पाच-सहा महिन्यांपूर्वी एक नवीन मोबाईल विकत घेतला. आणि आज त्या मोबाईल च्या बॅटरी ची अवस्था अशी आहे की, मी मोबाइल चार्जिंग करायला लागलो की चार ते पाच तास चार्जिंग करण्यास लागतात. आणि बॅटरी फुल चार्ज झाली की अर्धा ते पाऊण तासात ही बॅटरी पूर्णपणे उतरते.
असे नेमका का होतंय? हे ज्यावेळी मी कस्टमर केअर कडे गेलो आणि त्यांना विचारल, त्यावेळी त्यांनी हात वर केले. आणि ते म्हंटले बॅटरीला कोणतीही वॉरंटी गॅरंटी येत नाही. सहा महिन्यांची वॉरंटी असते, तुम्हाला सहा महिने आणि वरती काही दिवस झालेले आहेत. आता कमीतकमी बॅटरी ही तीन ते चार वर्षे तरी टिकायला हवी.
मात्र पाच सहा महिन्यात बॅटरी कसे काय खराब झाली? तर असा मी विचार करत असताना, मी इंटरनेटवर सर्च केलं आणि त्यावेळी जी माहिती कळली, लक्षात आली की आपण चार्जिंग करताना कोणत्या चुका करतो. तर ही महत्त्वाची माहिती तुमच्या पर्यंत शेअर करायला हवी की, जेणेकरून आपलं हे नुकसान होत ते होणार नाही, आणि नुकसान टाळता येईल.
बऱ्याचदा आपण मोबाईल विकत घेतो, पण मॅन्युअल जे त्यामधे असत ते आपण कधीही वाचत नाही. या माहिती पुस्तिकेत संपूर्ण माहिती दिलेली असते. मात्र आपण चार्जिंग करताना ज्या चुका करतो त्यामुळे आपली बॅटरी लवकर उतरते, कधीतरी बॅटरी फुगते सुद्धा.
तुम्ही बघितल असल की बॅटरी फुगते आणि मग नवीन बॅटरी घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. बऱ्याचदा मोबाईलचा स्पोर्ट सुद्धा झालेला तुम्ही ऐकले असेल, याला सुद्धा चार्जिंग करतानाच्या चुकाच कारणीभूत आहेत. काही काही जणांचा मोबाईल गरम होतो.
वारंवार तक्रार की मोबाईल जरास गेम वैगरे खेळलं की गरम होतो, काही केलं की मोबाईल गरम होतो, किंवा चार्जिंग करताना सुद्धा तो गरम होतो, त्याला ओवरहीटिंग असे म्हणतात. तर ही सुद्धा चूक आपली चार्जिंग करण्याची चूकच आहे. आज तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहे की, या पाच गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या मोबाईलची हेल्थ चांगली राहील, तुमची बॅटरी सुद्धा दीर्घकाळ टिकेल, ती खराब नाही.
सर्वात पहीली गोष्ट म्हणजे चार्जिंगला ज्यावेळी तुम्ही मोबाईल लावाल त्यावेळी मोबाईलचा कवर काढून ठेवा. तुम्ही म्हणाल अस का करायचं? याचं कारण आहे की हे जे कवर असत हे बॅटरीला मिळणारा हवेचा पुरवठा रोखत. थोडक्यात बॅटरीला हवा मिळत नाही. आणि परिणामी मोबाईल गरम होऊ लागतो.
आणि ज्यावेळी मोबाईल गरम होतो त्यावेळी आपोआपच बॅटरी वरती त्यांचा खूप निगेटिव्ह इफेक्ट पडतो, बॅटरी लवकर खराब होते. तसंच तुमचा जो डिस्प्ले आहे, तुम्ही पाहिल असेल की मोबाईल नवीन तुम्ही ज्यावेळी विकत घेता त्यावेळी तो खूप चांगला असतो, अतिशय ब्राईट असे कलर असतात.
2,3 वर्षानंतर पाहिलं तर त्या मोबाईलकडे पहावसं सुद्धा वाटत नाही. त्यामध्ये जे काही आपण म्हणतो ब्राईटनेस म्हणतो स्क्रीनचा तो अतिशय डल झालेला असतो तर ह्याला हे महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही कवर अवश्य वापरा, कवर पाहिजे पण चार्जिंग करताना आपण काढून ठेवा. दुसरी गोष्ट तुम्हाला कंपनीने जो चार्जर दिलाय तोच चार्जर वापरा.
तुम्ही जर कोणताही चार्जर वापरू लागलात, उदरणार्थं रेडमी चा तुमचा मोबाईल आहे आणि तुम्ही सॅमसंग किंवा नोकिया वैगरेचे जर चार्जर वापरू लागलात, तर त्यामुळे सुद्धा तुमची बॅटरी लवकर खराब होते. प्रत्येक कंपनीचे चार्जर आहे त्याच MAH म्हणजेच किती अँपिअर करंट पाठवायचा आहे ठरलेलं असतं.
तर तोच चार्जर तुम्ही वापरा. जर तोच चार्जर नसेल, खराब झाला असेल तर दुसरा तुम्ही विकत घेऊ शकता. जरासा महाग पडतो एक चार्जर 400 ते 500 रुपयांना मिळतो. पण आपला मोबाईल दहा ते बारा हजार, वीस हजारचा मोबाईल असतो. आणि त्या तुलनेत जर आपण पाचशे ते सहाशे रुपये पाहायला लागलो, तर या पाचशे रुपयासाठी तुमचं 20000 रुपयाचं नुकसान हे नक्की होणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.
आणि हो चायनीज चार्जर चुकूनही वापरू नका. चायनीज म्हणजे काय ते बाजारात 30 रुपयांपासून ते 60, 70 रुपयांपर्यंत मिळतात, असे चार्जर कदापिही विकत घेऊ नका. तिसरी गोष्ट मोबाईल चार्जिंग करताना मोबाईल नेहमी स्विच ऑफ करावा. जर शक्य नसेल तर कमीत कमी फ्लाईट मोडवर तरी टाकावा. जर तुम्ही तसाच मोबाईल चार्जिंगला लावत असाल, तर त्यामुळे एका बाजूला चार्जिंग चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलचे नेटवर्क चालू राहतात.
म्हणजे मोबाईल कामही करतोय आणि इकडे चार्जिंगही चालू आहे. थोडक्यात तुम्ही जॉब वर सुद्धा गेलाय, आणि काम करता करता तुम्ही जेवण सुद्धा करत आहे, तर अशी परिस्थिती होते. त्यामुळे दीड ते दोन तास लागतात मोबाईलला फुली चार्ज होयला. अलीकडे तर अर्ध्या पाऊण तासातच मोबाईलच्या होतात.
तर त्या अर्ध्या पाऊण तासासाठी किंवा एक दोन तासांसाठी तुम्ही मोबाईल स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोड वरती ठेवायला हवा. पुढची गोष्ट आपली बॅटरी किती टक्के पर्यंत चार्ज करायची हे अनेक जणांना समजलं नाही. शंभर टक्के पर्यंत चार्ज करतात, बरेच महाभाग तर असे आहेत 100% चार्ज झाल्यानंतरसुद्धा चार्ज काढत नाही, म्हणतात अजून होवूदेत.
शंभर टक्केच्या वर अजून कसली चार्जिंग होणार आहे. मॅन्युअल अस सांगत कंपन्यांच की, बॅटरीची चार्जिंग 90 ते 95%. जास्तीत जास्त 95 टक्क्यापर्यंत करा, त्यापुढे चार्जिंग करू नका. जे लोक 95 टक्केचे वर आपल्या मोबाइला चार्ज करतात त्यांचे मोबाईल लवकर खराब होतात, बॅटरी फुगते, आणि ओवरहीटिंगचा प्रॉब्लेम तर शंभर टक्के होतोच.
तुमचा मोबाईल 100% गरम होणारच, तर ही काळजी घ्या. आणि शेवटची गोष्ट ज्यांच्याकडे लॅपटॉप किंवा कम्प्युटरस् आहेत, डेस्कटॉप कम्प्युटर्स आहेत, ते त्याला युएसबी केबल जोडतात. आणि मग त्याला मोबाईल लावून ठेवलेला असतो, अगदी चोवीस तास.
त्या युएसबी तून तुमच्या मोबाईलची चार्जिंग तर चालू आहे बरोबर, पण जो करंट त्याला मिळतोय, जी चार्जिंग साथीची क्षमता पाहिजे, MAH जे आवश्यक आहे ते मात्र अतिशय कमी मिळते. त्यामुळे खूप स्लोली मोबाईल चार्ज होवू लागलाय. थोडक्यात एखाद्या वीस पंचवीस वर्षाच्या तरुणाला चमच्याने अन्न भरवायचे, जसं आपण लहान बाळाला अन्न भरवतो ना अगदी तसं भरवण्यासारख.
ह्याने काय होणार आहे, एकतर त्याची भूक भागणार नाही, दुसरी गोष्ट तो दुबला पतला, म्हणजे त्याची हेल्थ पूर्णपणे खराब होणार आहे, हे ठरलेल आहे. तर हीच गोष्ट इथे सुद्धा आहे. युएसबी केबलचा वापर कुठे आहे की डाटा. तुमच्या कम्प्युटरमधला डाटा मोबाईल मध्ये, किंवा मोबाईल मधला डाटा कम्प्यूटर मध्ये घेणे इतक्या पुरताच मर्यादित आहे. युएसबीने चार्जिंग कधीही करायची नसते.
अशा काही या चार पाच गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, तर तुमच्या सुद्धा मोबाईलची बॅटरी चांगली टिकेल. आणि बॅटरी जर व्यवस्थित राहिली, मोबाईल जर गरम झाला नाही, ओवरहिट जर झाला नाही, तर तुमचा मोबाईल सुद्धा तुम्हाला खूप वर्ष चांगली सेवा देणार आहे. या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मोबाईलची हेल्थ तर चांगली नक्कीच ठेवतात, आणि तुमचा मोबाईल तुम्हाला अधिक काळ साथ देईल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.