भारतीय क्रिकेट संघाने icc टी-20 विश्वचषकात विजयाचा दावेदार म्हणून प्रवेश केला होता, मात्र सेमिफायनलमध्ये इंग्लंड कडून 10 विकेट्सनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ दाखवला पण मोठ्या प्रसंगी संघ अपयशी ठरला आणि त्यामुळेच ते विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यानंतर आता बीसीसीआय अनेक बदल करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
टी-20 मध्ये अनेक खेळाडूंना कायमची बाहेचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. दरम्यान, Bcci मर्यादित षटकांमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार ठेवण्याचा विचार करत असल्याचीही बातमी आहे. याचा अर्थ एकदिवसीय कर्णधार वेगळा आणि टी-20 कर्णधार वेगळा. रोहित शर्माकडे वनडे संघाचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे.
पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे आणि त्यादृष्टीने संघात सातत्य राहण्यासाठी रोहितने कर्णधारपद राखणे आवश्यक आहे. आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या हार्दिक पांड्याकडे टी-20ची कमान सोपवली जाऊ शकते आणि संधी मिळेल, तेव्हा भारतीय संघाची कमानही सांभाळली आहे.
विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनच्या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंवर चाहत्यांनी सडकून टीका केली होती. विशेष म्हणजे काही क्रिकेटच्या चाहत्यांनी BCCI खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तात्काळ बाहेर काढून टाका अशी मागणी केली होती.
आजपासून टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध T20 मालिका सुरु झाली आहे. हार्दीक पांड्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
त्यामध्ये टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध T20 मालिका सुरु झाली आहे. हार्दीक पांड्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. याशिवाय, रोहित शर्मा आता 35 वर्षाचा झाला आहे. तो 3-4 महिने झाले की, क्रिकेटमधून विश्रांती घेत असतो.
त्याच्याकडे टीम इंडियाचं तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपद आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सुद्धा आहे. एकाचवेळी इतक्या ठिकाणचं कर्णधारपद सांभाळाणं सोप्प नाही. त्यामुळे टीम इंडियाचं T20 फॉरमॅटमधील कर्णधार पद हार्दीक पांड्याला द्यायला हवं. त्यामुळे रोहित शर्माचं वय वाढत चालल्यामुळे त्याच्यावर अनेकजण टीका करीत आहे.
कारण त्याचा फॉर्म आता पुर्वीसारखा राहिलेला नाही. मागच्या 12 टी 20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये फक्त एकदाच 50 धावाचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा सारख्या खेळाडूला अशा पद्धतीचे आकडे शोधत नाहीत.
दरम्यान, झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने फक्त 116 केल्या. त्यामुळे त्याच्या फॉर्मविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. याशिवाय, हार्दीक पांड्या सध्या चांगली खेळी करीत आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत सुद्धा चांगली खेळी केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल मॅचमध्ये हार्दीक पांड्याने अंतिम ओव्हरमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 2024 मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हार्दीक पांड्याला कर्णधारपद द्यायचा बीसीसीआयचा विचार सुरु आहे.
विशेष म्हणजे मागच्या आयपीएलच्या सीजनमध्ये हार्दीक पांड्याने गुजरात टाइटंसला चषक जिंकून दिला आहे.