टीचे नियम पाळावेच लागतात. माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे तो जाऊ शकत नाही. हे वारंवार सिद्ध झाले आहे. जीवन आणि मृत्यूचा चक्रात प्रत्येक प्राणिमात्राचा आत्मा भटकत असतो.

शिव पुराणांमध्ये उमा संहितेमध्ये भगवान महादेव माता पार्वतीला सांगतात, मृत्युपूर्वी मिळणाऱ्या संकेतनविषयी. भगवान सांगतात व्यक्तीचे शरीर सगळीकडून पांढरे किंवा पिवळे पडत असेल आणि काही भागात लाल दिसत असेल तेव्हा अशा व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यात होऊ शकतो.

तसेच ज्या माणसाच्या डोक्यावर गिधाड कावळा किंवा कबूतर येऊन बसते अशा व्यक्तींचा मृत्यू ही एका महिन्यात होऊ शकतो. ज्या व्यक्तींना स्वतःचा चेहरा तेल आरसा पाणी यामध्ये दिसणे बंद होतं अशा व्यक्तींचा मृत्यू लवकरच होऊ शकतो.

तसेच ज्या व्यक्तीची सावली त्याला सोडून जाते म्हणजेच सावली दिसत नाही अशा व्यक्तींचा मृत्यू लवकरच होऊ शकतो. त्याच बरोबर ज्यांचा मृत्यू जवळ आला आहे अशा व्यक्ती जर आजारी असतील तर ते आपल्या प्रियजनांना जवळ बोलावण्याचा आग्रह धरतात हा देखील त्यांच्या मृत्यूचा संकेत असतो.

शिव पुराणांमध्ये मृत्यूसंबंधी येणाऱ्या अशा अनेक संकेत यांविषयी सांगण्यात आले आहे. परंतु याची सत्यता तपासून पाहणे अवघड आहे. कारण की, हे संकेत मृत्यू जवळ आलेल्या व्यक्तींनाच मिळतात आणि मृत्यू झाल्यानंतर ती व्यक्ती या संकेतांविषयी जिवंत व्यक्तींना सांगू शकत नाही.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *