सध्या संपूर्ण देशभरात श्री रामांच्या आगमनाची मोठ्या प्रमाणात तयार होत आहे त्याचदरम्यान, या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने भगवान श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नाशिकमधील सभेत जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जितेंद्र आव्हाड बोलत आहे की, भगवान श्री राम त्यांच्या 14 वर्षांच्या वनवासात जंगलात राहत होते.
तसेच या काळात त्याना शाकाहारी अन्न मिळणे कठीण असल्याने जंगलातील प्राण्यांची शिकार करत असे. भगवान राम यांना मांसाहारी म्हटल्यावर भाजपने पलटवार करत तुम्ही त्रेतायुगात त्यांना भेटायला गेला होता का? असा सवाल देखील केला आहे.
दरम्यान, मागील 24 तासांत महाराष्ट्रचे राजकारण चांगले तापलेले दिसत आहे कारण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन केली जात आहे. तसेच या दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात आव्हाड यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, आव्हाड यांच्यावर कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे भाजपकडून नुकतंच आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिर्डीत चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तर, या शिबिरमध्ये भाषण करताना नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
भगवान श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे. याचबरोबर, भाजप नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
आव्हाडांवर देशभरातून टीकेची झोड उठत आहे. आव्हाडांनी स्वत: आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात त्याचा निषेध केला जातोय. यामध्ये बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर श्रीराम भक्तांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवला आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. याचबरोबर, त्याच पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या गचाळ वक्तव्यबद्दल खडेबोल सुनावले आहे.