नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
भांगात कुंकू भरताना कोणती काळजी घ्यावी? कुंकू कोणत्या बोटाने लावावे? दिवसातून किती वेळा आपण कुंकू लावू शकतो? कुंकू लावण्याचे कोणकोणते फायदे आहे व अयोग्य प्रकारे कुंकू लावल्यास त्याचे काय परिणाम होतात? हे जाणून घेणार आहोत.
सुवासिनी स्त्रीने भांगात कुंकू भरणे खूप शुभ असते. परंतु जेव्हा आपण कुंकू भांगात भरतो तेव्हा मोकळ्यामध्ये कधीही भांग भरू नये. आपल्या रूम मध्ये आत जावून कुंकू भरावे. आपले कुंकवाची बाटली किंवा डबी वेगळी असावी. ती कधीही इतरांबरोबर शेअर करू नये.
आपण आपल्या मेकअप च्या वस्तू आपली वहिनी,बहीण यांच्या बरोबर शेअर करतो त्याप्रमाणे कुंकुही शेअर करतो, पण हे चुकीचे आहे. आपण भांग भरताना कोरडे कुंकू , सिंदुर पेन्सिल अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो. परंतु कोरडा कुंकू भांगात भरणे खूप शुभ असते.
तुम्ही यापैकी कोणताही सींदुर वापरू शकता परंतु कोरडा कुंकू भांगात भरताना जर नाकावर किंवा चेहऱ्यावर त्यातील थोडेसे कुंकू जर पडले तर ते खूपच शुभ असते. कारण नाकावर कुंकू पडणे याचा अर्थ तुमच्या पतीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. कुंकवाची डबी ठेवताना नेहमी मुलांचा हात तिच्या पर्यंत जाणार नाही अशा प्रकारे ठेवावी.
नाहीतर कुंकू खाली सांडून त्याची अवहेलना होऊ शकते, परंतु जर आपल्या हातून किंवा इतरांच्या हातून चुकून कुंकू खाली पडले तर आधी त्याला नमस्कार करून थोडे कुंकू आपल्या कपाळावर लावावे आणि मग संपूर्ण कुंकू डब्यात भरावे. खाली राहिलेले जास्त खराब झालेले कुंकू उचलून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यावे.
ते पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी. सकाळी स्नान झाल्यावर फ्रेश झाल्यानंतर भांग भरावा. आंघोळीपूर्वी भांग भरू नये. तुम्ही दिवसभरात कितीही वेळा आपला भांग भरू शकता, पण दिवसातून कमीत-कमी दोन वेळा तरी भांग जरूर भरावा. काही स्त्रियांना एका साईडला तिरपे सिंदुर लावण्याची सवय असते.
पण असे म्हणतात की,जी स्त्री एका बाजूला तिरपा भांग भरते तिचा पतीही तिच्यापासुन बाजुला होऊन जातो. तसेच जी स्त्री भांग भरते परंतु केसांच्या मध्ये झाकून देते,तिचा पती समाजापासून अलिप्त होतो व एकटा पडतो. म्हणून सिंदुर नाकाच्या शेंड्यापासून सरळ रेषेत डोक्याच्या मधोमध लावावे व ते इतरांना दिसेल अशा पद्धतीने लावावे.
जर तुम्ही कोरडा कुंकू लावत असाल तर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने भांग भरावा. सावसन स्त्रीच्या जीवनात भांग भरण्याला खूप महत्त्व दिले आहे, कारण लग्नापूर्वी मुली टिकली लावतात , लिपस्टिक लावतात, बांगड्या घालतात, परंतु भांग भरण्याचा अधिकार तिला लग्नानंतरच प्राप्त होतो.
लग्नाच्या वेळी पहिल्यांदा पतीने आपल्या पत्नीच्या भांगात कुंकू भरतो व तेव्हापासून मुलगी सवासन स्त्री होते. व भांग भरायला सुरुवात करते. म्हणून तिच्या जीवनात भांग भरण्याचे खूप महत्त्व आहे. भंग भरलेली स्त्री दिसल्यास तीच्य विवाहित असण्याचे हे प्रमाण आहे. कुंकू म्हणजे स्त्रीची ताकत होय.
कुंकू देवी-देवतांना अर्पण केले जाते व ते स्त्रीलाही भांग भरण्यासाठी दिले जाते. म्हणजेच तिला देवी -देवता इतकाच मान दिला जातो. सिंदूर लावणे हे आपल्या सौंदर्यातही भर टाकते व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे शुभ असते.
सिंदूर लावताना चांगल्या क्वालिटीचे लावावे, नाहीतर त्यापासून ऍलर्जी होऊ शकते व आपल्या स्किनला त्रास होऊ शकतो. काही स्त्रिया जास्त मॉडर्न असतात.म्हणून त्यांना भांग भरणे आवडत नाही, परंतु रोज नाही तरी आठवड्यातून दोन दिवस तरी भांग अवश्य भरावा. तसेच सणवार,व्रतवैकल्य,कार्यक्रम असताना भांग जरूर भरावा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.