jfkt

भारतीय कर्णधारने केला एक लाजीरवाणा रेकॉर्ड, केले आत्तापर्यंत 2022 वर्षात केले इतके रेकॉर्ड..

क्रीडा

सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार आणि तुफानी फलंदाज रोहित शर्माचे हे वर्ष आतापर्यंत खूपच वाईट ठरले असल्याचे दिसून येत आहे. कारण या वर्षीही त्याने अतिशय वाईट विक्रम केला आहे. चला तर पाहूया काय आहे रोहित शर्माचे विचित्र रेकॉर्ड..

दरम्यान, विराट कोहलीनंतर रोहित शर्माला भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले. सध्या रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे. बांगलादेश दौऱ्यावर असलेला भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील पहिल्या वनडेत पराभूत झाला आहे.

रोहित शर्मा भारतीय संघाचा पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे.

तसेच 2022 हे वर्ष कर्णधार म्हणून रोहित शर्मासाठी खूप वाईट गेले. रोहित शर्माने कर्णधार म्हणून काय गमावले ते जाणून घेऊया. याशिवाय, रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. या संघाने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

पण 2022 मध्ये, संघाला गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहून स्पर्धा संपवावी लागली. मात्र, यावेळी आयपीएल 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या 14 पैकी फक्त 4 सामने या संघाने जिंकले होते.  दरम्यान, कॅप्टन झाल्यावर रोहित शर्मा 2022 मध्ये झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत भारतीय संघ सुपर-4 मधून बाहेर पडला होता. आशिया कपमध्ये संघाने 5 पैकी 3 सामने जिंकले.

तसेच याशिवाय, रोहित शर्माने ICC T20 विश्वचषक 2022 मध्ये प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व केले. या स्पर्धेत संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेतील गटसाखळीत संघाला फक्त एकच सामना गमवावा लागला होता. मात्र उपांत्य फेरीतील संघ बुडाला.

तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बांगलादेश दौऱ्याची सुरुवातही संघासाठी चांगली झाली नाही. येथे संघाने पहिला वनडे 1 विकेटने गमावला. याशिवाय, या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला.

रोहित हा टीम इंडियाचा पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली निळ्या जर्सी असलेला संघ बांगलादेशविरुद्धच्या ODI आणि T20I सामन्यात पराभूत झाला आहे. यापूर्वी बांगलादेशने 2019 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा पराभव केला होता.

याचबरोबर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कारण कॅप्टन रोहित शर्माने रागाच्या भरात आपल्याच सहकाऱ्याला ऐन मैदानावर शिवीगाळ केल्याची बाब समोर आली असून ही घटना बांगलादेशविरुद्ध रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान घडली.

दरम्यान, मीरपूर येथे रविवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला बांगलादेशकडून पराभव स्विकारावा लागला. टीम इंडियाला हा सामना सहज जिकंता आला असता. परंतु मेहदी हसन मिराजने टीम इंडियाची विजयश्री खेचून नेली. सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मैदानावर रागाच्या भरात आपल्याच संघातील क्रिकेटपटूला शिवीगाळ केली. आता रोहित शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर रोहित शर्माला ट्रोल देखील केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *