अनेक लोक कोमट पाण्याचे सेवन सध्या करत आहे. त्याला अनेक कारणे देखील आहेत. मात्र अस हे कोमट पाणी घेतल्याने आपल्या शरीरावर नेमका कोणता परिणाम होतो? हे आज आपण पाहणार आहोत, समजून घेणार आहोत. कोमट पाण्याचे फायदे होतात, की काही नुकसान होतं, तोटे होतात, याविषयी आज आपण ही माहिती पाहणार आहोत.
तर आपण देखील जरासे कोमट पाणी घेत असाल, किंवा घेणार असाल, तर ही माहिती आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. आपणा सर्वांना माहीत असेल की पृथ्वीवर जी जीवसृष्टी अस्तित्वात आहे, त्याचं मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी असलेल पाणी. ब्रह्मांडामध्ये दुसरीकडे कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आढळत नाही.
आणि त्यामुळेच त्या ठिकाणी कुठेही तुम्हाला जीवसृष्टी आढळणार नाही. थोडक्यात जीवसृष्टीचा जो पाया आहे तो आहे पाणी. आणि म्हणूनच हे पाणी फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मात्र मानवाचे जे शरीर आहे ते सत्तर टक्के फक्त पाण्यापासून बनलेल आहे.
मग अस हे आपल शरीर जर सत्तर टक्के केवळ पाण्या पासून बनलेल असेल, तर आपण पाणी जे ग्रहण करतोय त्याची पद्धत देखील योग्य असायला हवी. आपण योग्य पद्धतीच पाणी प्यायला हवे. मग प्रश्न असा पडतो की आपण गरम पाणी प्यावे म्हणजेच कोमट केलेल, की थंड पाणी प्यावे, माठातल प्यावं की फ्रीज मधल प्यावं.
जे लोक सध्या फक्त गरम पाणी पीत आहेत, तर अशा लोकांच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होवू शकतो. गरम पाण्याचे खूप सारे फायदे आहेत. कोणतेही तोटे नाहीत, ही गोष्ट सर्वप्रथम आपण लक्षात घ्या. कोणकोणते फायदे होतात याची लिस्ट आपल्याकडे आहे.
पहिला जो फायदा आहे, सर्वात मोठा जो फायदा होतोय, जे लोक नियमितपणे कोमट पाणी ग्रहण करतात, गरम पाणी सेवन करतात, अशा लोकांची पचन क्रिया अत्यंत चांगली होते. आणि म्हणूनच आपली जर पचनक्रिया होत नसेल, आपल्याला जर गॅस, कप्स, ऍसिडिटी,यासारखे जर आजार असतील, आपल पोट जर वारंवार बिघडत असेल तर देखील आजपासूनच कोमट पाणी घ्यायला सुरुवात करा.
कोमट पाणी हे आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी जात, लहान आतड्यांमध्ये ते ज्यावेळी जात, मोठ्या आतड्यामध्ये जातं त्यावेळी या आतड्यांची हालचाल वेगवान करण्यासाठीच काम ते करत. आणि ही हालचाल ज्यावेळी वाढते, त्यावेळी ऑटोमॅटिकली आपल्या शरीरातील आपण जे काही अन्नग्रहण केले त्या अन्नाचे पचन सुलभ पणे होत, सोप्या सोप्या पद्धतीने, चांगल्या प्रकारे होते.
म्हणूनच आपण ग्रहण केलेल अन्न चांगल्या प्रकारे पचत,आणि आपली पचनक्रिया चांगल्या प्रकारे होते. एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याची पचनक्रिया चांगली त्याच आरोग्य हे नेहमी उत्तमच असणार. आपल जर पोट खराब झालं असेल तर आपल्याला पित्त,ऍसिडिटी,आणि इतर अपचनासारखे जर आजार असतील तर आपल संपूर्ण आरोग्य हे हळू हळू खालावत जात.
म्हणूनच जे लोक गरम पाणी पितात, कोमट पाई पितात, त्यांच आरोग्य हे कधीही चांगल असलेलं आपल्याला दिसून येईल. गरम पाणी पिण्याचा दुसरा फायदा आपण आता पाहुयात. ज्याप्रकारे आपली पचनक्रिया सुधारते त्याचप्रकारे आपल्या शरीरातील (ब्लड सर्कुलेशन ) म्हणजेच रक्ताभिसरण.
रक्ताचा प्रवाह जो आहे तो देखील सुधरण्यात हे कोमट पाणी मदत करते. ऐकून आश्चर्य वाटलेना, मात्र यामधे आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. याचं कारण अस आहे की ज्यावेळी आपण कोमट पाणी पितो त्यावेळी आपल्या शरीराचं तापमान, आपल्या बॉडीच जे टेंपरेचर आहे ते वाढतं, आणि ते वाढल्यामुळे आपल्या रक्तामध्ये जे कोलेस्टेरॉल असतं, ते कोलेस्टेरॉलच जे प्रमाण आहे ते कमी होतं.
कोलेस्टेरॉल हे विरघळू लागतं असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. आणि मग जर आपल्या शरीरामधील कोलेस्टेरॉल वाढल असेल, तर आपल्याला बिपीचा त्रास असेल, हाय बीपी असेल, (ब्लड प्रेशर) आपल वाढत असेल, आपल्या हृदयाशी संबंधित जर काही आजार असतील तर आपण देखील कोमट पाणी सेवन करायला हवे.
याचा हा देखील एक खूप मोठा फायदा आहे. यापुढचा आपण कोमट पाणी पिण्याचा फायदा पाहूया तो म्हणजे सांधेदुखी. अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो, शक्यतो हिवाळ्यामध्ये सांधे फार दुखायला लागतात. आणि यावर देखील हे गरम पाणी हे रामबाण इलाज आहे.
आपल्याला असे वाटेल की कोमट पाणी पिण्याचा किंवा हे गरम पाणी पिण्याचा आणि सांधे दुखी बरे होण्याचा काय संबंध आहे.तर सांधे दुखतात म्हणजे काय तर हाड जे असतात आपली ती जिथे एकमेकांना जोडली जातात त्यांना सांधे अस म्हणतात. हाडांना जोडलेले असतात माऊंस पेशी आणि माऊंस पेशींमध्ये जवळ जवळ ऐंशी टक्के (80%) हे पाणी आहे.
माऊंस पेशींची जी रचना (स्ट्रक्चर) आहे, त्यामध्ये 80% वॉटर, पाणी आहे. आणि असं जर असेल तर ज्यावेळी आपण हे कोमट पाणी पितो, त्यावेळी या माऊंस पेशींमध्ये लचेलापन (फ्ललेक्सिबिलिटी ) येते, लवचिकता येते. अणि त्यामुळेच सांधेदुखीवर देखील आपल्याला आराम पडू शकतो. तर हा एक खूप चांगला फायदा कोमट पाणी पिणाऱ्यांना होऊ शकतो.
पुढे पाहुयात की कोमट पाणी पिणाऱ्यांना शरीरातून विषारी पदार्थ अधिक गतीने उत्सर्जित होतात, बाहेर टाकले जातात. आपल्या शरीरामध्ये चयापचया क्रिया देखील चालू असते. प्रत्येक पेशीमध्ये चयापचया म्हणजेच (मेटॅबॉलिझम) ही क्रिया सतत चालू असते. आणि त्यातूनच आपल्या ऊर्जा मिळते. अणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारची कार्य करतो,काम करतो.
म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला जे काही आवश्यक आहे, त्यासाठी आपण जे काम करतो, त्या कामांना ऊर्जा पुरविण्याचे काम चयापचया (मेटॅबॉलिझम ) ही क्रिया करत असते. आणि मग ही क्रिया सुलभतेने होयची जर असेल तर त्यासाठी आपल्याला कोमट पाणी प्यायला हवे.
मात्र या प्रक्रियेमध्ये काही विषारी पदार्थ तयार होतात आणि मग हे विषारी पदार्थ आपण वेगवेगळ्या प्रकारे शरीराच्या बाहेर टाकतो. ही विषारी पदार्थ बाहेर टाकायची जी प्रक्रिया आहे त्यामधे आपल्याला कोमट पाणी मदत करत. जे लोक कोमट पाणी पितात त्यांच्यामध्ये विषारी पदार्थाचं उत्सर्जन हे नियमित थंड पाणी पिणाऱ्या लोकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे होत हे सिद्ध झालेलं आहे. अणि म्हणूनच आपण देखील कोमट पाणी प्यायला हवं.
हे जे विज्ञान आहे हे जर लक्षात घ्या. ज्यावेळी आपण कोमट पाणी पितो त्यावेळी आपल्या शरीराचं तापमान वाढत. अणि त्या तापमान वाढल्यामुळे आपल्याला, आपली जी काही किडनी आहे त्याठिकाणी लघवीचे प्रमाण हे जास्त होत. आपल्या शरीरातून जास्तीत जास्त प्रमाणात विषारी पदार्थ लघवीवाटे बाहेर पडायला लागतात.
अशाप्रकारे आपल्या शरीराचं शुध्दीकरण हे त्याठिकाणी होते. अणि म्हणूनच कोमट पाणी फार महत्वाचं आहे. पुढची गोष्ट केस अणि त्वचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, केसांच्या खूप साऱ्या समस्या आहेत. केस गळतात, केस पांढरे होतात, केसांना फाटे फुटने, असे अनेक प्रकार होतात.
महिलांमध्ये केसांना फाटे फुटणे हा प्रकार होत असतो. असे अनेक प्रकार आहेत, अनेक समस्या आहेत केसांच्या. त्यासर्व समस्या कमी होयला, त्या कमी करण्याचं काम हे कोमट पाणी करत. जसं केसांच तसच त्वचेचं. त्वचेवरती अकाली सुरकुत्या पडू लागणे, त्वचा काळसर होणे, त्वचेवरती पिंपल्स किंवा इतर प्रकारचे समस्या काही जर प्रोब्लेम असतील तर या सर्व प्रोब्लेमला कमी होण्यासाठी मदत करण्याचं काम हे कोमट पाणी करत असत.
म्हणूनच ज्यांना हे केस अणि त्वचा ह्यांचे विकार असतील, आजार असतील, तर त्यांनी देखील कोमट पाण्याचं सेवन करा. आपल्याला देखील नक्की फरक जाणवेल, याची खात्री पटेल तुम्हाला. यापुढची गोष्ट म्हणजे लठ्ठपणा. हे सगळीकड जाणून येत आहे, आपला आहार,विहार हा जरासा बिघडलाय.
जागरण आपली आजकाल बहुतेक जास्त वाढलेली आहेत. पार्ट्या वैगरे होतात. अणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा वाढलाय. मग या लठ्ठपणा वरती अनेकजण मेहनत करतात, जिम मधे जातात, व्यायाम करतात, वर्क आऊट करतात, रनिंग करतात, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना आपल्याला दिसून येतात.
मात्र तरी देखील फरक पडलेला दिसून येत नाही. तर अस असेल तर तुम्ही कोमट पाण्याचं सेवन करा. तुम्हाला कोमट पाण्याचं सेवन केल्याने तुम्ही ज्यावेळी वर्क आऊट कराल, व्यायाम कराल, त्यावेळी तुमच्या जास्तीच्या कॅलरीज जळतील. हे एक विज्ञान फार महत्वाचं आहे.
ज्यावेळी तुम्ही व्यायाम कराल,वर्क आऊट कराल, त्यावेळी तुमच्या ज्याकाही कॅलरीज जळत आहे त्या जास्त जळण्याच काम होईल जर तुम्ही कोमट पाणी पिलात तर. जेवढ्या जास्त कॅलरीज जळतील, बर्न होतील, तेवढी तुमची जी काही चरबी आहे, ती चरबी कमी होईल,लठ्ठपणा देखील तुमचा कमी येऊ शकतो.
अशा प्रकारे कोमट पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत. अणि नियमित जे फायदे आहेत, सर्दी होते, पडसे, ताप येणे,व्हायरल इन्फेक्शन जे होतात त्यावर देखील कोमट पाणी पिण्याने खूप सारे फायदे होवू शकतात. अशा प्रकारे कोमट पाणी पिण्याचे खूप सारे फायदे आहेत, त्यातील काही फायदे आज आपण पाहिलेत.
तर आशा आहे की तुम्ही देखील कोमट पाणी पिण्यास सुरुवात कराल. आणखी एक गोष्ट की कोमट पाणी पिताना त्यामधे त्याच प्रमाण ठरवून घ्या. सततच कोमट पाणी पीत राहू नका, सदासर्वकाळ. उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या ऋतू मधे आपल्या शरीराचं तापमान अगोदरच वाढलेले असत.
त्या काळामध्ये जर आपण कोमट पाणी पीत असाल तर त्यासारखे वाईट दुसर काही नाही. त्यावेळी आपल्या शरीराला आपल तापमान कमी करण्याची आवश्यकता असते, अणि म्हणून त्यावेळी आपण कोमट पाणी न पिता शक्यतो जे थंड पाणी आहे ते पिण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.