हिंदू धर्मशास्त्रानुसार काही गोष्टी या अत्यंत शुभ समजल्या जातात. अशा गोष्टींमध्ये सकारात्मक ऊर्जा ही मोठ्या प्रमाणात भरलेली असते, ज्याप्रमाणे शुभ गोष्टी या जगामध्ये आहेत. अगदी त्याच प्रकारे काही अशुभ गोष्टी सुद्धा आपल्या आजूबाजूला घडत असतात.
या अशुभ गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते आणि या गोष्टी ज्यावेळी घडू लागतात त्यावेळी आपल्यावरती मोठमोठी संकटे येतात. आपल्यावरती अनेक विपत्ती येतात. आज तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत, की ज्या गोष्टी याच्या सूचक असतात की नजीकच्या भविष्यात तुमच्यावरती मोठं संकट येणार आहे.
एखादं मोठं संकट हे तुमचं जीवन सुध्दा बरबाद करू शकत. म्हणून या पाच गोष्टी जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या तर येणार्या संकटाची आपल्याला पूर्व सूचना मिळते आणि या संकटापासून आपण स्वतः चा आणि स्वतःच्या परिवाराचा आपल्या कुटुंबाचा नक्कीच बचाव करू शकतो. पाहूया की या पाच गोष्टी कोणत्या आहेत.
नंबर 1 – कोणतेही कारण नसताना जर आपल्या घरातील खुर्ची टेबल किंवा ज्यावर आपण बसतो किंवा झोपतो. उदाहरणार्थ बेड अशा वस्तू जर अचानक मोडल्या तर ही गोष्ट अत्यंत अशुभ अशा प्रकारची गोष्ट आहे. ज्यावेळी अशा प्रकारची गोष्ट घडते तेव्हा ती आपल्याला या गोष्टीची सूचना देते.
येणाऱ्या भविष्यात आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती मोठं संकट येणार आहे. तुमच्या घरा मध्ये जेवढे लोक राहतात त्यापैकी कुणाचा ना कुणाचा तरी जीवनामध्ये मोठी उलथापालथ होणार आहे. या गोष्टीकडे हा संकेत असतो.
नंबर 2 – तुमच्या जवळ असणारे मौल्यवान दागिने असतील किंवा हिरे किंवा मोत्याचे दागिने असतील. तर ही मौल्यवान दागिने जर आपणाकडून हरवले तर लक्षात घ्या, असे दागिने शक्यतो हरवत नसतात मात्र जर हे दागिने हरवले तर मात्र आपल्यावर ती नजिकच्या भविष्यात मोठे आर्थिक संकट येणार आहे.
या गोष्टीची ही सूचना असते. खूप मोठी अमंगल गोष्ट यामुळे घडून येऊ शकते. आपले दागिने चोरीला जाणे ही गोष्ट वेगळी आहे. मात्र जर हे दागिने हरवले तर मात्र आपण सावध व्हा.
नंबर 3 – आभूषणांनी अलंकृत अशा प्रकारची स्त्री तर आपणास दिसली तर मित्रांनो ही अतिशय शुभ गोष्ट समजली जाते. एखादी स्त्री जर तुमच्या समोर दागदागिने घालून नटून थटून आली तरीही अतिशय शुभ घटना असते. मात्र हीच स्त्री जर तुमच्या स्वप्नामध्ये वेगवेगळी आभूषणे घालून येत असेल
तर आपण सजग व्हा, सावध व्हा कारण अशा प्रकारचे स्वप्न हे आपल्याला येणाऱ्या मोठ्या समस्येबद्दल जागृत करत आहे. हे आपल्याला संकेत देत आहे की आपण सावध व्हायला हवं नजीकचा भविष्य हे काहीतरी अन्होनी घेऊन आलेला आहे.
नंबर 4 – जर तुमच्या घरा मध्ये मोठ्या प्रमाणात उंदीर होऊ लागले किंवा लहान सहान कीटक जर तुमच्या घरा मध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागले. मग त्यामध्ये मधमाशी असेल किंवा ढेकून असेल किंवा इतर कोणतेही छोटे छोटे सजीव छोटे छोटे कीटक मुंगी सोडून इतर कोणतेही किटन जर तुमच्या घरा मध्ये मोठ्या संख्येने निर्माण झाले.
तर सावध व्हा कारण ही एखाद्या खूप मोठ्या संकटाची तुम्हाला सूचना आहे. तुमच्या परिवारावर तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या भविष्यात हे खूप मोठं संकट येऊ घातलेला आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी सावध होण्याची गरज आहे. केवळ तुम्हीच नव्हे तुमच्या कुटुंबात जेवढे लोक आहेत त्यांचे येणारे भविष्य जर आपणास सुरक्षित करायचं असेल. तर आपण लवकरात लवकर सावधगिरीची पावले उचलायला हवीत.
नंबर5 – शेवटची गोष्ट तुमच्या आसपास जर एखादा कार्यक्रम चालू असेल, एखादा फंक्शन चालू असेल आणि त्यामध्ये जर ढोल वाजत असेल आणि ढोलचा आवाज जर तुम्हाला झाडांच्या पानांची सळसळ होते अगदी त्याप्रमाणे जर तुम्हाला ढोलाचा आवाज ऐकू येत असेल तर सज्जग व्हा.
असा आवाज तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जर ऐकू येत असेल तर हा एक खूप मोठा अपशकून आहे. ही गोष्ट या गोष्टीकडे संकेत करते की आपण नजीकच्या भविष्यात मोठ्या संकटास सामोरे जाऊ शकता. तर या होत्या पाच गोष्टी की ज्या आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या संकटांची सूचना देतात.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.