महाराष्ट्रातील जमिनी खरेदी करून महाराष्ट्रातील लोकांचे अस्तित्वच नष्ट केले जात आहे. त्याची सुरुवात रायगडपासून होईल, कारण शिवडी न्हावा-शेवा सी लिंक रायगडच्या विनाशाकडे नेईल. असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
काल पार पडलेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांतर्गत ‘नाटक आणि मी’ या विषयावर मराठीत मुलाखत देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. दरम्यान या मंचावर अभिनेते दीपक करंजीकर आणि राज ठाकरे यांनी भरपूर चर्चा केली. यावेळी शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे संयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेश सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिन इटकर आदी उपस्थित होते.
शिवडी न्हावा-शेवा प्रकल्पाबद्दल बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, जगाचा इतिहास पूर्णपणे भूगोलावर म्हणजेच तेथील जमिनीवर अवलंबून असतो. त्यामुळे आतापर्यंत सर्व आक्रमकांनी जमिनी काबीज करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भूगोलावर ताबा मिळवण्याच्या संघर्षाला इतिहास म्हणतात. आज महाराष्ट्राचा भूगोल संकटात आहे. अतिशय हुशारीने खरेदी केली जात आहे. महाराष्ट्रातील जनतेचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काल 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत चांगलेच चर्चेत येत आहे. कारण मनसे अध्यक्ष यांनी नेहमीप्रमाणे खास ठाकरी शैलीत अनेक गोष्टींचा समाचार घेतलाच. त्याचबरोबर अनेक नवीन कलाकारांना काही हिताचे सल्ले सुद्धा दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या सुक्ष्म निरीक्षणाची यावेळी चर्चा झाली.
दरम्यान, न्हावा-शेवा सागरी सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल तयार करण्यात येत आहे. 12 जानेवारी 2024 रोजी त्याच्या उद्धघाटनाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी या सागरी सेतूविषयी त्यांचे मत मांडले. शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल, या त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षावर देखील त्यांनी यावेळी हल्ला चढवला..
तसेच 2 तासात अहमदाबादला जाणार काय करणार?. ढोकळा खाणार आणि येणार. असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मराठी माणसाचं चारही बाजूला लक्ष हवं. तो दक्ष असला पाहिजे, असा लाखमोलाचा सल्ला देखील मराठी लोकाना दिला.
मात्र यावेळी त्यांनी न्हावा शेवा सागरी सेतूवर घणाघाती टीका केली. म्हणाले की, हा सेतू सर्वात अगोदर रायगड जिल्हा बरबाद करेल. कारण बाहेरील लोक येऊन रायगडमध्ये जमिनी खरेदी करत आहेत. स्थानिक लोक जमिनी विकत आहे. हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का?, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. जमिनी विकणारे हेच लोक पुढे नोकर होतील. या लोकांच्या हाताखाली काम करतील. हा डाव ओळखण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी तेथील स्थनिक लोकांना केले.