देश आधीच हुकूमशाहीच्या मार्गावर जात असल्याचे दिसून येत आहे, त्याच दरम्यान मोदींच्या हाती सत्ता देणं अत्यंत धोकादायक ठरू शकते असे शरद पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात बोलल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-सपा प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत येण्या विरुद्ध इशारा दिला असून ते भारतात “हुकूमशाही लादनार” असे अधोरेखित करत सांगितले.
दरम्यान, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेवर आणणे गे देशहितासाठी धोकादायक ठरू शकते. कारण ते देशात हुकूमशाही आणतील, असे पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सभेला संबोधित करताना सांगितले. तसेच काही लोक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या देशात आले होते.
दोन दिवसांपूर्वी ते मला भेटले. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही भारतात का येत आहात?’. त्यांनी मला सांगितले की भारतात लोकशाही टिकेल की नाही हे पाहण्यासाठी ते आले होते. म्हणूनच मी म्हणतोय ही निवडणूक सोपी नाही. नरेंद्र मोदींना आणखी एक संधी देणे धोक्याचे ठरेल, असे धक्कादायक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
तसेच देश आधीच हुकूमशाही मार्गावर असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, “मोदी सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले, तसेच अरविंद केजरीवाल यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात चांगले काम केले आहे. मात्र मोदींच्या विरोधात बोलल्याने त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. यावरून मोदी देशात हुकूमशाही आणण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत देशात एकही निवडणूक झालेली नाही. मग त्यामध्ये “पंचायत समित्या असो किंवा जिल्हा परिषदा असो की नागरी निवडणुका, सर्व स्थगित करण्यात आले आहेत. सरकारने ते होऊ दिलेले नाही. देशात हुकूमशाही आणू इच्छिणाऱ्या या सरकारला आपल्या मार्गावर थांबवायचे असेल, तर लोकांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.