आज आपण पाहणार आहोत रोज सकाळी उपाशी पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे. जिरं म्हटल्यावर सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो म्हणजे मसाल्यांचा डब्बा, भारतीय पाक संस्कृतीतील महत्त्वपूर्ण आणि चवीला भर टाकणारा मसाला म्हणजेच जिरे.
पण जिरे हे फक्त मसाला म्हणून वापरले जात नाही, त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. आपल्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यात जिऱ्याची मदत होऊ शकते. कसे ते आता आपण पाहू या. पिण्याच्या पाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट जीवनसत्वे आणि खनिजे असतात. ते पचनासाठी खूपच फायदेशीर असतात.
जिऱ्याचे पाणी पाचक प्रणालीला निरोगी ठेवते. याव्यतिरिक्त जिऱ्याचे पाणी प्यायल्याने उलट्या अतिसार सकाळचा थकवा तसेच गॅसेस पासून आपल्याला आराम मिळतो. जिऱ्याचे पाणी शरीरामध्ये निर्मार्ण होणारे द्रव्य (एम्झाईम) तयार करते. जे कार्बोहायड्रेट चरबी आणि ग्लुकोज यांना वाचवण्यासाठी अधिक प्रमाणात मदत करते.
जिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट असते. जे शरीरात गोळा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करत असतात. यामुळे शरीरातील अंतर्गत अवयव अधिक चांगले कार्य करतात. थोडेसे जीरे पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी प्यायल्याने यकृतातील बाइलचे प्रमाण वाढते.
जेणेकरून ऍसिडिटी, गॅसेस पासून त्वरित आराम मिळतो. पित्त हा यकृताने तयार केलेला द्रव आहे. पित्त हे फॅट पचवण्यासाठी खूपच महत्वपूर्ण कार्य करत असतो. जिऱ्याच्या पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. इम्युनिटी सिस्टीम ही फक्त लोहाच्या उपस्थितीतच चांगले कार्य करत असते.
एवढेच नव्हे तर जिऱ्याच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. या दोघांमध्ये देखील अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. रोज सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. बरेच आजार देखील टाळता येतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिऱ्याचे पाणी आपले वजन देखील वाढू देत नाही.
लठ्ठपणामुळे झोपेची समस्या सामान्य आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल तर जिऱ्याचे पाणी तुम्हाला खूप मदत करू शकते. रोज जिऱ्याचे पाणी प्यायल्याने चांगली झोप देखील तुम्हाला मिळेल. जिऱ्याच्या पाण्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर असते. जे शरीरातून कचरा बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.
जिऱ्याचे पाणी मुळता शारीर स्वच्छ करते. जिऱ्याचे पाणी तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवते आणि त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटते. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन देखील कमी होते. जिरं हे ब्युटी बुस्टर म्हणून ओळखले जाते. यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि विटामिन्स आढळतात. जे विटामिन ई च्या गरजेला पूर्ण करतात.
जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमिन इ मूळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तुम्ही जिऱ्याचे पाणी रोज घेतले तर तुमच्या चेहऱ्यावर तेज देखिल येईल आणि चेहऱ्यावरील समस्यादेखील दूर होईल. जिऱ्यामध्ये अँटिफगल गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेचा कोणतेही प्रकारच्या इंनफेक्शन पासून देखील संरक्षण होतं.
या शिवाय त्याचा उपयोग सोरायसिस आणि एक्झिमा हे आजार दूर करण्यासाठी देखील केला जातो. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जिरा पावडर चा वापर फेस पॅक मध्ये देखील करू शकता. त्वचेला सुंदर करण्यासाठी जसे जिऱ्याची पावडर फायदे आहे. तसेच केसांसाठी देखील उपयुक्त आहेत. केसांसाठी बाजारात काळजीर मिळत.
या जिऱ्याचे तेल केसांना लावल्यास केस गळतीचे प्रमाण कमी होतात आणि ते मजबूत होतात. रोज काळ्या जिऱ्याचे सेवन केल्यास केस दाट काळे आणि मजबूत होतात. याशिवाय ज्यांना पोटाची समस्या असेल त्यांच्यासाठी देखील काळे जिरे खूपच फायदेशीर आहे. कोंडा दूर करण्यासाठी जिऱ्यासोबत तेल गरम करून घ्या आणि कोमट तेलाने केसांना मसाज करा.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल लावल्यास त्या डोक्यातील कोंडा नाहीसा होईल. तापा मुले जेव्हा शरीरात अशक्तपणा देखील जानवतो अशा वेळी जिरं आणि गूळ सोबत एकत्र करून गोळी बनवा आणि दिवसातून कमीत-कमी दोन ते तीन वेळा खा. तुमचा ताप लगेच कमी होईल तसेच ताप आल्यावर जिऱ्याचे पाणी देखील तुम्ही घेऊ शकता.
जिऱ्यातील थंडावा अंगातील उष्णता त्वरित कमी करतो आणि परिणामी ताप देखील उतरतो. थंडीच्या दिवसांमध्ये नाक बंद होण्याची समस्या खूपच कॉमन आहेत पण काही जणांना हा त्रास बरेच दिवस होत असतो त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जिऱ्याचा वापर करू शकता.
यासाठी तुम्ही जिरे चांगले भाजुन घ्या आणि त्याची पुरचुंडी बनवून द्या आणि ही पुरचुंडी थोड्या थोड्या वेळाने हुंगत रहा. असे केल्याने शिंका येणे बंद होईल तसेच जीर हे बद्धकोष्टता दूर करण्यासाठी देखील खूप मदत करते. त्यासाठी एक ग्लास ताकामध्ये काळमीट आणि भाजलेले जिरे घालून प्या.
असं केल्याने तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास लवकर कमी होईल जर तुमच्या पोटामध्ये असह्य वेदना होत असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता जेव्हा पोटात दुखत असेल तेव्हा जिरं आणि साखर समान प्रमाणात एकत्र करा आणि हे मिश्रण चाऊन चाऊन खा काय त्यामुळे जो रस निघतो त्याला लगेचच फायदा होतो आणि पोट दुखणे कमी होते.
जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर त्यावर जिरे हा एक घरगुती उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी मेथी, ओवा, जिरे आणि बडीशेप समान प्रमाणामध्ये वाटून घ्या. हे मिश्रण रोज एक चमचा खाल्याने डायबेटीस सांधेदुखी आणि पोटाचा विकार होत नाही.
तसेच गॅसेस च्या समस्येवर देखील हा उपाय अगदी रामबाण ठरतो. आता आपण जाणून घेऊया जिऱ्याचे पाणी कसे बनवावे. रात्रीच्या वेळी दोन चमचे जिरे एक क्लास पाण्यामध्ये भिजवावे आणि सकाळी उठल्यावर उकळून गाळून ते पाणी प्यावे. हे पाणी रिकाम्या पोटी चहा सारखं गरम गरम घेतल्यास त्याचा खूपच फायदा होतं.
पाणी गळून उरलेलं जे जिरं आहे ते चावून खावे. याचे सेवन रोज केल्याने शरीरातील कोणत्याही भागातील अनावश्यक चरबी शरीरातून बाहेर पडेल. शक्यतो जिरे हे तांब्याच्या भांड्यात भिजवावे कारण असे मानले जाते की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने देखील वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.