सध्या इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. पाकिस्तानविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने अनेक विक्रम केले आहेत. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी 500 हून अधिक धावा करत विश्वविक्रम केला आहे. तसेच पाकिस्तानी गोलंदाजाने एक लाजिरवाना रेकॉर्ड सिद्धा केला आहे.
सध्या world cup विजेते इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. सध्या, पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला जात आहे. या सामन्यात 35 वर्षीय फिरकी गोलंदाज जाहिद महमूदने पाकिस्तानकडून कसोटी पदार्पण केले. त्याने या सामन्यात एकूण 33 षटके टाकली. यादरम्यान त्याला अशाप्रकारे मारहाण करण्यात आली की,
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देण्याचा म्हणजेच सर्वात महागडा गोलंदाज होण्याचा जुना विक्रम मोडला गेला. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, जाहिद महमूदने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 4 एकदिवसीय आणि 1 टी-20 सामना खेळला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या एकूण 56 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये 166 बळी घेतले आहेत. त्याची सरासरी 37 आहे.
दरम्यान, 33 षटकांच्या गोलंदाजीत जागतिक विक्रम केल्याचे सांगितले जाते. कारण पाकिस्तानचा नवोदित फिरकी गोलंदाज जाहिद महमूदने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात एकूण 33 षटके टाकली. ज्यामध्ये त्याने फक्त 1 मेडन ओव्हर टाकला आणि 7.10 च्या इकॉनॉमीने 235 धावा दिल्या. मात्र, त्याने इंग्लंडच्या 4 खेळाडूंनाही बाद केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास सांगतो की, जाहिद महमूद कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. तसेच याआधी कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज होण्याचा विक्रम श्रीलंकेच्या सूरज रणदीवच्या नावावर होता. सूरज रणदिवे 2010 मध्ये कोलंबो येथे भारताविरुद्ध खेळला त्याने पदार्पणाच्या सामन्यात एकूण 73 षटकांत 3.04 च्या सरासरीने 222 धावा दिल्या.
त्यापेक्षा कितीतरी जास्त खर्चिक असल्याचे सिद्ध करत जाहिद मेहमूदने पहिल्या डावातील केवळ 33 षटकांत 235 धावा दिल्या. तसेच विशेष म्हणजे या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 101 षटकात 10 गडी गमावत 657 धावा केल्या, ज्यात 4 फलंदाजांनी शतके झळकावली. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने वृत्त लिहिपर्यंत सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 126 षटकांत 5 गडी गमावून 473 धावा केल्या होत्या.
पाकिस्तानसाठी पहिल्या डावात 3 खेळाडूंनी शतके झळकावली. सलामीवीर अब्दुलाह शफीकने 114 आणि इमाम- उल-हकने 121 धावा केल्या. संघाचा कर्णधार बाबर आझम 136 धावांवर बाद झाला. त्यामुळे हा सामना अनिर्णितेच्या दिशेने जात असल्याचे मानले जात आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा इंग्लंड संघ जगातील पहिला संघ ठरला आहे.
यापूर्वी 1910 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने 494 धावांचा डोंगर उभा केला होता. याचबरोबर, 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी खेळणाऱ्या इंग्लंड संघाने हा सामना संस्मरणीय बनवला. त्याने एक-दोन नव्हे तर एकूण अनेक विश्वविक्रम केले आणि एक एक करून अनेक विक्रम केले. मात्र, 5 दिवसांच्या अखेरीस हा रोमांचक सामना इंग्लंडने जिंकला आहे.