मांजर पुन्हा पुन्हा घरात येऊ लागली तर सावधान! वास्तु शास्त्रानुसार मांजर शुभ कि अशुभ? ।। जाणून घ्या या लेखात !

कला शिक्षण

मांजरीच घरात वारंवार येण हे शुभ आहे कि अशुभ आहे, याविषयी आज आपण नारदपुराण नुसार माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की, रस्त्याने चालताना जर मांजरीने आपला रस्ता ओलांडला तर, आपण जे काही काम करायला चाललो असतो त्यामध्ये नक्की अडथळे येतात.

म्हणून जुनेजाणते म्हणजे आपले पूर्वज त्यांनी सांगून ठेवले की, मांजरीने तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्ही जे काही महत्त्वाचं काम करायला चाललेले आहात ते काही काळासाठी स्थगित करा. थोडासा काळ व्यतीत होऊ दे आणि मग ते काम करा. म्हणजे कामात अडथळे येणार नाहीत.

मांजरीचे दिसण तसेच मांजरीचा आवाज हा नारद पुराणानुसार अपशकुन आहे. मात्र या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्ही घरांमध्ये मांजर पाळू शकता. मांजर अतिशय छान प्राणी आहे, आपण मांजरी वर खूप प्रेम करतो, अगदी जीवापाड त्यांना जपतो. त्यांनी घरात मांजर पाळले आहे त्यांच्या मांजरावर खूप प्रेम असतं ते वात्सल्य करतात प्रेम भावनेने त्यांना वागवतात.

त्यांनी मांजर पाळली आहे ही माहिती त्यांच्यासाठी नाहीये. मात्र हे वाचल्यानंतर तुमच्या भावनांना ठेस पोहोचू शकते, तुम्ही दुखावले जाऊ शकता, जे शास्त्र सांगते ते सांगणं आमचं कर्तव्य आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव आम्हाला करता येणार नाही. मात्र याठिकाणी एक गोष्ट अगदी खात्रीने आम्ही सांगतो की मांजर पाळणे ही गोष्ट अशुभ नाहीये.

त्यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची बला कोणतेही संकट अजिबात येणार नाही. आपण पाहूया की नेमकं नारदपुरान नेमकं काय म्हणत. नारद पुरणा नुसार तुमच्या घरामध्ये तुम्ही मांजर पाळू शकता मात्र जर एकापेक्षा जास्त मांजरी पुन्हा पुन्हा घरामध्ये येऊ लागल्या तर मात्र काही तरी अशुभ नक्की घडत.

काहीतरी चुकीचं अकल्याणकारी नक्की घडत. कारण अशा प्रकारे एका पेक्षा जास्त मांजरीचं घरामध्ये येणे हे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देते. त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते. सकारात्मक ऊर्जा चा नाश होतो. असं म्हणतात की ज्या घरामध्ये पुन्हा पुन्हा मांजर येऊ लागतात त्या घरातील लोकांच्या आरोग्यामध्ये चढ-उतार पाहायला मिळतात.

आरोग्य ढासळू लागत, या ना त्या कारणाने घरातील लोक आजारी पडतात. आरोग्याबरोबरच अजूनही अनेक समस्या त्या घरामध्ये निर्माण होतात. एक समस्या संपली की दुसरी निर्माण होते. दुसरी संपली की तिसरी. समस्यांची शृंखला त्या घरांमध्ये निर्माण होते.

अडचणी संपता संपत नाहीत आणि म्हणून तुमच्या घरामध्ये ,मांजर पुन्हा पुन्हा येत असतील तर एकच उपाय त्यांना येऊ देऊ नका. ज्या घरामध्ये नित्य देवाची पूजा केली जाते देवघराला स्वच्छ ठेवले जात त्या घरांमध्ये मांजरीच्या येण्याने कोणताही परिणाम दिसत नाही.

कारण देवपूजेचा प्रभाव असतो किंवा मांजरीचे येण्याने जी काही नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिला नष्ट करण्याचं काम देवपूजा करत असते. मात्र देवपूजेचे काही नियम असतात आणि हे नियम सर्वांनाच पालन करन शक्य होत नाही. म्हणूनच जास्त मांजरी येऊ लागल्या तर तुम्हाला असे दिसते की या मांजरिंची संख्या वाढतच चालले आहे.

तर मात्र हा एक संकेत आहे की नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येऊ शकत. म्हणूनच हा सावधानतेचा होण्याचा इशारा आहे. शास्त्रांमध्ये जी काही माहिती सांगितलेली असते ती तुमचं जीवन कल्याणकारी व्हावं, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही समस्या येऊ नये. तुम्ही सुखी ,संपन्न, आयुष्य लाभावे यासाठी असते.

तुमच्या मनामध्ये भीती बसावे तुम्ही घाबरावं आणि मग देवाचा धावा करावा अशा प्रकारे शास्त्र कधीही कोणतीही माहिती पुरवत नाहीत. मांजरीविषयी काही अशा अपशकुनी घटना आहे. जरी तुमच्या घरा मध्ये एका पेक्षा जास्त मांजरी नसतील, एकच मांजर आहे. तुम्ही झोपलेले असताना जर तुमच्या अंगावरती अचानक मांजर पडली तर हे मृत्यूचे प्रतीक आहे.

या ठिकाणी तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्ही सावधानता बाळगायला हवी एखादा मोठा अपघात होऊ शकतो. एखादा मोठा आजार डोकं वर काढू शकतो. मृत्यू ने हा एक संकेत दिलेला आहे की कदाचित तुमच्या वरती मोठं संकट तुमच्या जीवावर बेतू शकतं आणि म्हणून सावधान होण्यासाठी शास्त्राने आपल्याला ही माहिती पुरवली आहे.

घरामध्ये जी वृद्ध स्त्री आहे त्या वृद्ध स्त्रीच्या डोक्यावर जर एखाद्या मांजराने पंजा मारला तर त्या वृद्धाच्या नातवंडांवर मोठं संकट येऊ शकत. कदाचित तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल मात्र आपल्या पूर्वजांनी खूप विचारपूर्वक हजारो वर्षांच्या अभ्यासातून हे शास्त्र काढले आहे, तुमच्या घरामध्ये जर मांजरीच्या रडण्याचा आवाज येत असेल.

जर मांजरीच्या भांडणाचा आवाज पुन्हा पुन्हा येत असेल तर आपल्या घरामध्ये वाद विवाद निर्माण होतात. लोक एकमेकांशी भांडू लागतात. गृह क्लेश घरा मध्ये निर्माण होतात. कारण त्याच्या आवाजातून जी नकारात्मक ऊर्जा असते ही ऊर्जा आपल्या घरामध्ये शांततेच भंग करते. घरातील लोकांचं जे मन आहे त्या मनावरती विपरीत परिणाम होतो.

एकंदरीतच आपली मनस्थिती बिघडते आणि मग घरामध्ये वाद-विवाद निर्माण होतात भांडने निर्माण होतात. मांजरीला आपण दूध पाजतो अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र जर ही मांजर चोरून तुमच्या घरातला दूध पीत असेल. फक्त एकदा चोरून दूध पिल्याने काय होणार नाही, मात्र ही मांजर वारंवार तुमच्या घरातील दूध चोरून पीत असेल तर मात्र धनहानी ची दाट शक्यता असते.

मोठ्या प्रमाणात धनाचा नाश होऊ शकतो. पैशांचा नाश होऊ शकतो. घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होऊ शकते. जर आपण जुन्या काळचा विचार केला तर गो धन हेच सर्वात मोठं धन होतं. लोक गायी पाळायचे आणि जाच्या घरासमोर जास्त गायी तो सर्वात जास्त श्रीमंत अशी श्रीमंतीची व्याख्या होती.

आणि म्हणून त्या काळातील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दूध, दही, ताक वगैरे. एखाद्या मांजराने जर त्या दुधाच्या भांड्यामध्ये तोंड घातलं तर ते संपूर्ण दूध खराब व्हायचं. मग त्याचा मोठा तोटा व्हायचा. कदाचित त्यामुळेच ही गोष्ट शास्त्रांनी नमूद केलेली असेल की मांजरीने चोरून दूध पिण ही धन नाशाची संबंधित बाब आहे.

त्यामुळे त्या त्या काळामध्ये हे निष्कर्ष अगदी बरोबर होते. मात्र याचा अर्थ असा नाही की या काळामध्ये हे निष्कर्ष लागू होणार नाहीत. यातील बऱ्याचशा गोष्टी आजच्या काळात सुद्धा लागू होतात. नारदपुराण व्यतिरिक्त अजूनही अनेक जणांनी पुस्तके लिहिलेली आहेत, खरंतर या लोकांचा जास्त अभ्यास नसतो.

काही ठिकाणी मला असं वाचण्यास मिळाले, या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. एक पुस्तक आहे, लेखक सुद्धा प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं म्हणणं असा आहे की तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये मांजरीला काळ्या शक्तीचं प्रतीक मानण्यात आलेला आहे. त्यांच अस म्हणण आहे की, हि अलक्ष्मी आहे, अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची मोठी बहीण.

तर ही अलक्ष्मी कुठे असते, ज्या ज्या ठिकाणी लोक पापकर्म करतात चुकीचं काम करतात अधर्माने वागतात, मांसाहार यांचे सेवन करतात. त्या ठिकाणी अलक्ष्मी वसते. अलक्ष्मी ही दारिद्र्याची देवी आहे. गरिबीची देवी आहे म्हणून ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते त्या ठिकाणी लोकांना कधीही सुख लाभत नाही. ते नेहमी अडचणीत असतात.

तर या अलक्ष्मीच वाहन आहे मांजर. आणि मांजर हे राहू ग्रहाच परम प्रतीक आहे. परम अशुभतेचे प्रतिक आहे आणि म्हणून मांजर पाळू नये अशा प्रकारचा सल्ला अनेक जण देतात. या पुस्तकांवर मुळीच विश्वास ठेवू नका. मांजरीला घरामध्ये प्रवेश देऊ नये.

अशा प्रकारचा उल्लेख चुकूनही कोठेही नाही तसेच मांजर हे अलक्ष्मीचे वाहन आहे असा उल्लेख सुद्धा नारद पुराणांमध्ये आढळत नाही. अलक्ष्मी निम्न दर्जाच्या घरामध्ये वास करते. ज्या घरातील लोक पितृ श्रद्धा घालत नाही. आपल्या पूर्वजांना श्राद्ध अर्पण करत नाहीत.

अशा लोकांच्या घरामध्ये आशा लोकांच्या घरामध्ये अलक्ष्मी राहते. राहू असेल, केतू असेल, शनी असेल हे पापी श्रेणीतील ग्रह आहेत आणि या राहु च प्रतिनिधित्व करते मांजर अशा प्रकारची चुकीची माहिती बऱ्याच ठिकाणी दिसते. काही पुस्तकांमध्ये तर अगदी हास्यास्पद गोष्टी आहेत मांजरीला जिंन आणि प्रेतआत्मे यांचं प्रतीक मानलेल आहे.

हे कधीही कुणाच्याही कोणाचंही भलं करत नाहीत. खरं तर ते इकडे तिकडे भटकत असतात आणि ह्या मांजरीना त्यांचे प्रतिक मानन ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अजूनही असे उल्लेख आढळतात की मांजर ही कबुतराची शिकार करते. जेव्हा ही मांजर या उंदरांना खाते पक्षांना खाते तेव्हा केतू ग्रह आहे तो दुर्बल बनतो आणि राहु ग्रह प्रबळ बनतो.

खरे तर या लोकांना हे सुद्धा माहिती नाहीये की, राहू आणि केतू एकच दैत्याचे एक भाग आहे. एक धड आहे तर दुसरा शिरा आहे. म्हणून अशा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. अगदी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता आपण घरामध्ये मांजरी पाळा मांजर ही खरतर खूप चांगला प्राणी आहे. आपल्याला अनेक संकटातून मांजरीने वाचवण्याच्या कथा पाहायला मिळतात.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *