गेल्या काही दिवसापासून पुण्यात अनेक मोठ्या घटना घडत आहेत. त्यामध्येच आज पुण्यात अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून ज्यामध्ये काही नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर 15 दिवस डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केले. तसेच त्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करायला लावत असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे अतिशय चिड आणणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी या घटनेनंतर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. आज महाराष्ट्रात माणुसकी मेली आहे का? अजून किती दिवस महिला असुरक्षित राहणार ? असे प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना सध्या महाराष्ट्रात घडताना दिसत आहेत.
त्यामध्ये विशेष म्हणजे विद्येचं माहेरघर मानलं जाणाऱ्या पुणे शहरात घडत आहेत. यामध्ये भारतच्या कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी घेण्यासाठी पुण्यात येत असतात. पण याच विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार होय असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
ज्यामध्ये आरोपींनी पीडित मुलीला डांबून ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. संबंधित प्रकार अतिशय संतापजनक आणि किळसवाणा असून पीडित मुलीच्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतेलेले अवघ्या 30 हजार रुपयांसाठी आरोपींनी हे कृत्य केलं असल्याचे तपासातून समोर आले.
संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेत पीडितेचा दोष होता तरी काय? आणि इतकं निर्घृण कृत्य करणाऱ्या आरोपींना पीडित मुलीची दया कशी आली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे पती-पत्नी आहेत. त्यामुळे आरोपी महिलेला पीडितेबाबत कोणतीही सहानुभूती वाटली नसावी? आरोपी महिला इतकी निर्दयी असावी? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.