JN.1 चा पुन्हा धोका वाढला! राज्यातली रुग्णसंख्या 451; सर्वाधिक पुण्यात..

Pune देश-विदेश

राज्यात JN.1 या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता, मात्र त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही ठिकाणी अजूनही काही रुग्ण सापडले असल्याचे दिसून आले. दरम्यान, राज्यात कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार JN.1 च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली असल्याचे सांगितले जाते.

तसेच राज्यातील एकूण रुग्णसंख्या 451 झाली असून, त्यातील तब्बल 189 रुग्ण पुण्यातील असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. तसेच पुण्यात कोरोनामुळे मागील 24 तासांत एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
तसेच राज्यात JN.1 या उपप्रकाराचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता.

मग त्यानंतर पुण्यासह ठाण्यामध्ये काही रुग्ण सापडले होते. मग त्यानंतर राज्यातील JN.1 ची एकूण रुग्णसंख्या मंगळवारी 250 गेली होती. त्यात बुधवारी एकाच दिवसांत 201 रुग्णांची भर पडली असून पुण्यात बुधवारी JN.1 च्या 39 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 189 झाली.

राज्यातील JN.1 च्या एकूण रुग्णांपैकी 40% पुण्यात असून त्या खालोखाल ठाणे 89, मुंबई 37, छत्रपती संभाजीनगर 31, नागपूर 30, रायगड 13, सोलापूर 9, अमरावती 9, सांगली 7, कोल्हापूर 7, रत्नागिरी 5 , जळगाव आणि हिंगोलीमध्ये 4, अहमदनगर तसेच बीडमध्ये 3 रुग्ण असून नांदेड, नाशिक व धाराशिव 2, तसेच अकोला ,सातारा, सिंधुदुर्ग , यवतमाळ आणि नंदुरबार 1 अशी रुग्णसंख्या आहे.

तसेच राज्यात मागील 24 तासांत कोरोनाच्या 81 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 % असून, मृत्युदर 1.81% आहे. याचबरोबर, राज्यात मागील 24 तासांत 12 हजार 269 चाचण्या झाल्या आहेत. तसेच राज्यातील पॉझिटिव्हिटी दर 0.66 % आहे, अशी माहिती आरोग्य सहसंचालक डॉ. बी. आर. पवार यांनी यावेळी दिली.

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 579 असून त्यातील 535 म्हणजेच 92.4% रुग्ण गृह विलगीकरणात झाले आहेत. तसेच रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या 44 असून, त्यांचे प्रमाण 7.6% आहे. तसेच एकूण रुग्णांमध्ये अतिदक्षता विभागातील रुग्णांचे प्रमाण 3.3% आहे. राज्यात 1 जानेवारी 2023 पासून कोरोनामुळे 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 70.75 टक्के 60 वर्षांवरील आहेत. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी 84 जणांना सहव्याधी होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *