हे पाच मार्ग ज्याने तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकता ।। झटपट पैसे कमवण्याचे मार्ग, अवलंबून नक्की पहा !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” मला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे आहे. मला लवकरात लवकर करोडपती व्हायचे आहे, झटपट पैसे कमवण्याचे मार्ग सांगा. असे अनेक कमेंट्स मला नेहमी येत असतात. समजा एखाद्या व्यक्ती महिन्याला पंचवीस हजार रुपये कमवत असेल.

म्हणजे वर्षाला होतात तीन लाख रुपये तर ह्या व्यक्तीला करोडपती होण्यासाठी किती वर्षे द्यावे लागतील सांगू शकाल तुम्ही? त्याची पगार वाढ, वगैरे सगळे धरून होतात वीस ते पंचवीस वर्ष. आज मी तुम्हाला जे पाच मार्ग सांगणार आहे ते तुम्हाला पाच वर्षात किंवा जास्तीत जास्त आठ वर्षांमध्ये श्रीमंत बनवतील.

आणि मी काही तुम्हाला हवेतल्या गोष्टी सांगणार नाही या मार्गांचा वापर करून अनेक जण अत्यंत कमी कालावधीमध्ये श्रीमंत झालेले आहेत, आणि शेवटचा मार्ग तर कोणीही लगेच अवलंबू शकतो आणि कामाला लागू शकतो. परत एकदा सांगेल सर्व मार्ग मेहनतीचे आहे कुठलाही शॉर्टकट नाहीये.

पण एवढेच सांगतो हे मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचवतील. पहिला आहे तुम्हाला जे काम करायला आवडते त्याला प्रोफेशनमध्ये बदला, त्याला पैसे कमवायचे साधन बनवा. जगामध्ये तुम्ही लोकांना विचाराल की तुम्ही जे काम सध्या करता ते तुम्हाला आवडते का?

तेव्हा अनेक जणांची उत्तर असते नाही म्हणून याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक जणांना हेच माहिती नसते की त्यांना कोणते काम करायला आवडते किंवा त्यांनी असा कधी विचारच केलेला नसतो त्यामुळे नाईलाजाने पैशासाठी ते अशी काम करू लागतात. जे त्यांना करायला आवडत नाही.

पण जे लोक आपल्या आवडीचे काम रोजगारामध्ये बदलतात त्यांना काम करायचा कधीच थकवा येत नाही, आणि श्रीमंतांची यादी मध्ये सुद्धा अशा लोकांची नावे असतात. उदाहरण. द्यायचे म्हणजे महेंद्रसिंग धोनी जो आधी टी सी म्हणून काम करत होता. पण क्रिकेट खेळायला आवडते म्हणून नोकरी सोडली आणि क्रिकेटला आपले प्रोफेशन बनवले.

आज भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची गणना केली जाते. सुरुवातीला बस कंडक्टर म्हणून नोकरी केलेले रजनीकांत आज साउथ के सुपरस्टार आहे. अशी मला अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर आवडीचे काम रोजगारामध्ये बदला.

दुसरे आहे मल्टिलेव्हल मार्केटिंग म्हणजे एमएलएम. मला मान्य आहे मल्टिलेव्हल मार्केटिंग सध्या लोकांमध्ये बदनाम आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो मल्टिलेव्हल मार्केटिंग मध्ये काही चांगल्या कंपन्या सुद्धा आहे त्या तीस वर्षे जुनी आहे आणि त्यांचे प्रॉडक्ट सुद्धा चांगली आहे.

त्यामुळे लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर मल्टिलेव्हल मार्केटिंग एक उत्तम पर्याय आहे. सुरुवातीला थोडी मेहनत करावी लागते पण नंतर सहजतेने पैसे तुमच्याकडे यायला सुरुवात होते. फक्त असे मी म्हणालो कंपनी निवडताना तुम्हाला त्या कंपनी बद्दल ची सर्व माहिती तपासून घ्यावे लागेल.

जसे कि ती कंपनी किती जुनी आहे? कंपनी चे डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत ना? कंपनीचे नाववर काही फ्रॉड तर नाही ना? कंपनीचे ऑनलाईन व्हिएवं कती आहे… वगैरे वगैरे. तिसरा आहे नवीन कल्पना शोधून व्यवसाय करणे. तुम्हाला लवकरात लवकर जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला व्यवसायाच्या नवीन कल्पना शोधावे लागतील.

जेव्हा मी म्हणतो नवीन कल्पना देऊन मी असे म्हणत नाही की तुम्ही गुगल सारख्या कंपनीची निर्मिती करावी. किंवा फेसबुक ची निर्मिती करावी. किंवा पेटीएम सारखे ॲप बनवावे… केले तर उत्तम आहे पण जे साधे व्यवसाय आहे उदाहरण. म्हणजे चहा घ्या आता चहा विकणे जुना व्यवसाय झाला.

पण काही वर्षांपूर्वी एकाला कल्पना सुचली आणि त्यांनी तंदुरी चहाची निर्मिती केली.तुम्हाला तंदुरी चहाची माहिती असेल. छोटेसे मडके भट्टीमध्ये गरम करतात आणि त्या मडक्यामध्ये चहा ओतून आपल्याला दुसर्‍या कपमध्ये देता. एका तंदुरी चहा वाल्याचा मी काही दिवसापूर्वी इंटरव्यू बघत होतो.

तेव्हा तो सांगत होता तो फक्त या तंदुरी चहा च्या व्यवसायातून महिन्याला तीन लाख रुपये कमावतो. सांगायचा मुद्दा हा की या नवीन नवीन कल्पना शोधून काढा आणि त्याचे व्यवसाय मध्ये रुपांतर करा. चौथा आहे शेअर मार्केट राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमाने, रामदेव आग्रवाल सर्व भारतीय लोक शेअर मार्केट मधून कोट्याधीश झाली आहे.

शेअर मार्केटमध्ये फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची जर आपण नॉलेज न घेता शेअर मार्केट मध्ये उतरलो तर आपलं नुकसान शंभर टक्के आहे हे मी खात्रीने सांगतो पण बऱ्याच लोकांना मोह आवरत नाही, आणि मग ती शेअर मार्केट मधून झटपट पैसे कमवायच्या नादात आपले नुकसान करून घेतात.

त्यामुळे पाच-सहा महिने सुरुवातीला तुम्ही शेअर मार्केटचे सखोल ज्ञान घेतले, सर्व गोष्टी समजून घेतल्या तर तुम्ही नंतर शेअर मार्केट मधून खूप चांगले पैसे कमवू शकता शेअर मार्केट मधून श्रीमंत झालेली हजारो उदाहरणे देता येतील पण त्यांचे प्रमाण कमी आहे हे पण मी सांगतो कारण शेअर मार्केटमध्ये खूप अभ्यास लागतो.

तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री म्हणजे बाय आणि सेल करायचे असेल तर तुम्हाला डिमॅट अकाउंट ची गरज लागते मी जे माझे इन्व्हेस्टमेंटसाठी डिमॅट अकाउंट वापरतो ते आहे एंजल डिमॅट अकाउंट. कारण एक तर हे तीस वर्ष जुनी आहे आणि दहा लाखापेक्षा जास्त लोक वापरत आहे.

दुसरे म्हणजे तुम्ही येथे फ्री मध्ये तुमचे डिमॅट अकाऊंट उघडू शकता. कारण बाकीच्या कंपनीमध्ये तुम्हाला डिमॅट अकाउंट खोलण्यासाठी पैसे मोजावे लागतात, तिसरे म्हणजे म्हणजे दीर्घ काळासाठी तुम्ही शेअर घेतले तर तुम्हाला एक रुपयासुद्धा ब्रोकरेज लागत नाही म्हणजे लॉंगटर्म च्या शेअर साठी ब्रोकरेज एकदम फ्री आहे.

मग तुमची मेहनत करायची तयारी हवी. पाचवा आहे पॅसिव इन्कमवर काम करणे. पहिले पॅसिव इनकम म्हणजे काय ते सांगतो. काम एकदाच करायचे आणि त्याचे पैसे तुम्हाला सातत्याने मिळत राहणार आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. पॅसिव इनकम चे कोण कोणते मार्ग आहे.

सध्या ऑनलाईन मुळे अनेक मार्गाने तुम्ही पॅसिवे इन्कम कमवू शकता, एक उदाहरण सांगतो. जेव्हा आपल्या देशात लोक डाऊन झाला तेव्हा अनेक जण घरूनच काम करू लागले माझे एक मित्र आहे तो सुद्धा धरूनच काम करू लागला पण घरून काम केल्यामुळे त्याला जास्त वेळ मिळू लागला.

त्याने त्या मोकळ्या वेळेमध्ये अनेक ऑनलाईन कोर्स केले, अनेक ऑनलाईन व्यवसाय बद्दल बरीच माहिती मिळवली. नंतर त्याने दहा दिवसात स्वतः ऑनलाईन कोर्स बनवला आणि त्याची फेसबुक द्वारे पॅड मार्केटिंग केली तुम्हाला विश्वास बसणार नाही दोन महिन्यात त्याने पाच लाख रुपये कमावले, आणि आता तो कोर्स त्याला दर महिन्याला चांगली रक्कम करून देत आहे.

आपल्या मोकळ्या वेळेत नोकरी करत असताना उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण केला आता तर दुसऱ्या कोर्सवर काम करतोय आणि नोकरी पण चालू आहे. त्यामुळे हा मार्ग कोणीही कधीही चालू करू शकतो फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे.तर हे होते लवकर श्रीमंत होण्याचे पाच मार्ग.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *