कसबा पेठ दर्ग्यावरील PMC च्या कारवाईच्या अफवा पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल..

Pune

पोलिसांनी या FIR मधील आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 505 (2) आणि IT कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला..
पुणे महानगरपालिका (PMC) कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गा ट्रस्टमधील कथित बेकायदेशीर बांधकाम पाडणार असल्याची खोटी माहिती पसरवल्याबद्दल पुणे शहर पोलिसांनी 30 जणांविरुद्ध 2 FIR नोंदवले आहेत.

PMC धार्मिक स्थळावरील कथित बेकायदेशीर बांधकाम पाडणार असल्याच्या “अफवांमुळे” शुक्रवारी रात्री आणि शनिवारी संपूर्ण शहरातून, प्रामुख्याने कोंढवा भागातील मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने दर्ग्यात जमले होते, त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या 13 जणांविरुद्ध पोलिस नाईक सुभाष जरांडे यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात FIR दाखल केला. तसेच पोलिसांनी या एफआयआरमधील आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 505 (2) आणि IT कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तसेच दरम्यान, पोलीस हवालदार प्रमोद जगताप यांनी दर्ग्याच्या बेकायदेशीर बांधकामावर PMCच्या कारवाईबाबत चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसरवणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलीस ठाण्यात आणखी एक एफआयआर दाखल केला. तसेच पोलिसांनी या प्रकरणी 17 व्यक्ती आणि इतर अज्ञात आरोपींवर भादंवि कलम 141, 145, 149, 117, 153 (अ), 341 नुसार गुन्हा दाखल केला.

तसेच एफआयआरमध्ये म्हटल्याप्रमाणे, आरोपींनी चुकीची माहिती पसरवली ज्यामुळे समाजाला चिथावणी दिली, जातीय तणाव निर्माण झाला आणि लोकांना दर्ग्याजवळ बेकायदेशीरपणे एकत्र केले, ज्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले. तसेच गेल्या काही वर्षांपासून दर्ग्याबाबत वाद सुरू आहे. हा दर्गा मुघल काळात मंदिरावर (पुण्येश्वर) बांधला गेला असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि भाजप करत आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) नुसार दर्गा जागेवर मंदिर असल्याचा पुरावा असल्याचा दावाही ते करतात.

तसेच कसबा पोटनिवडणूक त्यांच्या कार्यकक्षेत येत असल्याने हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी हिंदुत्ववादी गट आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दर्ग्याच्या कथित बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यास विलंब केल्याबद्दल PMCच्या विरोधात नागरी मुख्यालयाबाहेर आंदोलन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *