नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
दोन-तीन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, मित्रांसोबत गप्पा मारत बसलो असताना एका मित्राने सहजच मला विचारलं तो म्हणाला,मला एक सांग आपल्या आसपासच्या जवळची सगळी लोकं आपल्या आयुष्यात एवढे व्यस्त असताना. तू त्यांच्या मुलांना किंवा त्यांना मदत का करत असतो?
म्हणजे लोकांसाठी काही चांगलं करावं तर का करावा? या प्रश्नावर त्याला मी एक सुंदर गोष्ट सांगितली. तीच मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदा एक सहा वर्षाचा त्याच्या चार वर्षांच्या बहिणी सोबत फिरायला गेला होता. चालता चालता त्याच्या अचानक लक्षात आलं की त्याची बहीण मागे पडली आहे.
तो थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं, तर त्याला दिसलं की त्याची बहीण एका खेळण्याच्या दुकानासमोर उभी राहून खूप इच्छेने कोणत्यातरी गोष्टी कडे बघत आहे. तो तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला विचारले तुला काय हव आहे का? तीने एका छानशा बाहुलिकडे बोट दाखवलं.
अगदी जबाबदार पालकासारख त्याने तिचा हात पकडला आणि ती बाहुली उचलून तिच्या हातात दिली. आता ती खुश होती. दुकानदार दुरून हे सर्व पाहत होता. त्याला त्या सहा वर्षाच्या मुलाचा तेवढेच जबाबदार वागणं बघून त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. आता मुलगा दुकानाच्या काउंटरवर आला आणि त्या दुकानदाराला तो म्हणाला, सर या बाहुलीची किंमत काय आहे?
दुकानदार खूप भला माणूस होता.आयुष्यातील भरपूर अडीअडचणीला त्याला अनुभव होता. त्याने खूप प्रेमाने त्याला मुलाला विचार की तू काय देऊ शकतोस? त्या मुलाने आपल्या खिशात हात घातला आणि त्यातून त्याने समुद्र किनाऱ्यावर गोळा केलेले शिंपले बाहेर काढले आणि दुकानदाराला देऊ केले.
दुकानदाराने ही ते शिंपले घेतले आणि तो मोजू लागला जसं की पैसे मोजतो. मोजत असताना दुकानदाराने कटाक्ष त्या मुलाकडे टाकले. त्या मुलाने काळजी रे दुकानदाराला विचारले, हे कमी पडत आहेत का? दुकानदार म्हणाला छे छे उलट किमतीपेक्षा जास्त आहे ते आणि त्यांनी फक्त चार शिंपले घेऊन बाकी सर्व शिंपले त्या मुलाला माघारी दिले.
त्या मुलांने खूप आनंदात माघारी मिळालेली शिंपले पुन्हा खिशात ठेवले आणि बहिणीचा हात पकडून तो तिथून निघून गेला. त्या दुकानातल्या एक नोकर मगास पासून हे सर्व पाहत होता. त्याने दुकानदाराला विचारलं तुम्ही एवढी महाग बाहुली फक्त चार शिंपल्याच्या बदल्यात त्या मुलाला दिली.
दुकानदार हसून त्याला म्हणाला, अरे आपल्यासाठी हे फक्त शिंपले आहेत पण त्या लहान मुलांसाठी ते खूप मौल्यवान होते. आता नसेल रे त्याला पैशाचा अर्थ समजत, पण एक दिवस त्याला तो नक्कीच समजेल, तेव्हा त्याला हे ही आठवेल की त्याने फक्त चार शिंपल्याच्या बदल्यात माझ्याकडून ही बाहुली विकत घेतली.
थोडासा विचार कर त्यावेळेस तो मला आठवून नक्की समजून घेईन की हे जग पण खूप भल्या लोकांनीही भरलेलं आहे आणि हीच गोष्ट त्याला सकारात्मक विचार आणि वृत्ती दोन्ही विकसित करण्यास मदत करेल. आपण या जगामध्ये ज्या भावना व्यक्त करतो मग त्या सकारात्मक असो वा नकारात्मक त्याच भावना पुढे असतात.
चांगल्या म्हणजे सकारात्मक गोष्टी करण्याचा आनंदच खूप वेगळा असतो आणि तूम्हाला जर वाटत असेल, या जगामध्ये सगळ्यात सकारात्मक व्हायला हवं तर मग आपण त्याला सुरुवात करायला हवी. आपली एक मराठी म्हण ही सांगते बघा, “आपण जे पेरतो तेच उगवतं”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.