नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” तुम्हाला डिप्रेशन वाटते, तर म्हणा तारक मंत्र. कामे तुमची आडली आहेत, तर म्हणा तारक मंत्र. भीती वाटते, एकाकी एकत पडल्यासारखं वाटतंय, तर म्हणा तारक मंत्र. रडू येतंय, उदास वाटतंय, तर एकच औषध किंवा एकच उपाय यावर आहे तो म्हणजे स्वामींचा तारक मंत्र.
कोणीतरी सोडून गेले, नात्यात दुरावा आलाय, नाते तुटले आहे, काहीही असू द्या, म्हणा तारक मंत्र. उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे आपला तारक मंत्र. तारक मंत्रा ची एक एक ओळ मनापासून व समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे तुम्हाला नक्की कळेल.
मंत्राच्या पहिल्या ओळीत सांगितले हे मना तू निशंक हो, निर्भय हो, स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. महाराज स्मृतगामीआहेत त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात. त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला स्वतः काळ ही हात लावू शकत नाही.
स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगाय चे उगाची भितोसी। भय हे पळू दे।। स्वामी माऊली असताना भय ते कसले. नंतर आहे नको घाबरु,तु असे बाळ त्यांचा।। या ओळीत सर्वकाही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो.
मग एक आई आपल्या बाळाला एकट कस पडू देईल. आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहेत. अब्ज आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले. कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे.
नंतर आहे खरा होई जागा श्रद्धा सहित।कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त।। आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे कळणार कि ती जे काही आपल्या मुलांसाठी करते याची थोडीतरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीच महाराजांच आहे.
महाराजांवर असलेलं प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणा द्वारे व्यक्त करायचे. महाराजांना बाकी आपल्याकडून कसली अपेक्षा नाही. नंतर आहे आठवा कितीदा दिली त्यांनीच साथ। नको डगमगु स्वामीच देतील हात।। आईच तर पहिली व्यक्ती असते.
ती आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते,तेच महाराजांच आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरण अशक्य. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल. तेच आहे तारक मंत्रात. महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले ते अजिबात आपण विसरायचं नाही.
नंतर हे मना तू फक्त निशंक हो निर्भय हो। तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ आपण नित्य करावेत आणि चमत्कार अनुभवा वा. स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी आपल्याला लावते. महाराज तुम्ही खरच किती दयाळू आहात, तुम्ही भक्त म्हणून आम्हाला निवडले.
तर तुम्ही कोणत्याही समस्ये मध्ये, अडचणीमध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये, तारक मंत्र म्हणा तुम्हाला लगेच अनुभव येईल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.