ktmj

जाणून घ्या हा खेळाडू ठरला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेणार खेळाडू, MS धोनीला मागे टाकले..

क्रीडा

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर घसरला असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलला इंडियन पैसा लीग म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, कारण या लीगमध्ये खेळाडूंना भरपूर पैसा मिळतो. त्यामुळे आतापर्यंत अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून 100-100 कोटी रुपयांपेक्षा जास्त पगारही घेतल्याचे सांगितले जाते. याचबरोबर, आयपीएलच्या 2023 च्या सीझनसाठीही अनेक खेळाडूंची 15-15 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत विक्री झाली आहे.

परंतु तुम्हाला माहित आहे का की, आयपीएलच्या इतिहास कोणत्या खेळाडूला सर्वाधिक मानधन मिळाले आहे?

दरम्यान, आयपीएल 2023 पर्यंतचा पगार एकत्र केला तर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जच विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अव्वल स्थान पटकावले आहे.
तसेच या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे,

तर मिस्टर आयपीएल म्हणजेच सुरेश रैनाचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत 2 परदेशी खेळाडूंचाही समावेश आहे, ज्यामध्ये एक नाव सुनील नरेनचे आहे, तर दुसरे नाव एबी डिव्हिलियर्सचे आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेतलेला रोहित शर्मा 2023 च्या हंगामापर्यंत 178.6 कोटी रुपयाच्या घरात असून, तर एमएस धोनीला सर्व हंगामांसाठी एकूण 176.84 कोटी रुपये मानधन आकारले आहे. तर विराट कोहलीला 173.3 कोटी रुपये पगार मिळणार आहे.

तसेच सुरेश रैनाने आयपीएलमधून 110.74 कोटी रुपये मानधन जमा केला आहे, तर सुनील नरेन 107.24 कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे. एबी डिव्हिलियर्सने या लीगमधून पगार म्हणून 102.51 कोटी रुपये कमावले आहेत.

दरम्यान, मनीबॉलच्या अहवालानुसार, रोहित शर्माला आयपीएलच्य पहिल्या 3 हंगामांसाठी डेक्कन चार्जर्सकडून 3 कोटी रुपये मिळाले, तर पुढील 3 हंगामांसाठी त्याला मुंबई इंडियन्सकडून 9.20 कोटी रुपये मिळाले.

यानंतर, त्याला पुढील 4 सीझनसाठी MI कडून 12 कोटी मिळाले. त्याच वेळी, 2018 ते 2021 पर्यंत त्यांना वार्षिक 15-15 कोटी रुपये मिळाले, तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांना 16-16 कोटी रुपये मिळत आहेत. अशा प्रकारे रोहित शर्मान आतापर्यंत 178.6 कोटी रुपये मानधन आकारले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *