आपल्या कामाच्या वेगळ्या पद्धतीने आणि टीकेमुळे किरीट सोमय्या नेहमीची चर्चेत असतात. आता अलीकडेच त्यांनी पवार कुटुंबावर मोठी टीका केली होती. ज्यामध्ये म्हणाले की, “जर पैसे कसे ढापायचे हे शरद पवार कुटुंब जगाला शिकवू शकतं”, त्याचा 2019 च्या कोरोना काळात वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा 12 वर्षांत एका दमडीचाही व्यवसाय झालेला नाही.
मात्र, अचानक मार्च 2021 मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या बँक खात्यातून 435 कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले होते. हे सिरम कडून आलेलं कमिशन तर नाही ना?
असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित करत याबाबत दिल्लीला जाऊन पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असतांना म्हणाले. किरीट सोमय्या यांनी केलेल्या या टीकेवर संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा केली जात आहे. तसेच या टीकेनंतर पवार कुटुंबाचे काय प्रतिउत्तर येत? यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, बारामती मध्ये बसून कोरोना काळात पवार कुटूंबाचा वसुलीचा धंदा सुरू असल्याची टीका किरीट सोमय्यानी केली. दरम्यान, या टीकेची सुरुवात करतांना त्यांनी ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा 12 वर्षांत एका हिशोब सांगून केली. दीड दमडीचा व्यवसाय न केलेल्या कंपनीने अचानक मार्च 2021 मध्ये सिरम इन्स्टिट्यूटच्या बँक खात्यातून 435 कोटी शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या कंपनीत कसेकाय आणले?
असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला असून त्यांनी निगडीतील PMRD मध्ये रीतसर अर्ज केला असल्याचे सुद्धा सांगितले आहे. या प्रकरणी दिल्लीला जाऊन पाठपुरावा करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हणलं आहे.