लोकसभेसाठी वसंत मोरे की साईनाथ बाबर? अखेर शर्मिला ठाकरेनी दिले संकेत..

Pune

लोकसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली असून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पातळीवर सुरु झाली आहे.

तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे देखील पुणे दौरे वाढले असून त्याचवेळी शर्मिला ठाकरे यांनी लोकसभेचा उमेदवार कोण असणार? याबाबत अखेर स्पष्ट संकेत दिले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका घेतल्या. मग त्यानंतर आयोगाकडून लोकसभेची तयारी सुरु झाली.

तसेच सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून तयारी सुरु असून त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) लोकसभेची रणनिती तयार करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
कारण, मनसेने पुणे लोकसभेसाठी जोरदार मोर्चाबांधणी केली असल्याचे सांगितले जाते.

तसेच पुणे लोकसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वत: दौरे करत आहेत. याचबरोबर, अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांनाही जबाबदारी दिली असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, मनसेकडून पुणे लोकसभेसाठी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे या दोन्ही नेत्यांनी इच्छा व्यक्त केली असून आता या दोघांपैकी कोणाला उमेदवारी देणार त्याचे स्पष्ट संकेत राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेनी दिले आहे.

दरम्यान, शर्मिला ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी लोकसभेत वसंत मोरे ऐवजी साईनाथ बाबर यांना पसंती दिल्याची चर्चा सुरु झाली आहे, कारण त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, साईनाथ बाबर यांना पक्षाला मोठ्या पदावर पहायचं आहे. त्यांना आता महापालिकेत ऐवजी त्यांना दिल्लीत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यामुळे आता साईनाथ बाबर यांनाच पुण्याची लोकसभेची उमेदवारी मिळणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वी वसंत मोरे यांनीही आपणास संधी मिळाल्यास लोकसभा लढण्यासाठी आपण तयार असल्याचे सांगितले होते. तसेच वसंत मोरे यांचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर लागले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *