काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा गुन्हेगार ससून रुग्णालयातून पळाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या हातात तुरी देत ससून हॉस्पिटल येथूल पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळला धमकी देणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला असून पोलिसांना चुकवून ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव असून 2 दिवसांपूर्वी मार्शल लुईस लीलाकरला पुणे पोलिसांंनी अटक केली होती.
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ याला धमकवल्या प्रकरणी पोलिसांनी लीलाकारला 2 दिवसांपूर्वी अटक झाली होती. तसेच आज पहाटेच्या सुमारास लीलाकरने पोटात दुखत असल्याचा बाहाणा केला त्यामुळे तात्काळ त्याला येरवडा जेलमधून ससून हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी आणण्यात आले होते.
मात्र यावेळी मार्शल लुईस लीलाकर याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, फरार असलेल्या मार्शल लुईस लीलाकराच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी तब्बल 8 पथके पाठवली असून त्याचा पोलीस त्याचा शोध घेत आहे. कारण या धक्कादायक घटनेनंतर पुणे पोलिसांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
काहीच महिन्यांपूर्वी शहरातील ड्रग्स माफिया ललित पाटील हा पोलिसांच्या हातावर गुंगारा देऊन असाच हॉस्पिटलमधून पसार झाला होता. त्यानंतर ड्रग्सचं मोठं रॅकेट समोर आलं होतं. दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातच उपचार घेत असताना एक्सरेसाठी नेत असताना त्यांने पळ काढली होती. मग त्यानंतर तो ससूनमध्ये उपचार घेत असताना देशात ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं होतं.
ससून रुग्णालयातील त्याचे काही फोटो समोर आले होते. त्यानंतर ससून रुग्णालयातील प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह सुध्दा उपस्थित करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आता कुख्यात शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी मार्शल लुईस लीलाकर याने ससून रुग्णालयातून पळ काढल्याचं समोर आलं असून त्यामुळे त्याला पकडणं हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर पत्नी स्वाती मोहोळला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. या प्रकरणी स्वाती मोहोळने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लीलाकर याला अटक केली होती.