गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राचे राजकारण बघता आजचा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच जर आज 16 आमदारांना अपात्र केले आणि त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही अशी परिस्थिती समोर आली तर हा एकप्रकारे राजकीय भूकंप ठरेल असं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
तसेच आमदार अपात्रतेबाबत पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आजच्या निकालात 2 बाजू असून ज्यामध्ये 1 घटनात्मक तर दुसरी राजकीय आहे.
तसेच आजचा निकाल राज्यातील सर्व पक्षांकरता महत्त्वाचा ठरणार आहे. जर घटनात्मकदृष्टीने याकडे पाहिले तर पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या 10 व्या सूचीनुसार पक्षांतर झालेले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित केले पाहिजे. त्यांचे मंत्रिपद रद्द झाले पाहिजे.
त्यांना पुन्हा मंत्री होता येणार नाही जोपर्यंत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येत नाहीत. ही कायदेशीर बाब आहे. परंतु कायद्यात त्रुटी म्हणजे न्यायाधीश म्हणून जे काम पाहत आहेत ते विधानसभा अध्यक्ष एका राजकीय पक्षाचे असल्याची टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली. तसेच निकाल देताना ते राजकीय पक्षाचे हित लक्षात न घेता निकाल देणार असतील तर ती अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निकाल देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे।असून जो राजकीय पक्षाने निवडून आणलेला व्यक्ती आहे. या कायद्यातील हा दोष आहे. त्यामुळेच या निकालाला जवळपास 1.5 वर्ष विलंब झाला असून त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यात बदल गरजेचे आहे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले..
याचबरोबर, कदाचित भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला लोकसभेच्या निवडणुकीत कोणाच्या नेतृत्वात सामोरे जायचे हा संभ्रम आहे. त्यामुळेच ते निकालातून तोही प्रश्न सोडवला जाईल का? हा मुद्दा आहे. तसेच नेतृत्व बदल करण्याची ही वेळ आहे. जर पक्षांतर बंदी कायद्यातंर्गत पक्षांतर बंदी झाली नाही असा निकाल आला तर दुर्दैवाने पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागतील. तसेच कोर्ट कचेरी, आंदोलने करावी लागेल. घटनेची पायमल्ली झालीय हे लोकांना सांगावे लागेल. त्यामुळे 4 वाजता काय निकाल येतो? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे, असंही चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले.
ज्याप्रकारे कायदेशीर बाबी होतायेत त्यावर सुप्रीम कोर्टाने आणि जनतेने ठरवायचे आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यायच्या आधी जे निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेत त्यावर आमचे खूप आक्षेप आहेत. आज काहीही घडू शकेल असं वाटतं? असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी शेवटी सांगितले.