दरम्यान, ललित पाटील ड्रग्स प्रकरणात आता पोलिस प्रसासन मोठ्या कारवाई करण्याच्या विचारत असल्यामुळे येत्या काही तासात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या प्रकरणात अनेक सरकारी कर्मचारी आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या पोलिसांना सुद्धा अटक होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होण्याची शक्यता सांगितले जात असून ड्रग्स माफिया ललित पाटील याला मदत करणारे सरकारी कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचारी आणि त्याचे मित्र त्याच्याशी संबंधित लोकांवर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. ललित पाटील याला अनेक महिने ससून रुग्णालयात ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची 3 वेळा चौकशी केली आहे. दरम्यान या कसून झालेल्या चौकशीत ललित पाटील याला रुग्णालयात राहण्यास मदत केल्याबद्दल डॉक्टर संजीव ठाकूर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे डॉक्टर संजीव ठाकूर याना अटक करण्याची तयारी सुरु केली जात असून डॉक्टर ठाकूर क्लास वन अधिकारी आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव गुन्हे शाखेने पाठवला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होताच तातडीने डॉक्टर ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ड्रग्स डीलर ललित पाटील याला 4 जून 2023 रोजी TB च्या उपचारासाठी म्हणून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तपासणी दरम्यान त्याला TB नसल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पाठीच्या दुखण्यासाठी अस्थिरोग विभागात 3 महिने उपचार सुरु होते. त्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या सर्जरी युनिटमध्ये हर्निया उपचारासाठी ललित पाटील महिनाभर ठेवण्यात आले तर त्यावेळी पुणे पोलिसांच्या मार्फत अमली पदार्थ विभागाला 2 कोटी 14 लाखांचे मेफेड्रॉन ड्रग्स ससून रुग्णालयाच्या गेटवरून जप्त करण्यात आले.
पोलिसांनी ससून रुग्णालयातील ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरु केल्यावर धक्कादायक माहिती मिळाली असून हे ड्रग्स रॅकेट ससूनमध्ये उपचार घेत असलेला कैदी ललित पाटील चालवत असल्याचे माहिती मिळाली. मग त्या नंतर ललित पाटील रुग्णालयातून पळून गेला. या सर्व प्रकरणात 12 पोलिसांना निलंबित करण्यात आले. 4 पोलिसांना सेवेतून बडतर्फे करण्यात आले.