लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडणार; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी..

Pune

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने खबरदारी घ्यावी तसेच आखलेल्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले. राज्यभरात लोकसभेच्या निवडणुक 2024 ची चर्चा सुरु झाली असून त्यातच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेच्या वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

तसेच सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास निवडणुका मुक्त वातावरणात पार पडतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
डॉ. सुहास दिवसे म्हणाले की, सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांतर्गत व विविध विभागातही माहितीचे आदानप्रदान नियमितपणे करावे. तसेच मागील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जमा केलेली शस्त्रे, दाखल झालेले निवडणूक विषयक गुन्हे, तसेच दाखल झालेले व्यक्ती आदींची माहिती तयार ठेवावी.

व या माहितीचे विश्लेषण करून अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कार्यवाही करावी असे आदेश दिले गेले आहेत. लोकसभा निवडणूकविषयक पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष आणि प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये तहसीलदार शीतल मुळे, राहुल सारंग आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होत्या.

तसेच पुणे जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातील 121 मतदान केंद्रांवर 1500 पेक्षा अधिक मतदार असल्याने सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापनेबाबत कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच मतदार यादी शुद्धीकरण आणि मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत.

तसेच मागील सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी राज्याच्या सरासरी टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे राजकीय पक्षांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रमात सहकार्य करावे व मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक लवकर करावी, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी राहुल सारंग यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *