नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
मकर संक्रांतीला केलेला दान हे खूपच फायद्याच मानलं जातं. आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टीचा दान हे शुभ मानलं जात? तसेच कोणत्या गोष्टी करू नये? मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्य देवतेच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याला संक्रांत म्हणतात.
सूर्याचे मकर राशीत संक्रमण होत म्हणून या संक्रांतीला मकर संक्रांती असं म्हणतात. मकर संक्रांतीला दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी दान केल्याने खूप सार्या पापांचे क्षालन होतं. मकर संक्रांतीला तिळाचे दान हे विशेष मानले जात.
या तिळांना धार्मिक कार्यामध्ये देखील वापरले जाते,कारण हे तीळ शनीच द्रव्य आहे. मकर संक्रांतीला सूर्यदेव एक महिना शनीची रास मकर मध्ये राहतात. शनिदेव आणि पूर्वजन्मीच्या पापाचे प्रायश्चित्त घडवून आणतात. म्हणूनच या दिवशी तिळाचे दान केल्याने आपल्या पूर्वजन्मीच्या पापातून आपली सुटका होते.
राहू व केतू हे देखील शनीचे शिष्य आहेत. त्यामुळे ज्या कोणाला राहू केतुची साडेसाती चालू असेल त्यांनी या मकर संक्रांतीला तिळाचे दान अवश्य करा.जेणेकरून राहू केतूची साडेसाती कमी व्हायला त्यांना मदत होईल. तसेच तिळाच्या दानाने शनि राहू केतू यांचे दोष दुर होतात आणि शनीच्या साडेसातीपासून देखील सुटका होते.
गरिबांना या दिवशी तीळ आणि गुळाचे लाडू करून खायला दिल्यास विविध संकटातून आपली मुक्तता होते. तसेच या दिवशी तांदूळ,गहू या दानालाही विशेष महत्त्व आहे. शास्त्रात सांगितले आहे, जो व्यक्ती एखाद्या गरजू व्यक्तीला ज्याला खरच गरज आहे अशा व्यक्तीला या तांदूळ आणि गव्हाचं दान करतो.
त्याला जीवनात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही.अशा लोकांच्या घरात कसलेही अपघात घडत नाही.कोणाचाही अकाली मृत्यू या घरात होत नाही. तसेच या दिवशी दीपदान केल म्हणजेच एखाद्या मंदिरात किंवा सरोवर,नदी,तलावामध्ये दिवा प्रज्वलित करून दीपदान केल्याने आपल्या डोळ्यांन संबंधित एखादी विकार असतील तर ते कमी व्हायला देखील या दिपदानाने मदत होते.
आजारी व्यक्तींना जर औषधांच दान या संक्रांतीच्या दिवशी केलं तर खूप सार्या आजारांपासून व्याधींपासून आपलं आपोआपच रक्षण होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा दान देताना कधीही मनात चुकीचे विचार, घमंड किंवा गर्व येवू देवू नका. याने केलेल्या दानाच योग्य फळ आपल्याला मिळणार नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही खराब वस्तूंचे दान करू नका.
म्हणजे जी गोष्ट आपल्यासाठी निरूपयोगी आहे त्या वस्तूंच दान या दिवशी चुकूनही करू नका. अशा दानाने फलाची प्राप्ती तर होणार नाही उलट अशुभ फळ त्याने आपल्याला मिळतील. आता आपण पाहूयात या मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टींच दान हे अशुभ मानलं जातं? या दिवशी झाडूच दान चुकूनही करू नका.
याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. या दिवशी झाडूच दान केल्याने आपल्या घरात दरिद्री तर येतेच परंतु घरातली शांतता देखील याने कमी होते. तसेच या दिवशी चप्पलच दान देखील करू नका. याने शनि देव नाराज होऊन त्यांची साडेसाती आपल्या मागे लागू शकते.
तसेच प्लास्टिक आणि स्टीलच्या वस्तूंचं दान देखील अशुभ मानल जात. कारण यामुळे सूर्य देवतेच्या कोपला, रागाला आपण निमंत्रण देत असतो. दान हे नेहमी आनंदाने करा स्वेच्छेने करा आणि ते देताना योग्य व्यक्तीला द्या, जेणेकरून त्याचे फळ आपल्याला मिळेल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.