आज आपण गौरी घरी कशी आणावी यासंबंधी शास्त्रशुद्ध माहिती घेणार आहोत. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीस ज्येष्ठा गौरी आवाहन केलं जातं, गौरी आपल्या घरात येतात. सप्तमी तिथीस गौरींचे पूजन केलं जातं. महा नैवेद्य दाखवला जातो आणि मग तिसऱ्या दिवशी म्हणजेच अष्टमी तिथीस गौरींचे मनोभावे विसर्जन करण्यात येत.
आज आपण गौरीचं आगमन नक्की कशा प्रकारे होतं. गौरीला आपल्या घरात कसं आणावं. यासंबंधी आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातुंन गौरीला आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवायचे.आणि त्यावर कुंकवाने स्वस्थिक काढतात.
घराचा दरवाजा पासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मी च्या पायाचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. हे करत असताना ताट चमच्याने किंवा घंटीने आवाज केला जातो. त्यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूधदुप्त्या ची जागा इत्यादी गोष्टी दाखवण्याची प्रथा आहे.
तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदू दे अशी प्रार्थना करतात. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात. आणि नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत पश्चिम महाराष्ट्रात दिसून येते.
या पद्धतीलाच गौरी आवाहन करणे असे संबोधतात. स्थळप्रथवे गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा बदलत चाललेल्या आहेत. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात, तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्याची पूजा करतात.
काही ठिकाणी पाच मटक्यांची उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडीनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरात धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, हरभरा, ज्वारी, डाळ इत्यादी. पैकी 1,2 धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात.
तुम्ही जर बाजारात गेला तर पत्र्याच्या लोखंडी साड्यांच्या किंवा सिमेंटचे कोथळी मिळतात आणि त्यावर ती मुखवटे ठेवले जातात. या पुतल्यानाच साडी चोळी नेसवली जाते. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर सुद्धा मुखवटा ठेवण्याची पद्धत आहे. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून त्यांची पूजा करतात.
तेरड्याची सुद्धा गौर असते. तेरड्याची पानांची रोप मुळासकट आणतात आणि ही रोप म्हणजेच गौरीची पावले आहेत असं समजतात. आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपात ही आधुनिकता दिसून येते. अनेक घरात गौरी म्हणजेच महालक्ष्मी येतात.
आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुले सुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी अशी मांडतात. कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पुजतात, तर कोणी मातेची बनवतात.
तर कोणी कागदावरती देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे पूजा होते. सकाळी गौरींची म्हणजेच महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात. फराळ म्हणून रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचे लाडू असा नैवेद्य दाखवला जातो.
संध्याकाळी आरती करतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवे फळे इत्यादी. पदार्थांचा नैवेद्य यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, लोणचे, पापड, इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात.
महाराष्ट्रात काही जागी याच सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित होतो. दर्शनाला आलेल्या महिलांनी मुलींचा आदरपूर्वक स्वागत केले जात. तिसरा दिवस हा विसर्जनाचा. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे महालक्ष्मी चे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पौट्याच्या म्हणजेच सुताच्या गाठी पडतात.
या सुतात हळदीकुंकू, बेलफळ, सुकामेवा, फुले,झेंडूची पान, काशी फळाची फुलं, रेशमी धागा, असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडल्या जातात. यामध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पानं आणि काशिफाळच फुल या महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात.
गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापर यांचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या म्हणजेच महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता नैराश्य दिसून येतं. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे निमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो. आणि त्यांचे विसर्जन केलं जातं.
मात्र जर धातूच्या मूर्ती असतील किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे मात्र विसर्जन करत नाहीत. गौरींचा पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडीशी वाळू घरी आणून ती संपूर्ण घरात आणि परसामध्ये झाडांवर टाकली जाते. अशी समजूत आहे की त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपांचे वृक्षांचे कीटकांपासून संरक्षण होते.
एक दोरकाची सुद्धा प्रथा आपल्याकडे आहे, की तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गौरींच्या पूजे बरोबरच सुताच्या गुंड्याला 16 गाठी देऊन त्यांचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून मग तो गुंडा घरातील सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात. व नवीन पिके येईपर्यंत गळ्यातच ठेवता. अश्विन वद्य अष्टमीला हा दोरा गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दौऱ्यालाच महालक्ष्मी असं संबोधलं जातं.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.