कडाक्याच्या थंडीसोबत अवकाळी पावसाची शक्यता, 4.4 अंश तापमानाची नोंद..

Pune

गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने राज्यातील अनेक भागांत थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तसेच यामध्ये नाशिकमधील निफाड तालुक्याचा पारा घसरला असून कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये निफाडमध्ये 4.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे आढळून आले आहे.

तसेच राज्यातील गेल्या काही 4-5 दिवसांपासून वातावरण बदलले असून राज्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. तसेच राज्यातील अनेक शहरांचा पारा 10 अंशाच्या खाली आल्याची नोंद झाली आहे. तसेच यावेळी शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण करणारी परिस्थिती आहे. तसेच राज्यात थंड वारे वाहत असताना अवकाळी पावसाचे संकट आले आहे.

तसेच कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला असून नाशिक जिल्ह्यात यंदाच्या हिवाळ्यमधील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहेत. तापमानात देखील चढ-उतार पहायला मिळत आहे.

त्याचबरोबर हवामान खात्याने कोकणात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांसह आंबा बागायतदार पुन्हा एकदा चिंता वाढण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवसात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.
तसेच गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने राज्यातील काही भागांत थंडीची लाट आली आहे.

बोचऱ्या आणि कडाक्याच्या थंडीमुळे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना दिवसभर बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अचानकच आलेल्या थंडीमुळे राज्यातील नागरिकांना हुडहुडी भरली आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्ट्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच राज्यात जळगावात तापमान कमी होते, तर किमान तापमान 9 अंश तर कमाल 29 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *