महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी; योगी आदित्यनाथ..

Pune

महाराष्ट्रातील महान संतांपैकी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची माझी इच्छा होती, ती साक्षात पूर्ण झाली असल्याची भावना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त आज व्यक्त केली. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पवित्र भुमी आळंदी दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं.

तसेच योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती या अमृत महोत्सवाला उपस्थिती होते. तसेच त्यांनी यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझी लहानपणापासून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत येण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा देखील आवर्जून उल्लेख केला.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाबरोबर लढा दिला आणि त्यानंतर औरंगजेबाला कोणी विचारलं नसल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, मला आज आळंदीत येण्याचं सौभाग्य लाभलं. मी आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या परंपरेला नमस्कार करण्यासाठी आळंदीत आलोय, लहानपणी मी ज्ञानेश्वरीच वाचन केले आहे.

त्यांच्या आळंदीत येण्याची इच्छा होती. ज्यांनी 21 व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. त्यांच्या चरणी आज लीन होता आलं हे मी माझं भाग्य समजतो असेही ते म्हणाले. तसेच या कार्यक्रमाला श्री. श्री. गोविंद महाराज, बाबा रामदेव, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात एकाच कुटुंबात 4 संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळत आहे. तसेच याच महाराष्ट्राच्या पावन भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामी यांनी घडवलं. तसेच त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. तसेच औरंगजेबला असे मारले की, आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही असेही ते म्हणाले. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे. तसेच याच महाराष्ट्रात येऊन आज सगळ्या संतांचं दर्शन मला घेता येत आहे आणि ते मी माझे भाग्यच समजतो असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *