बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेल, आपल्याला कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात, समस्या येतात, घरात काहीनाकाही वादविवाद सुरू असतात.
म्हणून नित्यानियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्यांची रोज पूजा करायला हावी. पण, काहीना आपले कुलदैवतच माहीत नसेल? अश्या वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो, प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतेच. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तू, मंगलकार्य अश्या मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्वाचा भाग मानला जातो.
कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवत कुटे आहे? त्याचे महत्व काय? कुलदेवता संबदी आपले काय कर्तव्य आहे? असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरीत राहतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात.
आणि घरात एखादी समस्या उदभवली की आपली धावपळ सुरू होते. कुलदेवता हा शब्द ” कुळ आणि देवता ” या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच अध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो, ती देवता म्हणजे आपली कुलदेवता.
कुलदेवता ज्यावेळी पुरुषदेवता असते त्यावेळी तिला कुलदेव, आणि जेव्हा ती स्त्रिदेवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते. तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल, आणि ते तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल तर, त्याचे दोन नियम आहेत.
नियम 1:- रोज सकाळी आणि संध्यकाळी ” स्त्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः” या मंत्राचा जप करावा. एक माळ जप रोज करावा. मंग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदैवत माहीत होते, मंग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल.
आत्ता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहीत होईल?, तर रोज हा जप आपण मनोभावे, खऱ्या श्रधेने करू तेव्हा काहीनाकाही असे होते जसे कोणीतरी आपल्या घरात येईल, कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील, आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेव हे आहेत.
किंवा, स्वप्नात आपल्याला कोणतेतरी देव किंवा देवी दिसेल अश्या रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो. हा भरपूर लोकांचा अनुभव आहे, जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा, काही दिवसातच तुम्हाला कळेल, हा बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे.
नियम 2 :- आपले कुलदैवत हे ब्रम्हा, विष्णू, महेश, आणि आदीमाया यामधूनच कोणाचे तरी रूप असते. म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी. अशी उपासना केली तरी आपल्या कुलदैवताची कृपा होते. मंग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते.
जर तुमची श्रद्धा ब्रम्हावर, विशुवर, महेशवर असेल किंवा आदिमायावर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा, त्यांची सेवा करा, त्यांची श्रद्धा करा, त्यांच्या नामाचा जप करा, तरी आपली सेवा कुळदैवताला लागते. आणि त्यांची कृपा होते. या दोन गोष्टी आहेत,
आत्ता तुम्हाला काय करायचे हे तुम्ही ठरवा.म्हणजे तुम्हाला कुलदैवत माहीत असेल किंवा या मार्गातून माहीत होईल. तर, वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन नक्की घ्यावे. याने घरात शांती, सुख-समृध्दी राहते. घरातून आजार, तिजार दूर राहतात.