दरम्यान, ईडीने या आधी मनी लाँड्रिंग संबंधित 2 वेळा आमदार रोहित पवारांची चौकशी केली होती. मात्र त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो लिमिटेडच्या संबंधित असलेली संपत्ती जप्त करण्यात आली असून ED ने ही कारवाई मनी लाँड्रिंग प्रकरणात केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
Ed ने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो लिमिटेड संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली असून त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत तसेच इतर गोष्टींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. तसेच कन्नड सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यानंतर राज्य सहकारी बँकेने त्याचा लिलाव होता. हा कारखाना 50 कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने खरेदी केला होता.
मात्र, या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच प्रकरणी आज ED ने बारामती अॅग्रो लिमिटेडची चौकशी केली असत या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे ED कडून ही मोठी कारवाई करण्यात आला असल्याचे सांगितले जाते.
बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी होत्या. तसेच हायटेक कंपनीने लिलावासाठी 5 कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती अॅग्रो लिमिटेडकडून घेतल्याची चर्चा केली जात होती. तसेच विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रो लिमिटेडने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप देखील करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच बारमती अॅग्रो लिमिटेडचे कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह 6 ठिकाणी EDनं छापेमारी केली होती. याचबरोबर, आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो लिमिटेड कंपनीची मालकी आहे. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडच्या 6 कार्यालयांवर छापेमारी करत ED कडून तपास करण्यात आला होता.
मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ED कडून नोटीस देखील बजावण्यात आली होती. दरम्यान, बारामती अॅग्रो प्रकरणी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांची याआधी देखील 2 वेळा चौकशी करण्यात आली होती. तसेच आता ED मार्फत कन्नड कारखान्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात आली आहे.