“श्री स्वामी समर्थ” आपल्या प्रत्येकाच्या मनात येते की मी कोणाचे वाईट केले नाहीये तरी माझ्यासोबत एवढे वाईट का होते? मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो त्याची सेवा करतो. चांगल्या मार्गावर चालतो चांगले कर्म करतो. तरीही माझ्या सोबत सगळे वाईट का होते.
असे भरपूर विचार तुमच्या आमच्या भरपूर लोकांच्या मनात येतच असतात. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर स्वामी समर्थांनी दिलेले आहेत. एकदा अर्जुन कृष्णा ला विचारतो की, हे वासुदेवा नेहमी खऱ्या आणि चांगल्या मानसा सोबत वाईट का होते? यावर कृष्णाने एक गोष्ट सांगितली.
या गोष्टीमध्ये सगळ्या मनुष्यांचे प्रश्नाचे उत्तरे आहेत. कृष्ण म्हणतो की एका नगरमध्ये दोन पुरुष राहत होते. पहिला व्यापारी होता आणि एक चांगला माणूस होता. धर्म आणि नीती चे पालन करायचा, चांगले कर्म करायचा. देवाची भक्ती करायचा आणि मंदिरा मध्ये जाऊन देवाची सेवा करायचा.
सगळ्या चुकीच्या कामापासून दूर राहायचा. आणि जो दुसरा माणूस होता, तो वाईट प्रवृत्तीचा होता. वाईट कामे करायचा. खोटे बोलायचा. तो नेहमी अनीती आणि अधर्माचे काम करायचा. तो नेहमी मंदिरातून पैसे आणि चप्पल चोरायचा. वाईट संगतीत होता, आणि व्यसनी होता.
एका दिवशी त्या नगरांमध्ये खूप जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते हे बघून त्या वाईट माणसाने मंदिरातले सगळे पैसे चोरले, आणि तिथून पळून गेला. थोड्या वेळात तो चांगला व्यापारी त्या मंदिरात दर्शन करण्याच्या हेतूने गेला, तर त्यावर लोकांनी चोरीचा आरोप केला.
तेथे असलेले सगळे लोक त्याला वाईट बोलू लागले, चोर बोलू लागले, त्याचा खूप अपमान केला. तो जसे तसे करून मंदिराच्या बाहेर आला. बाहेर येताच एका बैलाने त्याला मारले, पायाखाली चिरडले. तो व्यापारी गंभीर जखमी झाला. आणि तिकडे थोड्या अंतरावर त्या वाईट माणसाला पुन्हा एक पैशांनी भरलेली पोटली मिळाली.
तो विचार करू लागला, आजच्या दिवस किती चांगला आहे. आत्ता मंदिरातून धन मिळाले आणि आता पुन्हा एवढा पैसा मिळाला. जखमी झालेल्या माणसाने हे सगळे ऐकले तो घरी आला आणि त्याने घरातून सगळ्या देवांच्या मुर्त्या फोटो काढून टाकले. आणि देवतांवर रुष्ट होऊन जीवन जगू लागला.
खूप वर्षानंतर त्या वाईट माणसाची आणि चांगल्या माणसाची मृत्यू झाली. तेव्हा ते यमराजाचा समोर गेले. तर चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न विचारला. मी तर नेहमी चांगले कर्म केले, कोणाचे वाईट केले नाही, तरी मला का दुःख, अपमान मिळाला आणि याने अधर्म केला, तरी याला धनाची पोटली मिळाली असे का?
व्यापारीच्या या प्रश्नावर यमराजाने उत्तर दिले, ज्या दिवशी तुझ्यासोबत जी दुर्घटना घडली, बैलाने तुला उडवले, पायाखाली चिरडले, तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता. परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू फक्त जखमेमध्ये प्रवृत्ती झाली आणि या वाईट माणसाला राज योग मिळणार होता, पण याच्या वाईट कर्मामुळे तो राज योग फक्त एका छोट्या धनाच्या पोटली मध्ये परिवर्तित झाला.
स्वामी म्हणतात की भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपात देतो हे सांगणे कठीण असते. परंतु तुमचे चांगले कर्म, वाईट कर्मा पासून तुम्ही दूर आहात, तर तुम्ही ज्यांची सेवा करत आहात. ज्याला तुम्ही पूजत आहात, त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच होते.
जीवनात येणाऱ्या समस्या, दुःख, संकट किंवा काहीही जे तुमच्या सोबत होत असेल, त्यांना काधीही हे समजू नका की देव तुमच्या सोबत नाही आहे. आणि तुमच्या सोबतच का वाईट होत आहे. असे असू शकते की, तुमच्या सोबत यापेक्षा जास्त वाईट होणार होते, यापेक्षा जास्त संकट येणार होते, पण तुमच्या सेवेमुळे तुमच्या चांगल्या कर्मामुळे ते सगळे कमी झाले.
तर तुम्हाला असे वाटत असेल की माझ्या सोबतच का वाईट होते? मी तर चांगले कर्म करतो. तर जे वाईट तुमच्या सोबत झाले आहे त्यापेक्षा वाईट तुमच्या सोबत होणार होते आणि तुमच्या चांगल्यात कर्मामुळे तुमच्या सेवेमुळे ते खूप कमी प्रमाणात तुमच्या पर्यंत आले आहे असे समजून तुम्ही आयुष्य जगा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.