रकुल प्रीत सिंह हिचा जन्म 10 ऑक्टोबर 1990 रोजी नवी दिल्ली येथे झाला. तिच्या वडिलांचे नाव कुलविंदर सिंग आणि आईचे नाव रीनी सिंग, रकुलचा जन्म एका विद्वान कुटुंबात झाला होता. रकुलचे वडील कुलविंदर सिंग हे व्यवसायाने कर्नल होते. तिची आई रिनी सिंग, जी स्वत: चा व्यवसाय करते. रकुलचा एक भाऊ असून त्याचे नाव अमन आहे. रकुल प्रीत सिंग ने आपले शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल, धौला कुआन येथून पूर्ण केले. जिझस अँड मॅरी कॉलेज दिल्लीमधून तिने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. गणिताच्या विषयात तिने पदवी संपादन केली. रकुलने आपल्या कॉलेजमध्येच मॉडेलिंग सुरू केली.
रकुल ने एक मॉडेल म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ती फेमिना भारत (मिस फेमिना भारत) मध्ये सहभागी झाली होती. आणि त्यामध्ये तिने तो पुरस्कार स्वतःच्या नावावर करून घेतला. परंतु याशिवाय या स्पर्धेदरम्यान तिला पॅंटालून फेमिना, मिस फ्रेश फेस, फेमिना मिस टॅलेन्टेड, फेमिना मिस ब्यूटीफुल, मिस ब्युटीफुल स्माईल, मिस ब्युटीफुल आयज ही पदवीही देण्यात आली.
यानंतर रकुलने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि त्यानंतर तीने अनेक तमिळ-तेलगू चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. हिंदी सिनेमातील तिचा पहिला सिनेमा दिव्या कुमार म्हणून यारियां यात केले. या चित्रपटात ती हिमांश कोहलीसोबत दिसली होती.
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर त्या वर्षाचा पहिला यशस्वी चित्रपट ठरला. त्यानंतर रकुलला ‘ येन्नामो येडो ‘ या तमिळ चित्रपटात काम करताना पाहिले होते. त्याच वर्षी रकुलने एकाच वेळी तीन तेलगू चित्रपटांमध्ये भूमिका केली, ज्या श्रीवास, जी.के. नागेश्वर रेड्डी आणि गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित चित्रपट होते.

निर्माता श्रीवास यांचा ‘लौकीम’ हा चित्रपट, आणि नागेश्वर रेड्डी यांचा ‘करंट थेगा’ हा चित्रपट, आणि गोपीचंद यांचा चित्रपट होता ‘पंडागा चेस्को’. रकुलच्या पहिल्या दोन चित्रपटांनी खूप चांगले काम केले होते आणि क्रिटिक्स द्वारे या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. 2015 मध्ये रकुलने आपल्या अभिनयातून मिळालेल्या यशामुळे चार हाय प्रोफाइल तेलगू चित्रपटांमध्ये काम केले.