जर एखाद्या व्यक्ती मध्ये अशी लक्षणें दिसली तर समजून जावे की देवाधिदेव महादेवांचा वरदहस्त त्या व्यक्तीच्या डोक्यावर आहे. आणि त्या व्यक्तीचे कोणीही काहीही, नुकसान करू शकत नाही. देवांचे देव महादेव हे या सृष्टीतील कणाकणात सामावलेले आहे. या सृष्टीत जी ऊर्जा व तेज भरलेले आहे.
ते सर्व महादेवांचे आहे. महादेवांना भोलानाथ ही म्हटले जाते. कारण ते कधीही त्यांच्या भक्तांमध्ये भेदभाव करीत नाही. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी काही तंत्र मंत्र यांचीही आवश्यकता नाही. तसेच, पंचपक्वान्नांचा नैवेद्य त्याचेही काही गरज नाही, त्यांना प्रसन्न करण्यासाठी फक्त एक तांब्या पाणी ही पुरेसे आहे.
महात्मा विदूरांनी महादेवांची कृपा असलेल्या व्यक्तींचे काही लक्षणे त्यांच्या नीतीमध्ये मांडलेली आहे. महात्मा विदुर हे महाभारतातील एक महत्वपूर्ण पात्र होते. महात्मा विदुरांची अगात बुद्धिमत्ता व कौशल्यामुळे पितामहा भीष्मांनी त्यांना हस्तिनापुरचे प्रधान म्हणून त्यांची नियुक्ती केली होती.
महात्मा विदूर हे कौरव व पांडवांचे काका होते. आणि धृतराष्ट्र व पांडु यांचे बंधू होते. विदुरांची नीती यासाठी ही महत्त्वपूर्ण मानले जाते की ते स्वतः धर्मराज यांचे अवतार होते. यामुळे त्यांना भूत व भविष्याचे अचूक ज्ञान होते. त्यांना माहीत होते की कोणती व्यक्ती धनवान आणि यशस्वी होईल.
आणि कोणती व्यक्ती आयुष्यभर दारिद्र्यात राहणार आहे. धर्मराजान शिवाय असे कोण आहे, जे आपल्या याबद्दल माहिती देतील. स्वतः धर्मराज्यांनीच विदुरांच्या रूपात मनुष्य जन्माला सुखी व यशस्वी करण्यासाठी विदुर नीतीची रचना केली आहे. काही अश्या गोष्टी आहेत ज्या जर तुमच्या मध्ये असेल तर समजून जा की देवाधिदेव महादेवांचा तुमच्यावर वरदहस्त आहे.
आणि अश्या व्यक्तींचे कोणीही काहीही वाईट करू शकत नाही. काही बिघडवू शकत नाही. ती कोणती लक्षण आहे ती खालीलप्रमाणे ज्यांच्यावर महादेवाची कृपा असते ती व्यक्ती आपले जीवन सामान्य पद्धतीने व्यतीत करते. असा व्यक्तींना सामान्यतः देखावा, बडेजाव अजिबात आवडत नाही. अश्या व्यक्ती कधीही कोणालाही कमीपणा वाटेल असे वर्तन करीत नाही.
चुकूनही कोणाची वाईट शब्दाने बोलत नाहीत. तसेच कधीही कोणाचा स्वतःहून अपमान करीत नाही. महादेवांची कृपा प्राप्त असलेल्या व्यक्तींचे प्राणिमात्रांवरही खूप प्रेम असते. ते कधीही कोणत्याही मुक्या प्राण्यावर अत्याचार करीत नाहीत. महात्मा विदुर असे म्हणतात की, जी व्यक्ती भरपूर धनसंपत्ती, मान, ऐश्वर्य, लक्ष्मी हे सर्व जवळ असतानी असूनही त्यांचा अहंकार करीत नाही.
इतरांसमोर नेहमी विनम्र भावानेच वर्तन करतात. अश्या व्यक्तींवर महादेवांची सदैव कृपा राहते. ज्या प्रमाणे नदी आपले पाणी स्वतः पित नाही, झाडे आपली फळें स्वतः खात नाहीत, जमिन आपण स्वतः उगवलेले अन्न स्वतः ग्रहण करीत नाही, त्याचप्रमाणे महादेवांची कृपा प्राप्त असलेल्या व्यक्ती स्वतः साठी कधीही काहीही करीत नाही.
तो नेहमी इतरांसाठी झटत राहतो. इतरांच्या आनंदासाठी त्यांची धडपड चालेली असते.ज्याप्रमाणे वृक्षांना फळ आलेली ते खाली वाकतात. पाण्याने भरलेल्यामुळे ढग आकाशा पेक्षा खाली येतात, त्याप्रमाणे महादेवांची कृपा प्राप्त झालेली व्यक्ती आपल्या धन समृध्दीने कधीही गर्व व ताठा करत नाही. आणि नेहमी परोपकारच करीत राहतात.
ज्या व्यक्ती खुप बलवान असूनही शमाशील व इतरांवर अन्याय होऊ देत नाहीत. आणि कधीही आपल्या शक्तीवर रोघ गाजवत नाहीत. तेच महादेवांचे प्रिय भक्त असतात. त्याबरोबरच ज्या व्यक्ती निर्धन असूनही दानशूर असते, स्वतः कडे काही नसतानाही दान करण्यात कधीही मागे पुढे पाहणार नसतील, आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून येणार असतील, तर अशा व्यक्तींवर महादेवांचे विशेष प्रेम असते.
ज्या व्यक्ती दुर्मिळ वस्तूंची इच्छा करीत नाहीत, त्या वस्तूंचा शेवट होणार आहे, नाश होणार आहे अशा वस्तूंचा विचार करत नाहीयेत आणि संकटातही घाबरून न जाता धीराने त्या संकटांचा सामना करतात त्यांच्या डोक्यावर नेहमी महादेवांचा हात असतो. जर एखाद्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे असतील तर समजून जावे की, देवाधिदेव महादेवांचे कृपा त्या व्यक्तीवर आहे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.