jkk j

2022 मध्ये या खेळाडूने मारले सर्वाधिक षटकार, यातीत रोहित शर्मा व डेव्हिड मिलरचे जवळपासही नाहीत..

क्रीडा

जर तुम्हाला कोणी विचारल की, या 2022 वर्षांत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज कोण तर आपल्या डोळ्यासमोर मोठमोठय़ा खेळाडूचे चेहरे येतील, ज्यामध्ये रोहित शर्मा पासून जोस बतलर आणि डेव्हिड मिलर असे मोठे खेळाडू ध्यानात येतील.

मात्र, साल 2022 मध्ये यापैकी कोणीही सर्वाधिक षटकार मारले नसून, तर सर्वाधिक षटकार भारतातील 360° म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सूर्यकुमार हा या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

तसेच नुकतेच समोर आलेल्या आकडेवारी नुसार, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 74 षटकार ठोकले. या वर्षी आतापर्यंत इंग्लंडचा जोस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने मारलेल्या षटकारांपेक्षा हे जास्त आहे. याशिवाय, 2022 हे वर्ष संपत आले आहे. या वर्षात क्रिकेटमध्ये अनेक शानदार सामने पाहायला मिळाले. मात्र, टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती.

दोन मोठ्या स्पर्धांमध्ये संघाचा पराभव झाला. आशिया चषकात टीम इंडियाचा सुपर फोर फेरीत पराभव झाला, तर टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच या सर्व पराभवानंतरही भारताला स्टार संघ नक्कीच मिळाला तो म्हणजे सूर्यकुमार यादव होय. कारण सूर्या या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.

त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 74 षटकार ठोकले. या वर्षी आतापर्यंत इंग्लंडचा जोस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने मारलेल्या षटकारांपेक्षा हे जास्त आहे. तसेच 2022 मध्ये, बटलरने 39 षटकार मारले आणि मिलरने 31 षटकार मारले, म्हणजे एकूण 70 षटकार.

त्याचवेळी, सूर्यकुमारने यावर्षी एकूण 44 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याने 40.68 च्या सरासरीने आणि 157.87 च्या स्ट्राईक रेटने 1424 धावा केल्या. सूर्याने एकूण 74 षटकार ठोकले. तसेच सूर्यकुमारला अजून कसोटी पदार्पण व्हायचे आहे. त्याचबरोबर सूर्याने या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 सामने खेळले आणि 260 धावा केल्या. यादरम्यान त्याने सहा षटकार मारले.

त्याचवेळी टी-20 मध्ये त्याचा धमाका पाहायला मिळाला. सूर्यकुमारने T20 मध्ये एकूण 31 सामने खेळले आणि 46.56 च्या सरासरीने आणि 187.43 च्या स्ट्राइक रेटने 1164 धावा केल्या. यादरम्यान त्याने 68 षटकार मारले. सूर्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये दोन शतके आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत. 2022 मध्ये सूर्यकुमार टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

याचबरोबर, निकोलस पूरन या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये 44 सामन्यांत 59 षटकार मारले. त्याचबरोबर यूएईचा मोहम्मद वसीम 58 षटकारांसह तिसऱ्या, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा 55 षटकारांसह चौथ्या आणि रोहित शर्मा 45 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

तसेच या वर्षात आतापर्यंत कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर आहे. त्याने 14 सामन्यात 24 षटकार मारले. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो 18 षटकारांसह आहे. श्रीलंकेचा दिनेश चंडिमल 15 षटकारांसह तिसऱ्या, ऋषभ पंत 14 षटकारांसह चौथ्या आणि न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 10 षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

या वर्षी वनडेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शिखर धवनसह शिखर धवनच्या नावावर आहे. या सर्वांनी प्रत्येकी सात षटकार मारले आहेत. त्याचबरोबर सूर्यकुमारने टी-20मध्ये सर्वाधिक 68 षटकार ठोकले. यानंतर यूएईचा मोहम्मद वसीम 43 षटकारांसह, वेस्ट इंडिजचा रोव्हमन पॉवेल आणि पापुआ न्यू गिनीचा टीपी उरा 39-39 षटकारांसह तिसऱ्या आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा 38 षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *