नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जिजाऊ” “जय शिवराय” “जय शंभुराजे” संपूर्ण तयारी झाली होती ! आता बत्ती द्यायची आणि जंजीऱ्यावरचे सर्व दारूचे कोठारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडणार होते. संपूर्ण जंजिरा हदरणात होता आणि घात झाला. जंजिरा मोहीम म्हणजे संभाजी महाराजांचे कारकीर्दीमधली त्यांची एक अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम. जंजिरा स्वराज्यात एकदा आलंच पाहिजे.
असा छत्रपती संभाजी महाराजांचा आग्रह होता. त्यानुसार कोंडाजी फर्जंद योजनेनुसार जंजिऱ्यावर पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार होते.त्यांनी थेट सिद्धी कडे नोकरी पत्करली होती. योजना पूर्णपणे सिद्ध होती.जंजिरा वरती सर्व दारूच्या कोठाऱ्यांना आग लावून द्यायची.
आणि त्यामुळे जंजिरा हा संपूर्णपणे हादरून जाईल आणि संभाजी महाराजांनी बाहेरून किनार्यावरून जंजिरावर आक्रमण करायचे. आणि जंजिरा आपल्या ताब्यात घ्यायचा.जंजिरावर मराठ्यांचा भगवा झेंडा फडकवायचा. योजना पूर्णपणे तयार होती. योजनेप्रमाणे कोंडाजी फर्जंद व त्यांचे साथीदार त्यांच्यामध्ये होते.
सर्व दारूच्या कोठाड्यांना आग लावण्याची संपूर्ण तयारी झाली होती, मात्र घात झाला.जंजिरावरती कोंडाजी फर्जंद यांचा घात कसा झाला व कोणी केला? इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मते आहेत. शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरी नुसार कोंडाजी फर्जंद हे जेव्हा जांजिरावराती आपली कारवाई करत होते.
तेव्हा कुमाजी देसाई नावाच्या माणसाने फितुरी केली व त्याने कोंडाजी फर्जंद यांची योजना सिद्धीला सांगितले त्यामुळे कोंडाजी फर्जंद यांचा घात झाला. त्याने रातोरात कोंडाजी फर्जंद आणि त्यांचे सर्व साथीदारांना अटक केली.काही जंजीरावरुन पळून जाण्यास यशस्वी ठरले. सिद्धीने काहींना समुद्रात बुडवून मारले, काहींना मारले.
डॉक्टर सदाशिव शिवदे यांच्या “रनझुंजार” या पुस्तकानुसार यांनी जेव्हा कोंडाजी फर्जंद यांनी जांजिरमध्ये प्रवेश केला तेव्हा त्याचे तिथे एक बटिक खरेदी केली. एका दासीने कोंडाजी फर्जंद यांची संपूर्ण योजनेचे संपूर्ण माहिती सिद्धीला दिली व कोंडाजी फर्जंद व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करून शिक्षा दिली.
एक मतप्रवाह असा ही आहे,की जेव्हा कोंडाजी फर्जंद जंजिरामध्ये होते. तेव्हा सिद्धीचे एका अधिकार्याचे कोंडाजी फर्जंद यांच्यासोबत एक घट्ट मैत्री संबंध निर्माण झाले होते. त्याला कोंडाजी फर्जंद यांच्यावरती संपूर्ण विश्वास होता. तेव्हा त्याने एका मुस्लीम स्त्रीला कोंडाजी फर्जंद समोर पेश केले होते.
त्या मुस्लीम स्त्रीचा ही कोंडाजी फर्जंद यांच्यावर जीव होता आणि कोंडाजी फर्जंद यांना ही त्या स्त्रीचा लळा लागला होता. त्यामुळे जेव्हा आपण जंजीराच्या कोठाद्यांना आग लावून जांजिरामधून पसार होवू तेव्हा त्या मुस्लीम स्त्रीला आपल्या सोबत घेऊन जावे असे कोंडाजी फर्जंद यांना वाटले व त्यांनी आदल्या दिवशी त्या स्त्रीला आपली संपूर्ण योजना सांगितली.
त्या मुस्लीम स्त्रीची एक दासी होती, त्या स्त्रीचा त्या दासीवर खूप जीव होता. त्यामुळे त्या स्त्रीने दासीला ही संपूर्ण योजना सांगितली.तेव्हा ती दासी म्हणाली की, मी माझ सगळ समान घेवून येते व ती गेली ती डायरेक्ट सिद्धीकडे गेली.तेव्हा तिने सिद्धीला कोंडाजी फर्जंद व त्यांच्या सहकाऱ्यांचा संपूर्ण डाव सांगितला व पुढे कोंडाजी फर्जंद यांना अटक व शिक्षा झाली.
कोंडाजी फर्जंद हे छत्रपती शिवरायांच्या तलमीमध्ये तयार झालेले मावळे होते. ते एक कट्टर स्वामीनिष्ठ मावळे होते, त्यामुळे ते कोणीतरी पेश केलेली स्त्री आपल्या सोबत ठेवतील असे तरी वाटत नाही. कोंडाजी फर्जंद व त्यांचे सर्व सहकारीयांना सिद्धीसमोर हजर करण्यात आले.
सिद्दीने आपल्या जलाज्यांना आदेश दिला की या सर्वांचे धड मारा. तेव्हा कोंडाजी फर्जंद म्हणाले होते की, ‘आम्ही छत्रपतींची माणस आहोत मरणाला पायाजवळ ठेवतो ‘ याचा फारच सुंदर असा उल्लेख छावा या कादंबरीमध्ये केलेला आहे. तो पुढीलप्रमाणे,
अरे व्हय, आम्ही राजाची माणस हाय. मरणाला चाल करून बांधलं आम्ही पायी,हा लाकडी खोडा वळता करून रायगडाकडे तोंड करून ठेवा र ‘ म्हणजे, होय आम्ही राजाची माणस आहोत.मरणाला आम्ही आमच्या पायाजवळ ठेवतो.माझ्या पायातील हा लाकडी खोडा तेवढा रायगडाकडे तोंड करून ठेवा.
कोंडाजी फर्जंद यांची कोंडाजी भाषा त्यांना कळाली नाही.तेव्हा त्यांना हातानी आपल्या पायातील खोडा उचला व रायगडाकडे तोंड करून उभे राहिले आणि पुन्हा म्हणाले, “महाराज आमच्या रक्ताचा भंडारा उधळला गेला जलकोटावर,कसुराची माफी असावी,चाकराची वय ठेवावी, जय भवानी व कोंडाजी फर्जंद यांनी रायगडाकडे तोंड करून महाराजांना रायगडाला शेवटचा मुजरा केला.पुढे त्यांचे शिर धडावेगळे झाले.
अशा प्रकारे स्वराज्याचा एक स्वामिनिष्ठ मावळा जंजिरावर वीर मरण पत्करत होता.कोंडाजी फर्जंद त्यांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नांना जवळ पास यश मिळालेच होते मात्र एक घात झाला म्हणून ते जंजिरा जिंकू शकले नाही. “जय जिजाऊ” “जय शिवराय” “जय शंभुराजे”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.