कोणत्या गोष्टी तुम्हाला श्रीमंत बनवतील?

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं कि आपल्याकडे भरपूर पैसा असावा. आपल्या कुटुंबाच्या ज्या काही गरज आहे किंवा आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. प्रत्येकाच्या जीवनात पैसा हा खूप महत्त्वाचा असतो. हा पैसा मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर मेहनतही करतो, कष्टही करतो.

पैसा कमावण तर कठीणच पण त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की माता लक्ष्मी चंचल आहे, ते एका ठिकाणी जास्त दिवस थांबत नाही असं म्हटलं जातं.

अशा वेळी घरात आपल्याला माता लक्ष्मीला टिकवून ठेवायची असेल म्हणजेच माता लक्ष्मी चा वास आपल्या घरामध्ये असावा असे आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये निवास करील. तिचा शुभ – आशीर्वाद आपल्या घरावर राहील.

तर चला पाहू या कोणत्या आहेत त्या गोष्टी? मित्रानो, तुम्हाला जर असं वाटत असेल की माता लक्ष्मी च आगमन आपल्या घरामध्ये व्हाव आणि कायम माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये वास्तव्य असावे. यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात काही छोटे-छोटे उपाय आपण करून बघायचे आहेत. काही छोटे छोटे नियम ही पाळायचे आहेत.

📍त्याच नियमां पैकी एक नियम म्हणजे जर तुम्हाला वाटते की, तुमच्या घरामध्ये धनवृद्धी व्हावी त्यासाठी देवघरात जो दिवा तुम्ही लावता त्यामध्ये कापसाची वात न लावता लाल धाग्याचे वात तिथे लावायचे आहे. रोज असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मी लाल रंग खूप आवडतो.

आपण घरात लाल रंगाची वाट लावल्याने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते अस म्हटलं जात. त्याच बरोबर आपण दळण करत असताना बरेच जे धान्याचे कण असतात, गहू असतील, ज्वारी असेल ते कण कचऱ्यात जातात. किंवा जेव्हा तुम्ही तांदूळ धुऊन असता तेव्हा पाण्याबरोबर काही तांदळाचे दाणे देखील वाहून जातात किंवा काही घरांमध्ये अन्न रोज वाया जात.

अशा प्रकारे जिथे अन्नाचा अपमान केला जातो तिथे माता लक्ष्मी कधी राहत नाही. याउलट जिथे अन्नधान्याचा मान सन्मान केला जातो, अतिथी चा आदर सत्कार केला जातो तिथे माता लक्ष्मी चा वास सदैव असतो. ज्या घरात सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी घरातील सदस्य झोपतात किंवा जेवण करतात किंवा एकमेकांमध्ये वाद-विवाद घालतात अशा ठिकाणीसुद्धा साक्षात भगवान विष्णू जरी असले तरी माता लक्ष्मी इथे थांबत नाही असं म्हटलं जातं.

कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी च्या आगमनाची वेळ असते आणि आपण तिच्या स्वागतासाठी सज्ज असले पाहिजे. आपण जर त्यावेळी घरात झोपलो किंवा जेवण करत असलो किंवा एकमेकाशी वाईट भांडत असेल, तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही अशी मान्यता आहे.

सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताचे वेळी आपण कधीही झोपू नये, भोजन ही करू नये. तसेच सूर्यास्ता नंतर घरामध्ये झाडू ही मारू नये. सूर्यास्त होण्यापूर्वीच घर झाडून स्वच्छ कराव. तिन्हीसांजेच्या वेळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे, मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघडे ठेवाव कारण माता लक्ष्मी येण्याचं ते वेळ असते.

त्याचबरोबर मुख्य दरवाजाजवळ माता लक्ष्मी च्या स्वागतासाठी एक द्वीप ही तुम्ही प्रज्वलित करून ठेवू शकता. हिंदू संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मी चे स्वरूप मानला जातो, त्यामुळे झाडूला चुकूनही लाथ मारू नये. पायाने स्पर्श करू नये. झाडूचं काम झाल्यावर तो अशा ठिकाणी ठेवावा जिथे कुणाच्याही नजरेस पडणार नाही.

झाडू ठेवताना नेहमी आडवा ठेवावा. जा घरात झाडू नेहमी उभा ठेवला जातो त्या, घरातली माता लक्ष्मी स्थिर राहत नाही तो म्हटल जात. आपलं घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं असावा. असं म्हटलं जातं की, “हात फिरे तिथे लक्ष्मी वसे” माता लक्ष्मी ला अस्वच्छता अजिबात आवडत नाही, म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवाव.

मंडळी त्याच बरोबर तुम्ही जेव्हा कधी बँकेत पैसे भरायला जाल तेव्हा मनातल्या मनात महा लक्ष्मीचे मंत्राचा जप अवश्य करा. त्यामुळे तुम्हाला बँकेत पैसे भरण्याची संधी मिळत राहते असं म्हटलं जातं. त्यात तुमचा बँक बॅलन्स वाढत राहतो. बुधवारच्या दिवशी आपण कोणालाही पैसे उधार किंवा उसने पैसे देऊ नये कारण त्या दिवशी दिलेले पैसे परत मिळत नाहीत ते बुडतात.

त्यामुळे चुकूनही बुधवारी कुणाला चुकूनही पैसे उधार देऊ नये. तसेच जर तुम्हाला उधार पैसे घ्यायचे असतील तर ते घेतल्यावर त्यातील पन्नास रुपये किंवा शंभर रुपये परत देऊन टाका त्यामुळे तुमचे कर्ज लवकर फिटते. तसेच घरातील स्त्री स्वयंपाक करत असते तेव्हा पहिली पोळी किंवा भाकरी असो ती गोमातेला नक्की खाऊ घालावी आणि त्याची पूजा करावी.

त्या घरात माता लक्ष्मी चा आशीर्वाद कायम राहतो. तर मंडळी तुम्ही या काही छोट्या छोट्या गोष्टी करून पहा, त्यामुळे तुमच्या घरात नक्कीच प्रसन्नता येईल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *