नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” ” जय जय स्वामी समर्थ “ अस म्हणतात कि, स्वामी महाराजांचा ऐकलं तर त्याची कधीही फसवणूक होत नाही. आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये जास्तीत जास्त यश मिळते. महाराज सांगतात बुद्धिमान आणि हुशार माणसाने प्रत्येकाकडून काहीतरी शिकले पाहिजे मग तो प्राणी असो किंवा मनुष्य असो.
स्वामी महाराजांनी बऱ्याच प्राण्यांकडून काही गोष्टी शिकायच्या ते सांगितले आहे त्यापैकी गाढव हा एक प्राणी आहे. आपण गाढवा कडून तीन अशा गोष्टी शिकणार आहोत. ज्या आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायला मदत करते. पाहिलं तो श्लोक बघूया याच्यामध्ये या तीन गोष्टी सांगितले आहे.
सुश्रतोपी वहेद भार शितोषन न पच्याती संतुष संतुष्ट चरतो नित्य तींनी शिक्षेच गरदभात. पहिली गोष्ट गाढव कितीही थकला तरीही तो ओझ उचलायचा काम चालू ठेवतो. आणि आपल्या ठिकाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चालत राहतो. तसेच माणसाने सुद्धा कितीही थकवा आला तरी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी आणि कार्यसिद्धीसाठी सतत प्रयत्न चालू ठेवले पाहिजे.
असे होऊ शकते की ध्येय प्राप्त करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. अशा वेळेस तो हार मानायची शक्यता असते. पण गाढव जसा थकता न थांबता पुढे चालत राहतो, तसेच माणसाने सुद्धा सगळ्या संकटांचा अडचणींचा सामना धैर्य ने केला पाहिजे आणि सतत न थांबता पुढे चालत राहिले पाहिजे.
दुसरी गोष्ट गाढव कोणताही ऋतू असुदे त्याची पर्वा करत नाही. थंडी असुदे, पाऊस असुदे, उन असुदे गाढव आपले काम सातत्याने करत राहतो. त्याच्यावर कोणत्याही ऋतुचा परिणाम होत नाही. अशाच प्रकारे माणसाने सुद्धा आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कोणत्याही ऋतूची पर्वा न करता सतत काम केले पाहिजे.
बऱ्याच लोकांना कारणे द्यायची सवय असते, जसे की खूप उन आहे खूप पाऊस आहे खूप थंडी आहे त्यामुळे ते कामाची टाळाटाळ करतात. पण बुद्धिमान हुशार माणसाने ऋतू गरम आहे की थंड याचा विचार न करता आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण केले पाहिजे.
तिसरी गोष्ट गाढव परिष्टिती नुसार त्याला जे चरायला भेटते. ते ते चारते आणि नेहमी संतुष्ट राहते. तसेच माणसाने सुद्धा त्याला जे आयुष्यात भेटले आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावे समाधानी राहावे आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्नशिल राहावे. लोकांना सतत रडायची सवय असते.
माझ्याकडे हे असते तर मी ते केले असते, माझ्याकडे ते असते तर मी हे केलं असते आणि अशी माणसं आयुष्यात कधीच संतुष्ट राहत नाहीत. त्यांना कितीही दिले तरी त्यांची हवं कमी होत नाही त्यापेक्षा माणसाने आहे त्या परिस्थितीत संतुष्ट राहावे. आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्नशील रहावे. “श्री स्वामी समर्थ” ” जय जय स्वामी समर्थ “
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.