अखेर इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा आला समोर? शरद पवार म्हणाले की..

Pune प्रादेशिक

गेल्या अनेक दिवसांपासून इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा कोण असेल?, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क आणि चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांना देखील याबाबत वारंवार विचारलं जात होते. मात्र, आता या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाच्या प्रस्वावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.

तसेच याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंडिया आघाडीची आगामी निवडणुकांसाठी असलेल्या रणनीतीबाबत मोठा खुलासा केला होता. दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडे सत्ताधारी पक्षांसह संपूर्ण देशाचं लक्ष टिकून आहे. तसेच लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतांना मात्र सत्ताधारी भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी इंडिया आघाडी काय पावलं टाकते? हे पाहणं महत्त्वाचं मानले जात आहे.

कारण देशातील नागरिकांसाठी इंडिया आघाडी एक नवा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याचं या इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. पण या आघाडीचा प्रमुख चेहरा कोण? 2024 च्या लोकसभेत पंतप्रधान पदासाठी कोण चेहरा असेल? याबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगितले जाते. तसेच इंडिया आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची देखील माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी संजोयक ठरवल्याची माहिती समोर आली होती.

मात्र इंडिया आघाडीची नुकतीच दिल्लीत बैठक पार पडली असून या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा, अशा प्रस्तावावर चर्चा झाल्याची अनेक माध्यमातून माहिती समोर आली असल्याचे दिसून येत आहे. पण तरीही फार असे मोठं निष्कर्ष या बैठकीतुन निघल नसल्याचे देखील सांगितले जाते.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या रणनीतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं असून वरिष्ठ नेते शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी इंडिया आघाडीबाबत विचारलेल्या अनेक प्रश्नांवर सविस्तर स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “मला आज एका गोष्टीचा आनंद आहे की, या देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष जे आजच्या सत्ताधारी पक्षांच्या भूमिकेशी सहमत नसल्याने असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देत आहेत ही जमेची बाजू मानली पाहिजे”..

तसेच काही पत्रकारांनी शरद पवारांना इंडिया आघाडीत नाराजी आहे का? असा खोचक प्रश्न विचारल्यावर मात्र पवार साहेबांनी “काही नाराजी नाही. संयोजकाची जबाबदारी नितीश कुमार यांनी घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं आहे. त्यांनी त्यांची जागा निश्चित करावी, संयोजकाची गरज नाही”, असं स्पष्टीकरण दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *