तुमची किडनी खराब होण्याची कोणती 9 लक्षणे आहेत, ती लक्षणे आपण पाहुयात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत असतो. आपण अशा वेळी शारिरीक ताकदीचा पुरेपूर वापर करून घेत असतो. पण बरेचदा आपण आपल्या शरिराकडून येणाऱ्या सिग्नल्स कडे दुर्लक्ष करतो.
त्यातले बरेचसे शरीरातील एखाद्या अवयवाच्या बिघाडीच्या संबंधित असतात. पण जर आपण असच दुर्लक्ष त्याकडे करीत राहिलो तर काही गंभीर शारिरीक समस्यांचा आपल्याला भविष्यात सामना करावा लागतो. बऱ्याचदा हे सिग्नल्स किडनी सारख्या अवयवाकडून पाठवले जातात.
त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने काही गंभीर परिणाम शरीरावर होत असतात. तर आपण आज या नऊ समस्या बाबतीत जाणून घेणार आहोत.
१. अपरात्री जाग येणे, झोप न येणे : शरीरातील अनावश्यक घटक मूत्राशयामार्गे किडनीच्या मदतीने शरीराबाहेर काढले जातात. परंतु जेव्हा किडन्या व्यवस्थित काम करत नसतात तेव्हा अनावश्यक आणि अपायकारक घटक शरीरात जसेच्या तसे राहतात. रक्तातील त्यांचे प्रमाण वाढते त्यामुळे रक्त दूषित होते. याचा सरळ परिणाम झोपेवर होतो. अपरात्री जाग येणे, झोप न येणे हे किडनी चे कार्य व्यवस्थित सुरू नसल्याचे द्वतक आहे.
२. तांबड्या रक्त पेशींची संख्या कमी होणे : किडनी ड जीवनसत्त्वाचे रूपांतर EOPU या हार्मोन्स मध्ये करत असते. EOPU हार्मोन्स शरीरातील लाल रक्त पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवत असते. जर किडनी व्यवस्थित काम करत नसतील तर शरीरातील लाल रक्त पेशींच्या निर्मितीवर त्याचा परिणाम होत असतो.
लाल रक्त पेशी ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतात. जर त्यांची संख्या कमी असेल तर ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. यामुळे मास पेशी आणि मेंदूच्या प्रतिवर याचा परिणाम होतो.
3. चेहऱ्यावर पांढरे पट्टे किंवा चट्टे येणे : किडणीच्या विकारामुळे रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका देखील निर्माण होत असतो. जर वीस ते पंचवीस टक्के किडनीचे कार्य व्यवस्थित होत नसेल तर ही परिस्थिती उद्भवते. चेहऱ्यावर पांढरे चट्टे येणे, झोपताना थकवा जाणवणे, याचेच हे लक्षणे आहेत.
४. शरीरातील पाणी कमी होणे : जेव्हा किडनी शरीरातील आवश्यक गोष्टी आणि अनावश्यक घटकांचा ताळमेळ साधू शकत नाही तेव्हा शरीरातील पाणी कमी होत जात. शरीर कोरडे पडते. शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांचे आजार उद्भवतात. जास्त पाणी पेल्याने ह्या आजारावर सहज मात करता येऊ शकते. पण पुढे उद्भवणारी धोक्याची परिस्थिती टाळली जाऊ शकते. मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
५. तोंडाची दुर्गंधी येणे, तोंडाचा वास येणे : किडनी जर व्यवस्थित पणे काम करत नसेल तर अनावश्यक टाकावू पदार्थ शरीरात राहतात. यामुळे जिभेच्या सेवेवर त्याचा परिणाम होतो तोंडाचा वास येतो. वजन प्रचंड कमी होत जात. विषारी पदार्थ रक्तात साचलेल्या मुळे रक्त दूषित होते. यामुळे रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा परिणाम होतो. असे काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
६. श्वास घेण्याची क्षमता कमी होणे : श्वास घेण्याची क्षमता कमी होण देखील किडनी विकराच एक दृश्य लक्षण आहे. शरीरात असलेलं एक्सेक्स फ्लुड त्याला कारणीभूत असते. जे किडनीच्या कार्य विप्लते मुळे शरीराबाहेर पडू शकतं नाही. अनेमियामुळे सुद्धा अस होवू शकत. ज्यात रक्त कॅन्सर पेशीमुळे व्यवस्थित भिसरित होवू शकत नाही.
७. अंगाला जास्त घाम येणे : खूप जास्त वेळ एखाद्या ठिकाणी बसल्यावर तळव्याला घाम येणे हे किडनीच्या फेल होण्याचे लक्षण आहेत. किडनी अनावश्यक द्रव्य काढून फेकण्याची क्षमता कमकुवत असल्यामुळे अस होत असत. बरेचदा खालच्या अंगाला घाम येण्याचा विकार नसांमधील शक्तिहिनते मुळे होत असतो. हृदयविकार आणि यकृताचे विकार देखील याला तितकेच कारणीभूत असतात.
८. पाठदुखी आणि पायदुखी : पाठदुखी आणि पायदुखी किडनीच्या पॉलसिस्टीक प्रकारच्या उद्भवत असतात. यातील विकार हा मूळदा हा कमरे खालच्या आत व बरागडी खालच्या भागात होत असतो. यामुळे विषारी पदार्थ शरीराच्या वेगवेगळ्या भागात साचतात. आणि विषारी आम्ल पदार्थ तयार करत असतात. याने पुढे जावून हे विकार उद्भवतात.
९. लघवीचा त्रास होणे : लघवीचा त्रास होणे, ताप येणे, पाठ दुखणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षणे आहेत. जास्तीत जास्त पेनकिलर्स घेतल्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. ह्यापैकी कुठली लक्षणे जर तुमच्या मध्ये दिसत असेल तर तुम्ही अवश्य डॉक्टरांकडे गेले पाहिजे. त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि वेळोवेळी चेकअप करून घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या किडनी फेल होण्याचा धोका टळतो.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.