संघापासून वगळल्यानंतर अखेर विल्यमसने सोडले मौन, म्हणाला “हे शहर, ही टीम नेहमीच आठवणी राहील”..

क्रीडा

काल आयपीएल मधील सर्व संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या सर्वच खेळाडूची नावाची यादी bcci कडे जमा केली. यामध्ये अनेक मोठे खेळाडू यावेळी आयपीएलच्या लिलावात पाहायला मिळणार असल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये सर्वात धक्का तेव्हा बसला जेव्हा हैदराबाद संघाने संघाच्या कॅप्टनला म्हणजे केन विल्यमसनला बाहेरचा रस्ता दाखवला.

केन हा गेल्या 8 वर्षे सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग असल्यामुळे त्याची आणि हैदराबाद संघामध्ये एक अतूट नाते निर्माण झालेले होते. यादरम्यान 2016 मध्ये त्याची टीम चॅम्पियनही झाली होती. आता संघापासून वेगळे झाल्यानंतर तो भावूक झाला.

दरम्यान, IPL 2023 च्या मिनी लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. हैदराबाद संघाने कर्णधार केन विल्यमसनलाच सोडले आहे. त्याच्यासह स्फोटक फलंदाज निकोलस पूरनलाही संघातून वगळण्यात आले आहे. केन विल्यमसन बराच काळ संघाचा भाग होता. तो 2015 मध्ये सनरायझर्स हैदराबादमध्ये सामील झाला आणि आता 8 वर्षांनंतर संघापासून वेगळे झाला आहे.

दरम्यान, 2016 मध्ये विल्यमसनने हैदराबादचा भाग असताना आयपीएल ट्रॉफीही जिंकली होती. दरम्यान, सनरायझर्स संघापासून वेगळे झाल्यानंतर विल्यमसन भावूक झाला आणि त्याने चाहत्यांना आपल्या मनाची गोष्ट सांगितली. त्याने हैदराबादचा संघ, सहकारी खेळाडू, कर्मचारी आणि चाहत्यांचे आभार मानले. तुम्हा सर्वांनी हा प्रवास अधिक सुखकर केल्याचे ते म्हणाले.

विल्यमसनने इंस्टाग्रामवर लिहिले, “8 वर्षांच्या आनंदासाठी फ्रँचायझी, सहकारी खेळाडू, कर्मचारी आणि नेहमीच अप्रतिम ऑरेंज आर्मीचे आभार. हा संघ आणि हैदराबाद शहर माझ्यासाठी नेहमीच खास असेल.”

विल्यमसनसाठी आयपीएल 2022 काही खास ठरले नाही. त्याने 13 सामन्यांत 19.64 च्या सरासरीने फक्त 216 धावा करता आल्या. त्याच्या बॅटमधून फक्त एक अर्धशतक झळकले. त्याचा स्ट्राईक रेटही 93.51 इतका होता.

तसेच यावर्षी त्याने न्यूझीलंडसाठी 12 टी-20 सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह 34.72 च्या सरासरीने 382 धावा केल्या आहेत. मात्र, त्याचा स्ट्राइक रेट केवळ 119.00 होता. तसेच विल्यमसन आतापर्यंत फक्त हैदराबाद संघाकडून आयपीएलमध्ये खेळला आहे.

ज्यांनी 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले विल्यमसनने 76 सामन्यांमध्ये 36.22 च्या सरासरीने 2,101 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटने 18 अर्धशतके आहेत, ज्यामध्ये 89 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 50 च्या सरासरीने 735 धावा केल्या. विल्यमसनने सर्वोत्तम धावा 84 करत 8 अर्धशतके झळकावली. त्या मोसमात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

दरम्यान, या आयपीएल 2023 चा मिनी लिलाव डिसेंबरमध्ये कोची होणार असून 15 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर केली आहे.

यामध्ये, मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड्स, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवले असून त्याचवेळी फॅबियन ऍलन, किरन पोलार्ड, टायमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि हृतिक शोकिन यांना सोडण्यात आले आहे.

तसेच गेल्या वेळी चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाला संघाचा कर्णधार बनवले. मात्र, संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे जडेजाने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडले आणि त्याच्या जागी पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे संघाची कमान सोपवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *