आयपीएल म्हटलं की, सर्वात आधी दोनच संघ डोळ्यासमोर येतात चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन होय. कारण इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी IPL 2023 मिनी लिलावापूर्वी BCCI कडे त्यांच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे.
आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव 23 डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या पुढील हंगामाआधी फ्रँचायझी आपल्या संघाला नवा लूक देण्यात व्यस्त आहेत.
या अंतर्गत कायम आणि सोडण्यात आलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची कसरत सुरू झाली आहे. IPL इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी IPL 2023 मिनी लिलावापूर्वी BCCI कडे कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर केली आहे.
डिसेंबरमध्ये आयपीएलच्या 16व्या हंगामासाठी मिनी लिलाव होणार आहे. तर तर या लिस्टमध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 साठी अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरन पोलार्डला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलार्ड 2010 पासून मुंबई फ्रँचायझीसाठी खेळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्सने फॅबियन ऍलन आणि टायमल मिल्स यांनाही सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर केली आहे.
दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजाला कायम ठेवले आहे. पण, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिलने आणि मिचेल सँटनर यांनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्वांना यावेळी सीसके आणि जडेजा यांच्यातील मतभेदमुळे रिटेन करते का नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण गेल्या अनेक दिवसांपासून जडेजा यापुढे चेन्नईकडून खेळणार नसल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, आता जडेजाला संघाने कायम ठेवल्याची बातमी देत, चेन्नईने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.
दरम्यान, या आयपीएल 2023 चा मिनी लिलाव डिसेंबरमध्ये कोची होणार असून 15 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयने सर्व फ्रँचायझींना रिटेन केलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने सोडलेल्या आणि कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर केली आहे.
यामध्ये, मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड्स, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि तिलक वर्मा यांना कायम ठेवले असून त्याचवेळी फॅबियन ऍलन, किरन पोलार्ड, टायमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि हृतिक शोकिन यांना सोडण्यात आले आहे.
तसेच गेल्या वेळी चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजाला संघाचा कर्णधार बनवले. मात्र, संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे जडेजाने हंगामाच्या मध्यातच कर्णधारपद सोडले आणि त्याच्या जागी पुन्हा महेंद्रसिंग धोनीकडे संघाची कमान सोपवण्यात आली. जडेजाने 10 सामन्यात 116 धावा देत 5 विकेट घेतल्या. सीएसकेला 14 पैकी 4 सामने जिंकता आले. तेव्हापासून जडेजा आणि सीएसके व्यवस्थापन यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. आता जडेजा या फ्रँचायझीपासून दूर जाईल असे वाटत होते.
पण, मिनी लिलावापूर्वी संघाने कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची माहिती समोर आल्याने जडेजा चेन्नई सुपर किंग्जकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्जने 9 खेळाडूंना कायम ठेवले आहे तर 4 मिनी लिलावापूर्वी सोडले आहेत. चेन्नईने कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि दीपक चहर यांना कायम ठेवले आहे.