कोणतीही गोष्ट करताना आळस येतो का ?? ।। आळस आपण कसा काय दूर करू शकतो? ।। आळस घालवण्याचे काही उपाय !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” आपल्यापैकी कित्येक लोकांना नेहमीच कोणतीही गोष्ट करताना आळस येतो आणि म्हणून ती गोष्ट आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. ही सवय आपल्याला लहानपणापासून लागलेली असते. जेव्हा आपल्यापेक्षा मोठी माणसे आपल्याला काही लहान-सहान गोष्टी सांगतात लहान-सहान कामे सांगतात ना तेव्हा ते काम करण्यास तुम्हाला आळस येतो.

तुम्ही ते काम करण्यास नकार देता. लहानपणी ठीक होते, पण आता तुमचे काहीतरी करून दाखवायचे वय आहे आणि त्यामुळे या वयात आळस अंगात असणे ही गोष्ट तुमच्यासाठी कधी ही घातक असू शकते आणि म्हणून हा आळस आपण कसा काय दूर करू शकतो? माणूस आळशी कधी बनतो जेव्हा त्याच्यापुढे काहीच करण्यासारखे काहीच नसते.

त्यामुळे तुम्ही जर आयुष्यात यशस्वी असाल तरीही तुमच्या समोर अजून पुढे जाण्याचे ठेवा. हे ध्येय समोर ठेवल्याने नक्कीच तुमच्या कामाला दिशा मिळेल. तुम्ही त्या वाटेने चालायची सुरुवात कराल. नुसते बसून न राहता काहीतरी करण्याची उमेद तुमच्यामध्ये निर्माण होईल.

त्यामुळे तुम्ही नेहमीच,तुम्हाला अजून पुढे जायचे आहे, काहीतरी करायचे आहे,मोठे मोठे ध्येय तुमच्या नजरेसमोर ठेवा. त्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळेल आणि आळसही दूर होईल. सकाळी उठल्यावर आपला मेंदू ताजा टवटवीत असतो, त्यात आपण भरतो ना तेच दिवसभर करणार आणि म्हणून आपल्याला दिवसभरात आज काय काय महत्त्वाची कामे करायची आहेत.

ते सकाळी तुमच्या मेंदूमध्ये फीड बसवा आणि ती कामे करण्यावर जास्त भर द्या. त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मेंदू ही दोघे दिवसभर कामे करण्यात गुंग असणार आणि त्यामुळे तुमचा आळस ही झपाट्याने लांब पळेल. नेहमी हुशार माणसांसोबत मैत्री करा.

तुम्हाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे किंवा नोकरीत पुढे जायचे आहे तर अशावेळी तुमच्या सानिध्यात असणाऱ्या हुशार लोकांच्या नेहमी सानिध्यात रहा. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासारखे व्हाल त्यांच्यातील सतत सक्रिय राहण्याचा गुण तुमच्यातही उतरतील आणि यामुळे तुम्ही आळशी न होता अधिक पुढे जाल.

ही एक समस्या आहे जी प्रत्येक मनुष्यात काही ना काही प्रमाणात उद्भवते. आजची आधुनिक जीवनशैली याला एक मोठे कारण आहे, यात काही शंका नाही. या तंत्रज्ञानाच्या युगात बहुतेक कामे इतकी सोपे झाली आहेत की मानवांना स्वहस्ते श्रम करावे लागत नाही.

आधुनिकतेने मानवी समाजाला एक आजार दिला आहे. ज्याचे बळी सर्वच खाली पडत आहेत आणि त्यातून मुक्त होणे ही कठीण होत आहे. जर आपण नेहमीच नकारात्मक विचार ठेवला तर आपण लवकरच त्यास बळी पडाल कारण नकारात्मक विचार आणि आळशीपणा एकमेकांना पूरक असतात. आपल्याला माहिती देखील नसते की आपण त्याचा बळी पडलो आहोत.त्यातून बाहेर पडण्यासाठी असलेली उपाय पुढील प्रमाणे आहेत.

1.फायद्यांचा विचार करा आणि अशामुळेआपण जे करू शकत नाही त्या कामानंतर झालेल्या फायद्यांचा विचार करा.असे केल्याने आपण ते काम लवकरच करण्याची इच्छा जागृत कराल आणि आपण सक्रीय व्हाल. कोणत्याही कामाचा परिणाम आपल्याला काहीही मिळू शकतो.

केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करा, आळशीपणामुळे काय नुकसान होऊ शकते याचाही विचार करा.अशा प्रकारे आपले विचार असल्यास आपल्याला नक्कीच फायदा पोहोचेल.

2.कार्याला प्राधान्य ठरवा. अपूर्ण काम पूर्ण केल्याने आपल्याला वास्तविक जीवनाची शांती मिळू शकते.कार्यातील यश अपयशाची चिंता न करता कार्यात एकाग्रता ठेवा. एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करण्यापेक्षा एक वेळी एक किंवा दोन कामे करण्याचा प्रयत्न करणे चांगले. यामुळे कामाला गती मिळेल आणि कामाबद्दल चा तुमचा उत्साह कायम राहील. कामाचा दरम्यान विश्रांती घेणे आवश्यक आहे.

समोर मोठे काम पाहून आळस देखील होतो. अशा परिस्थितीत कामाचे बरेच तुकडे करा आणि सवे काम अनुक्रमे करत राहा. आपणास पूर्वीपेक्षा आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल आणि आता तुम्हाला ती कामे सोपे वाटतील पण सतत कोणतेही काम करू नका. असे सगळे तुम्हाला लगेचच थकवा आणि आळशीपणा घालवण्यास मदत करतील.

विज्ञानाच्या मध्ये 50 मिनिटांचा कामानंतर दहा मिनिटे विश्रांती घेणे आवश्यक आहे,म्हणून त्या दरम्यान थोडा विश्रांतीच्या त्यामुळे कामाचा दरम्यान आळशीपणा होणार नाही आणि आपण कामांमध्ये अधिक उत्साही असणार. उद्याची नव्हे तर आजची सवय लावा. आजची कामे उद्यावर सोडून देऊ नका.

3. मोठे ध्येय बनवा.कोणत्याही कामाची सुरुवात थोडी अवघड असते पण ते ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करणे.  दररोजचे ध्येय ठेवून आपण आळशीपणाला सामोरे जाण्यासाठी तयार होऊ शकता, कारण दृढतेने केलेले कोणतेही लक्ष आपल्याला चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही.

जेव्हा जेव्हा तुम्हाला आळशी वाटेल ना तेव्हा तेव्हा तुम्ही लगेच प्रभावी शब्द बोला जसे की, मी सकारात्मक आहे. मी यशस्वी आहे. माझ्याकडे खूप ऊर्जा आहे. मी खूप मेहनती आहे. मी सक्रिय आहे आणि हे जादुई शब्द आपल्याला आतून प्रेरित करतील.

4.स्वतःला प्रेरणा द्या. बरीच महत्त्वाची कामे असूनही जर तुम्हाला सुस्त वाटत असेल तर स्वतःला प्रवृत्त करा. असं म्हणतात की, वेळ म्हणजे पैसा. हे देखील खर आहे.दररोज आव्हानांना लढा देवूनही यशस्वी लोक कसे यशस्वी होऊ शकले आणि त्यांनी आळशीपणावर कसा मात केला. त्यांच्या बद्दल वाचा.त्यांच्याकडून प्रेरणा घ्या.ते लोक स्वतःला कसे सक्रिय ठेवू शकले आणि कसे ते पुढे गेलेत ते जाणून घ्या.

अशा विचार आणि प्रेरणा आपल्याला आळशीपणा पासून दूर ठेवेल.प्रत्येकासाठी वेळ मर्यादित आहे याची काळजी घ्या. त्याचा उपयोग कसा करावा हेही समजून घ्या.आळशीपणा धरून बसू नका.उठा आणि संघर्ष करा. आपल्या कामावर प्रेम करा. ज्या कामात प्रेम जोडले आहे ना, त्यामध्ये आळशीपणाचे कोणतेही स्थान नाही.

म्हणून आपण जे काही करतात ना त्यावर प्रेम करा. सकारात्मक व्हा. परिस्थितीची पर्वा न करता नेहमीच सकारात्मक राहा,कारण आपण नकारात्मक राहून परिस्थिती बदलू शकत नाही.तर आळशी आणि नकारात्मक विचारसरणीचा हा परिणाम आहे. म्हणून नेहमी सकारात्मक रहा आणि आळशीपणा दुर ठेवा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *