स्वामी जे उपदेश देतायेत तसे करा ।। तुमच्या मनातील कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही ।। वाचा या लेखात स्वामी काय सांगतायेत !

कला चित्रपट प्रादेशिक शिक्षण

“श्री स्वामी समर्थ” भक्त कल्याणकारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य कथा. स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष गुरुतत्व की जे सर्वांगाने सर्वार्थाने अक्कलकोट नगरीत येणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन करत होते. आणि विविध लीला करत स्वामिनी मानवाला त्याच्या मनाच्या वृत्तीचे दर्शन घडवले.

आणि त्यातील नकारात्मक प्रवृत्तीला समूळ नष्ट कर अशी प्रेरणा दिली. यातच मानवाचे एक नकारात्मक वृत्ती म्हणजे “आळस”. आळशी मनुष्य हा नेहमी कामचुकार असतो. आणि हा कामचुकारपणा अनेक चुकांना निमंत्रण देतो जसे कि लबाडी, अप्रामाणिकपणा, खोटं बोलणं वैगरे.

मात्र या एका गुणामुळे मानवाची अधोगती वायू वेगाने होते. आणि हे स्वामींनी जाणलेले होते. आणि ह्या बाबतीत स्वामिनी अनेक वेळा परखडपणे अनेकांना सुनावले सुद्धा. ह्यातच एक ढोंगी पोटार्थी स्वामींकडे आला. वर वर दिसताना तो तसा ढोंगी दिसत नव्हता, पण जेव्हा तो स्वामींच्या समोर आला तेव्हा स्वामींनी त्याच्याकडे बघितले.

स्वामींचा चेहरा रागाने लालबुंद झाला आणि क्रोधाने ओरडत शिव्या देत बोलेले, आयते खायला हुडकतो पापाची मत्ता! स्वामीभक्तहो अशी स्वामी वाणी होतास त्याच्या पायाचे कापरे सुरू झाले. त्याला आपली चूक समजली आणि नाक घासत स्वामींचे माफी मागत प्रामाणिक कष्ट करण्याचा संकल्प केला,आणि एक कोषात स्वामी नामाचा जय जयकार केला.

स्वामींची ही कथा स्वामींची ही लीला या ठिकाणी समाप्त होत आहे. पण आजच्या या स्वामी वाणीतून भेटणारा बोध अगदी स्पष्ट आहे. स्वामी गुरूंना आळशी, अप्रामाणिक वृत्तीचे लोक अजिबात आवडत नाहीत. त्याऐवजी प्रामाणिक प्रयत्न करणारी भक्त स्वामींना खूप आवडतात.

जो भक्त प्रामाणिक प्रयत्न करतो, आपला निरंतर प्रयत्न हीच स्वामी सेवा. या भावनेने जो कर्म करतो,स्वामी त्याच्या सतत पाठीशी असतात. त्याला पुढे पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. अगदी सहज बोध आपणास भेटतो. आपल्याला कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असुदे निरंतर प्रयत्न ही चुकणार नाही.

आपल्याला आत्मज्ञान हवे असेल तर तासंतास ध्यान, साधना, मनन, चिंतन करावे लागेल. ,थोडक्यात प्रयत्नही कोणाला चुकणार नाही ते करावेच लागतील आणि म्हणूनच स्वामींनी ही वाक्य वारंवार उच्चारण प्रामाणिक प्रयत्न ही स्वामींची सेवा आहे. अशी प्रेरणा दिली आहे.

आणि म्हणून आज आपण आपल्या जीवनाचे जे काही ध्येय असेल ते साध्य करत असताना, आपल्या मनाच्या विविध वृत्तीचा अभ्यास करायचा आहे.आपलं मन कुठे कुठे कारण सांगत, लबाडी करत, हे शोधून आपल्याला जे प्रयत्न करण्याचे संकेत भेटत आहे, ते प्रयत्न म्हणजेच स्वामींचे हुकूम आहे.

करत असलेले प्रयत्न हीच खरी स्वामी सेवा आहे. हे समजायचे आहे. आणि स्वामींना अपेक्षित सेवा करायची आहे. बघा नक्कीच स्वामींना अपेक्षित समृद्ध, यशस्वी, आनंदी जीवनाचे अभिव्यक्ती होईल. मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया. हे समर्था सतत होणाऱ्या तुझ्या कृपेसाठी धन्यवाद!

आळशी मनाच्या गुलामगिरीतून तू मुक्त हो आणि प्रामाणिक प्रयत्न करत कष्ट कर. हे प्रयत्न म्हणजेच माझीच सेवा आहे. आज आम्हा बालकांना जो बोध दिलास तो पुरेसा आहे धन्यवाद. हे आई अशीच प्रेरणा दे, मार्गदर्शन कर, तुझी भक्ती दे,आणि तुला अपेक्षित समृद्ध, यशस्वी,आनंदी जीवन अभिव्यक्त करून घे.स्वामींची ही लीला या ठिकाणी समाप्त होत आहे.

“अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधीराज योगीराज, परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू, अवधूत चिंतन,भक्त वत्सल भक्ताभिमानी, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय….!”

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *