महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रातील जबरदस्त नाव म्हणजे किर्लोस्कर. ब्रिटिश काळापासून उधोग विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणारा किर्लोस्कर उद्योग समूह इतक्या सहजा सहजी नाही उभा राहिला. त्यामागे होती लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर यांची जबरदस्त इच्छाशक्ती आणि चिकाटी.
किर्लोस्कर समूहाचे संस्थापक कै. लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक होते. व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई येथे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूकही झाली होती. त्यांच्या सुरुवातीच्या काळात लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर यांनी सायकलचे दुकान सुरू करून जीवनाच्या संघर्षाला सुरवात केली. नंतर, आपल्या मेहनत आणि कठिन परिश्रमांनी त्यांनी ‘किर्लोस्कर’ च्या अनेक औद्योगिक युनिट्सची स्थापना केली.
लक्ष्मण काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 रोजी म्हैसूर जवळील बेळगाव जिल्ह्यात झाला. बालपणात अभ्यासाची आवड नसल्यामुळे ते मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये सामील झाले. पण लवकरच त्यांना समजले की ते डोळ्यांनी व्यवस्थित बघू न शकल्या कारणांनी ,रंग योग्यरित्या ओळखू शकत नाही. त्यानंतर त्यांनी मेकॅनिकल ड्रॉईंग शिकले आणि मुंबईतील ‘व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट’ मध्ये शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. मोकळ्या वेळात ते कारखान्यात काम करायचे. यामुळे त्यांना मशीन्सची माहिती झाली.
लक्ष्मण किर्लोस्कर यांनी आयुष्यात प्रथमच एका व्यक्तीला सायकल चालवताना पाहिले, त्यानंतर त्यांनी आपल्या भावासोबत ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ नावाचे सायकल दुकान उघडले. ते रिकाम्या वेळेत सायकल विकत असे, त्यांची दुरुस्ती करत असे आणि लोकांना सायकल चालवणे देखील शिकवत असे.
नोकरी करत असताना लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर यांच्या जागी एक एंग्लो-इंडियन म्हणून यांची नेमणूक झाली तेव्हा किर्लोस्कर यांनी शिक्षक पदाचा त्याग केला आणि एक छोटासा कारखाना उघडला आणि चारा कापण्याचे मशीन आणि लोखंडी नांगर तयार करण्यास सुरवात केली. दरम्यान, बेळगाव नगरपालिकेच्या निर्बंधांमुळे त्यांना आपला कारखाना महाराष्ट्रात आणावा लागला. येथे त्यांनी ३२ एकर जागेवर ‘किर्लोस्कर वाडी’ नावाच्या औद्योगिक वसाहतीची पायाभरणी केली.
या निर्जन जागी लवकरच बदल झाला आणि बेंगळुरू, पुणे, देवास (मध्य प्रदेश) इत्यादी ठिकाणी किर्लोस्करच्या औद्योगिक युनिट्सची स्थापना झाली. यामध्ये शेती आणि उद्योगांमध्ये वापरली जाणारी विविध साधने तयार होऊ लागली. लोकमान्य टिळक, नेहरूजी, विश्वेश्वरय्या, चक्रवर्ती राजगोपालाचारी इत्यादी सर्वानी त्यांचे कौतुक केले व पाठिंबा दिला.
एक विशाल औद्योगिक साम्राज्य स्थापन केल्यानंतर त्यांनी देशाच्या औद्योगिक नकाशावर नवीन मजकूर लिहून भारतीय शेतीला नवीन दिशा दिल्यावर त्यांनी 20 सप्टेंबर 1956 रोजी या नश्वर जगाचा त्याग केला.