आपल्या स्वयंपाक घरातील / किचन मधील या पाच वस्तू कधीही संपू देऊ नका ।। काही अशुभ घटना, कुटुंबात तान तणाव, वास्तू दोष या गोष्टींना सामोरे जाऊ लागू शकते. ।।या वस्तूंचा आणि आपल्या घराचा जवळचा संबंध आहे.

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” आपल्या घरातील प्रगती बऱ्याच वेळा आपल्या स्व्यांपाक घरावर अवलंबून असते.किचनला आपल्या समृद्धीच कारक मानलं जातं.अशा या किचनमध्ये खूप गोष्टी असतात मात्र त्यातल्यात्यात पाच वस्तू अशा असतात ज्या कधीही संपू नयेत.

या वस्तूंचा आणि आपल्या घराचा जवळचा संबंध आहे. या पाच वस्तू कोणत्या आहेत? या वस्तू संपयच्याआधी घरात आणून ठेवाव्यात.

1.तांदूळ – याला आपण एक अक्षदा मानतो.ज्या घरात तांदूळ असतो त्या घरात भरभराट असते.तांदूळ संपणे हे समृध्दी घरातून निघून जाण्यासारखे वाटते आणि म्हणून तांदूळ आपल्या घरात आवश्य पाहिजेत.

2.दूध – जुनी म्हण आहे की,घर हे दुधाने भरलेलं असावं आणि अशा घरात धन, संपत्ती,पैसा येत असतो.म्हणून आपल्या घरातील दूध कधीच संपू देवू नका.जर त्यातल्यात्यात आपल्या घरात अतिथी आले असतील आणि दूध संपलेल असेल तर हा त्यांचा पण अपमान समजला जातो.

हिंदू धर्मात अतिथीना देवाचा दर्जा दिला जातो म्हणून देवाची बरकर नष्ट होते अशी मान्यता आहे.तसच दूध नेहमी झाकून ठेवावे. दूध उघड कधीच ठेवू नये.दूध उघड राहील तर घरात वास्तू दोष निर्माण होवू शकतो.

3. हळद – कोणत्याही कार्यात हळद शुभ मानली जाते.हळदी शिवाय कोणतेही कार्य होत नाही. म्हणून देवी देवतांची पूजा करताना कुंकू लावण्यापूर्वी हळद लावतात तर अशी ही हळद आपल्या स्व्यांपक घरात नेहमी असावी.घरातील हळद संपली तर घरातील कार्यात बाधा येवू शकते अस मानलं जातं.

4.मीठ – मिठामुळे अन्नाला चव येत असते.हिंदू धर्मात मिठाच महत्त्व खूप आहे.अस म्हणतात की घरातील मीठ संपलं तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे कधीच आपल्या घरातील मीठ संपू देवू नका.जर तुम्हाला शेजारी-पाजारी कोणी मीठ मागितले तर आपल्या घरातील मीठ कधीच कोणाला उसने देवू नका.

अशा दिलेल्या मिठामुळे आपल्या घरातील संपत्ती दुसऱ्याच्या घरात पाठवली असे होते अशी मान्यता आहे. ताटात मीठ कमी पडलेलं असताना मीठ कधीच तळ हातावर देवू नका अस केल्यामुळे आपल्या कानावर एखादी अशुभ घटना कानी पडू शकते अस मानलं जातं.असा विचार केला तर मीठ हे घरातील अत्यावश्यक गोष्टीं पैक्की एक आहे.ते अचानक संपलं तर घरच्यांची फजिती होणार हे नक्कीच.

5. पीठ– धान्य दळल्यानंतर जे पीठ तयार होत ते सुद्धा आपल्या घरात नेहमी असावं.पीठ संपण्यापूर्वी घरात पीठ आणण्याची तयारी असावी.घरातील पीठ संपलेले असेल तर आपल्या घरातील प्रतिष्ठा यात कमतरता येते अस म्हणतात.

तसेच कुटुंबात तान तणाव सुद्धा निर्माण होवू शकतो. सामान्यपणे विचार केला तर या गोष्टी सर्व सामान्य आहेत.या गोष्टी घरात नसतील तर अर्थात घरातल्यांची फजिती होणार.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *