कर्नाटकातील चडचंण टोळीचा म्होरक्यासह साथीदारांना पर्वती पोलिसांनी पकडले असून त्यामध्ये त्यां टोळीकडून 3 पिस्तूल आणि 25 काडतुसे मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, कर्नाटकातील चडचंण टोळीचा म्होरक्यासह साथीदारांना पर्वती पोलिसांनी पकडले.
त्यांच्याकडून 3 पिस्तूल आणि 25 काडतुसे जप्त करण्यात आली असून मंड्ड उर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठ (वय 35, रा. विजापूर, कर्नाटक, सध्या पिसोळी उंड्री असून), तसेच सोमलिंग गुरप्पा दर्गा (वय 28 रा. कर्नाटक) आणि प्रशांत गुरुसिध्दप्पा गोगी (वय 37 रा. शिवशंभो नगर, कात्रज कोंढवा रस्ता, मूळ रा. सुरपूर जिल्हा यादगिर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची आरोपीची नावे आहेत.
दरम्यान, कर्नाटकमधील धर्मराज चडचंण टोळीचा म्होरक्या असलेल्या मंड्ड हिरेमठ साथीदारांसह पुण्यात येणार असल्याची टीप आधीच पर्वती पोलीस ठाण्यात मिळाली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी त्यानुसार पथसके सज्ज ठेवली आणि लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ सापळा लावून त्यांना पकडले. तसेच त्यांच्याकडून 3 पिस्तूल व 25 काडतुसे जप्त करण्यात केली करण्यात आली आहेत.
तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील आणि उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक सचिन पवार, हवालदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे पाटील, पुरुषोत्तम गुन्ला, अमोल दबडे, अमित चिव्हे, सद्दाम शेख, प्रवीण जगताप यांनी ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उत्तर कर्नाटकमध्ये धर्मराज चडचंण आणि महादेव बहिरगोंड उर्फ सावकार यांच्या टोळयांमध्ये वैमनस्य असून, पोलीस चकमकीत धर्मराजचा मृत्यू झाला होता. तसेच त्याचा भाऊ गंगाधर चडचंणचा खून महादेव सावकार याच्या टोळीने केली होता. मग त्यानंतर मंडु ऊर्फ माडवालेय्या पंचय्या हिरेमठने चडचण टोळीची सूत्रे हाती घेतली होती, मग त्यानंतर महादेव सावकारवर 40 साथीदारांनी पिस्तुलातून गोळीबार केला होता. गोळीबारात महादेव बचावला आणि गेल्या 2 महिन्यांपासून मंडू हिरेमठ कुटुंबीयांसह कोंढव्यातील उंड्री परिसरात राहत होता.