आज आपण स्वामींची एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. प्रचंड मनोबल देणारी, मनोबल वाढवणारी, आत्मविश्वास वाढवणारी, खचलेल्यांना धीर देणारी, जगायची नवी उमेद, नवी आशा दाखवणारी, अशी एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत. आणि त्यावरून आजचा स्वामी संदेश देखील असणार आहे.
महाराजांचे निस्सीम भक्त श्री चोळप्पा महाराज हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांचा पुत्र कृष्णप्पा त्याची ही गोष्ट. एकदा कृष्णप्पाची मुंज झाली. मुंज झाल्यानंतर काहीच दिवसांनी कसलेशा आजाराने कृष्णप्पाचा मृत्यू झाला. चोळप्पा महाराजांच्या घरात प्रंचड आक्रोश पसरला, त्यांच्या कुटुंबावर शोककळा आली.
कृष्णप्पाच्या मृत्यूचे सारे जन दुख करू लागले. त्याच दरम्यान स्वामी महाराज तिथे आले. स्वामींनी सर्व गोंधळ पाहिला आणि सर्वांना ओरडले, की अरे मुर्खानो रडता कसले याच शुभलग्न अजून व्हायचं आहे असे म्हणून स्वामी कृष्णप्पाच्या जवळ जाऊन बसतात. आणि त्याला हाक मारू लागतात.
स्वामी म्हणाले की, ”अरे निळकंठा ऊठ, अरे ऊठ आमच्या बरोबर दोन शब्द बोल,” असे स्वामींचे अमृततुल्य वचन ऐकताच कृष्णप्पाच्या मृतदेहाची हालचाल सुरू झाली. त्याच्या सर्वांगात उष्णता निर्माण व्हायला लागली. आणि हळू हळू त्याने डोळे उघडले. डोळे उघडुन तो आजूबाजूला पाहू लागला, आणि थोड्याच वेळात तो उठूनही बसला.
सगळ्यांना हे दृश्य पाहून फार आनंद झाला. आणि सगळीकडे आनंदाची उत्साहाची लाट पसरली. सगळ्यांनी स्वामींचे खूप खूप आभार मानले. आणि स्वामींचा जयजयकार त्या ठिकाणी झाला. पुढे लवकरच स्वामींच्या कृपाशीर्वादाने कृष्णप्पाच लग्न देखील झालं. अणि सगळ काही छान पुढे झालं. आजची गोष्ट ऐकली की दोन वाक्य आपल्याला आठवतात.
ती म्हणजे तारकमंत्रा मधील वाक्य. “अशक्य ही शक्य करतील स्वामी, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरु तू असे बाळ त्यांचा”. बघा ही किती विचित्र म्हणजे किती वेगळी लीला आहे. स्वामींनी जे अशक्य होत ते ही शक्य करून दाखवलं. आणि जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, ही दोन्हीही वाक्य ही गोष्ट अगदी तंतोतंत सत्य सिद्ध करून दाखवली.
पण इथे एक गोष्ट इथे महत्वाची लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे चोळप्पा महाराज हे जे होते ते स्वामींचे निस्सीम भक्त होते. स्वामी अगदी त्यांच्या घरी राहिलेले आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हा त्यांची जी मूल होती ती स्वामींच्या अंगाखांद्यावर खेळायची. स्वामी त्यांना आपल्या आजोबांसारखे होते. इतकं त्यांचं स्वामींवर प्रेम होते.
अणि बघाना जेव्हा अशी दृढ भक्ती, अशी अढळ भक्ती, असं निस्सीम प्रेम जेव्हा आपण स्वामींवर करतो तेव्हा स्वामी सुद्धा आपल्यावर तितकच प्रेम करतात. बघा जसं कृष्णप्पाला त्यांनी आपल्या कथेमध्ये कृष्णप्पाला मृत्यूच्या दाढेतून, दारातून खेचून आणलं.
तसच हे अगदी योग्य उदाहरण म्हणजे, जो भक्त जितका जास्त विश्वास आपल्या स्वामींवर तितकेच आपल्याला जास्त अनुभव अणि स्वामी सुद्धा तितक्याच ताकदीने आपल्या पाठीशी उभे राहतात, आपल्या भक्तांची साथ देतात. बघाना लक्ष्मण कोळ्याची गोष्ट, त्या गोष्टीमध्ये देखील जेव्हा त्याने साद घातली स्वामींनी त्याचे प्राण वाचवले होते.
अणि या चोळप्पा महाराजांच्या गोष्टीत सुद्धा आपण तशीच, त्याच पद्धतीची लीला पाहिलेली आहे. आपण या अशा कथा का पाहतोय तर साधायची जी आजूबाजूची जी परिस्थिती आहे, ती प्रचंड घाबरून टाकणारी, मानसिक दडपण आणणारी परिस्थिती आहे.
अशा वेळी होवू शकत किंवा संकटात असताना, वाईट वेळ असताना, असं अनेकदा होत की आपण खचून जातो. मार्ग सापडत नाही. काय करायचं मनात प्रचंड गोंधळ निर्माण होतो, मोठा पेच निर्माण होतो. आपल्याला असं वाटतं की आता आपण हरलो आहे, आता काहीच होवू शकत नाही.
हेच आहे की पुढे मार्ग दिसू शकत नाही. सगळा काही अंधकार दिसू लागतो. अशा वेळी आपण नकारात्मकतेच्या गर्केत जातो. पण या स्वामींच्या अशा लीला आहेत, स्वामी भक्तांचे असे अनुभव, अशा ह्या ज्या कथा आहेत, याच आपल्याला अशा वेळी एक उमेदीचा किरण दाखवतात.
एक जगण्याची नवी उमेद, आपल जे खचलेल मन आहे, आपण जे दुर्बल झालेले आहोत, त्यात आपल्याला एक नवी ऊर्जा प्रदान करतात. ह्यामुळे आपण स्वामींच्या ह्या लीला ऐकत आहोत. एक सुंदर उदाहरण, एक लहान मूल आपल्या घराच्या अंगणामध्ये छान खेळत, बागडत असत.
घराच्याच पायरीवर बसून त्याची आई आपल्या मुलाचं हे खेळणं बघून आनंद घेत, हसत, छान बसलेली असते. तितक्यात होत काय की आकाशात जोरात गडगडाट होत, मूल अगदी घाबरून आईच्या कुशीत पळत. आई सुद्धा अगदी त्याला आपल्या छातीशी हृदयाशी कवटाळते. मूल अगदी नीचिंत होत. त्याला माहित होत की आता आपण आईच्या कुशीत आलेले आहोत.
आता आपल्याला काहीही होणार नाही. आता आपण अगदी सुखरूप आहोत. तोही अगदी आईला घट्ट मिठी मारतो. आई पण त्याला घट्ट मिठी मारून त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. आपल सुद्धा अगदी असच आहे. जेव्हा आपल्यावर संकट येत, वाईट वेळ येते, तेव्हा आपणही असेच या लहान मुलासारखे घाबरून जातो.
अणि मग आपण कुठे जातो तर आपल्या आईकडे म्हणजेच स्वामी माऊली कडे. कारण आपल्याला माहिती आहे की हे “अशक्य ही शक्य करतील स्वामी”. जे आपल्याला अशक्य आहेना ते सगळ स्वामींना शक्य आहे. आणि मग आपण स्वामी मऊलींकडे धाव घेतो. आणि स्वामी सुद्धा अगदी तितक्याच माऊलीच्या, आईच्या प्रेमाप्रमाणे आपल्यालाही छातीशी कवटाळतात.
आपल्यालाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात. जोपर्यंत भक्त संकटातून बाहेर येत नाही. तोपर्यंत स्वामी ही झटत असतात त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी. त्याला कमीतकमी त्रास होवून तो त्यातून बाहेर निघावा, त्याला योग्य मार्ग दिसावा. आणि त्याच सगळ छान, भल व्हावं. हाच स्वामींचा नेहमी प्रयत्न असतो.
एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जितका जास्त आपला स्वामींवर विश्वास तितकेच जास्त चांगले अनुभव, प्रचिती या सगळ्यात आपल्याला येणार. जेवढा जास्त विश्वास, जेवढी जास्त दृढ, अटळ स्वामींवर भक्ती तेवढेच जास्त म्हणजेच प्रचंड ताकदीचे, चांगले चांगले अनुभव आणि प्रचिती तुम्हाला तुमच्या आयुष्यात येते.
त्यामुळे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की कितीही काही झालं, संकट आली काहीही झालं तरी स्वामी भक्तीत फरक पडून द्यायचा नाही. उलट अशा वेळी जास्तीत जास्त स्वामी भक्ती करायची. जेव्हा जेव्हा घाबरायला होईल, आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला घाबरून टाकेल, दडपण आणेल. त्यावेळेस स्वतः ला हे बजावत राहायचं आहे की आपले स्वामी नेहमी म्हणतात की, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.
हे वाक्य समोर आणायचं आहे. आणि मनाला बजावून सांगायचं आहे की काहीही असुदेत स्वामी माझ्या पाठीशी कायम आहेत. आणि म्हणून जेव्हा जेव्हा संकट येईल, वाईट वेळ येईल, तेव्हा तेव्हा जास्त ताकदीने स्वामींना पूर्ण शरण जावून त्यांची भक्ती करायची आहे.
जसं प्रभू श्री रामांनी रावणाचा अंत केला, तसच आपणही स्वामी भक्तीत तल्लीन होवून आपल्या आतली नकारात्मकता, नकारात्मक विचार आहेत त्या सगळ्याला स्वामींचे नामस्मरण करत स्वामी भक्ती करायची. या सगळ्याने त्याचा नाश करायचा आहे. जे काही नकारात्मक विचार, नकारात्मकता आहे ती स्वामींचे नामस्मरण आणि स्वामी भक्ती हा एकच उपाय आहे त्याचा नाश करण्यासाठी.
तर आजपासून आपण ठरवूया की जास्तीत जास्त स्वामींचे नामस्मरण करणार, जास्तीत जास्त स्वामी भक्ती करणार, आणि स्वामींच्या जवळ जाण्याचा जास्तीत जास्त मनापासून पूर्ण श्रद्धाभावाने, पूर्ण समर्पण भावाने प्रयत्न करणार. स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात, आणि सुरक्षित ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.