मृत व्यक्ती जर स्वप्नात दिसत असतील तर देतात हे ७ संकेत ।। स्वप्नात मृत व्यक्तीला जिवंत पाहणे, स्वप्नात मृत व्यक्तींसोबत बोलत असताना पाहणे याचा अर्थ काय आहे ।। याबद्दल ची सविस्तर माहिती जाणून घेऊया या लेखात !

कला चित्रपट शिक्षण

आपण अशा एका विषयावर माहिती पाहणार आहोत जी गोष्ट आपल्या सर्वांसोबत कधी ना कधी घडत असते. स्वप्नात मृत व्यक्ती पाहणे स्वप्नात मृत व्यक्तीला जिवंतपणे पाहणे. स्वप्नात मृत व्यक्ती सोबत बोलत असताना पाहणे, त्याचबरोबर स्वप्नात वृद्ध आईवडिलांना पाहणे, याचा अर्थ काय आहे हे आपण जाणून घेऊ.

दिवसभराचे काम आटोपून थकलेले आपण झोपतो तेव्हा आपल्या आयुष्याशी निगडीत खूप साऱ्या गोष्टी किंवा प्रसंग आपल्याला आपल्या स्वप्नात दिसत असतात. आश्चर्याची गोष्ट ही आहे की आपण झोपलेलो असताना कोणी आपल्या आजूबाजूला येऊन जातो किंवा एखादी वस्तू घेऊन जातो तरी त्याच भान आपल्याला नसते.

परंतु आपण जे स्वप्न पाहतो त्या गोष्टी पुसट पुसट का होईना आपल्या लक्षात राहतात. काही स्वप्न पाहून आपण आनंदी होतो, परंतु काही स्वप्न इतकी भयानक असतात की आपण झोपेतच घामाघूम होऊन जातो आणि आपली झोप उडते. खूप वेळा तुम्हाला प्रश्न पडला असेल की अस स्वप्न मला का बर पडल? त्याचा नेमका अर्थ काय आहे?

तर या प्रश्नावर आपल्या शास्त्रांमध्ये उत्तर दिले आहे. शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाच्या मागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. स्वप्नांच्या बद्दल माहीतीसाठी पूर्ण एक शास्त्र आहे, त्याला स्वप्न शास्त्र असे म्हटले जाते. आज आम्ही आपल्याला स्वप्न शास्त्रानुसार जर, तुमच्या स्वप्नात मृत व्यक्ती संबंधी काही दिसत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय आहे? याबद्दल माहिती देणार आहोत.

तुम्ही खूप वेळा स्वप्नात तुमची एखादी जवळची मृत पावलेल्या व्यक्ती किंवा नातेवाईक मित्र पाहिले असेल याचा अर्थ काय आहे? ते व्यक्ती आपल्याला स्वप्नात येऊन काही सांगू इच्छित आहेत का? ते पाहूया. एखादी व्यक्ती कोणत्याही आजाराने स्वर्ग वासी झाला असेल.

तुमच्या स्वप्नात ती व्यक्ति एकदम स्वस्थ दिसत असेल तर या गोष्टीचा संकेत असा आहे की त्या व्यक्तीचा जन्म आता कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी झाला आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला स्वप्नामधून संकेत देऊ इच्छित आहे की ती व्यक्ती आता व्यवस्थित आहे. चांगल्या ठिकाणी त्याचा जन्म झाला आहे.

तर तुम्ही आता त्या व्यक्तीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. स्वप्न शास्त्रामध्ये अशा स्वप्नाला आश्वासन स्वप्न सांगितले जाते. अस स्वप्न जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही निश्चिंत राहावे आणि त्या व्यक्तीचे दुःख सोडून द्यावे. तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे की तुमचे पूर्वज आता चांगल्या ठिकाणी आहेत आणि तेथे खुश आहेत.

तर एखाद्या धडधाकट सदस्याचा मृत्यू होतो आणि तुमच्या सोबत आजारी दिसते तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिली आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये त्याची इच्छा सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

तुम्ही त्या स्वप्नाला व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करावा त्या स्वप्नांमध्ये त्याने त्याची इच्छा सांगितलेले असते किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर त्या त्याच्या काही इच्छा असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल व्यवस्थित विचार करावा. नक्की तुम्हाला व्यक्तीचा इशारा समजेल. तुम्हाला त्या व्यक्तीची इच्छा समजल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

त्यामुळे त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते त्याच बरोबर तुमच्या घरात सुख शांती आणि संपत्ती अधिक पटीने वाढू लागते. परंतु याउलट तुम्हाला त्या व्यक्तीची इच्छा माहित असून देखील तुम्ही जर ती पूर्ण करत नसाल तर याची खूप वाईट परिणाम होऊ शकतात.

घरावर खूप मोठं संकट येऊ शकतो जर आपल्या स्वप्नात एखादी जिवंत व्यक्ती मृत अवस्थेत दिसत असेल तर आपण खूप घाबरून जातो, परंतु स्वप्न शास्त्रानुसार जर एखादी जिवंत व्यक्ती मृत अवस्थेत असेल तर हा संकेत आहे की त्या व्यक्तीचे आयुष्य वाढले आहे. हा संकेत त्या व्यक्तीच्या वयोवृद्ध चे संकेत तुम्हाला देत असतो.

या स्वप्नाला वाईट स्वप्न नाही तर चांगले स्वप्न आहे असे स्वप्न शास्त्र मध्ये सांगितले आहे. की तुम्ही जे कार्य करत आहात, करण्याच्या विचारात आहात तर तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. जर स्वप्नात मृत व्यक्ती तुम्हाला उदास अवस्थेत दिसत असेल किंवा तुम्हाला भास होत असेल की तुमच्या द्वारे केलेल्या कार्यामध्ये तुमचे पूर्वज प्रसन्न झाले आहे तर असे कार्य करणे लगेच सोडून द्यावे.

कारण असे कार्य तुमच्या साठी काही विपरीत परिणाम घेऊन येऊ शकता. स्वप्नामधून आपले पूर्वज आपल्याला सावधान करत असतात, पण आपल्या ते समजत नसल्याने आपण खूप सार्‍या चुका करून बसतो. खूप वेळा आपल्या असेसुद्धा स्वप्न दिसत असतात ज्यामध्ये मृत पूर्वज आपल्या स्वप्नात येऊन एखादी वस्तू मागत आहेत.

परंतु ती काहीच बोलत नाहीत म्हणजेच पूर्वज आपल्याला स्वप्नात निर्वस्त्र दिसू शकतात किंवा त्यांचे पायात चप्पल नसतील, तेव्हा ती उपाशी असतात. म्हणजेच स्वप्नामध्ये मृत व्यक्ती कडे एखाद्या वस्तूची कमी असेल किंवा उपाशी असेल तर अशावेळी तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या मंदिरात जाऊन ती वस्तू दान करावी किंवा जेवन दान करावे आणि ते दान करत असताना ध्यान करावे की आपण ती वस्तू त्या मृत व्यक्तीला देत आहोत.

असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतात. जर स्वप्नात एखादी मृत व्यक्ती दूर आकाशात दिसत असेल तर स्वप्न शास्त्रानुसार हा संकेत आहे की त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती झाली आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला आशीर्वाद देत आहे.

जर स्वर्गवासी व्यक्ती तुमच्या घराच्या कुठे आजूबाजूला दिसत असेल तर हा संकेत आहे की त्या व्यक्तीला तुमच्या घरापासून दूर जायची इच्छा नाही आणि त्या व्यक्तीला तुमच्या घराची काळजी घ्यायची इच्छा आहे. जर असं तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर गोमातेला म्हणजे गाईला दोन भाकरी खाऊ घालाव्या आणि अमावस्येच्या दिवशी गोमातेला चांगले गोडधोड जेवण जेवू घालावे.

त्याचबरोबर शक्य झाले तर ब्राह्मण जेवण देखील द्यावे असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात तर अशा प्रकारे आपले पूर्वज हे आपल्याला स्वप्नामधून वेगळी इशारे देत असतात किंवा त्यांची खुशाली समजत असतात किंवा आपल्या सतर्कतेचा इशारा देखील देत असतात वेळीच आपण ते स्वप्न समजू शकलो तरी यामुळे पूर्वजांचे चांगले आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात आणि आपल्या घराची प्रगती होऊ शकते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *